Join us

लग्नानंतर स्तनांचा आकार वाढतो -बदलतो ? समज-गैरसमज बाजूला ठेवा, वाचा खरं ते काय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2025 21:05 IST

why breast become bigger after marriage : reason for breast size increase after marriage : लग्नानंतर स्तनांचा आकार बदलतो असे व्हायरल दावे किती खरे किती खोटे..

लग्नानंतर महिलांच्या शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल अनेक समज, गैरसमज आणि कुतूहल देखील असते. यापैकीच एक सर्वसामान्य विचार येतो तो म्हणजे, लग्नानंतर महिलांच्या स्तनांचा आकार वाढतो किंवा बदलतो. हा केवळ एक सामाजिक गैरसमज आहे की यामागे काही वैज्ञानिक कारणे दडलेली आहेत हे आपल्याला माहीत नसते. स्तनांचा आकार वाढण्यामागे किंवा बदलण्यामागे कोणतेही एकच कारण नसते, कारण महिलांचे शरीर हार्मोन्स आणि लाईफस्टाईलमधील बदलांवर अवलंबून असते. लग्नानंतर स्तनांचा आकार वाढतो किंवा बदलतो, पण यामागचं खरं कारण काय आहे हे फार कमी लोकांना माहीत असतं. काहींना वाटतं की हा बदल शारीरिक संबंधांमुळे होतो, तर काहीजण याला “लग्नानंतर होणाऱ्या नैसर्गिक बदलांशी” जोडतात. मात्र प्रत्यक्षात हे बदल हार्मोनल बदल, वजनातील फरक, जीवनशैली आणि प्रेग्नन्सी यांसारख्या गोष्टींशी अधिक संबंधित असतात(why breast become bigger after marriage).

जर अचानक लग्नानंतर स्तनांचा आकार वाढू लागला, तर अनेकींच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. याच प्रश्नांपैकी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, लग्नानंतर स्तनांचा आकार खरंच वाढतो का? या दोघांमध्ये नेमका काय संबंध आहे? याबद्दल माहिती घेण्यासाठी Mumma's Blessing IVF आणि Birthing Paradise च्या वैद्यकीय संचालक आणि आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. शोभा गुप्ता यांनी काही महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत(Reason for breast size increase after marriage).

लग्नानंतर स्तनांचा आकार खरचं वाढतो की बदलतो का ? 

महिलांच्या संपूर्ण आयुष्यात असे अनेक टप्पे येतात, जेव्हा त्यांना स्तनांच्या आकारात बदल जाणवतो. याबाबतीत, लग्नाचा या बदलांशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे, फक्त लग्नानंतर स्तनांचा आकार वाढतो, असे म्हणणे योग्य नाही. स्तनांच्या आकारात बदल होण्यासाठी इतर अनेक घटक देखील कारणीभूत असतात.

नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन (National Center of Biotechnology Information - NCBI) नुसार, "सुमारे १८ टक्के महिलांनी मेनोपॉज (Menopause) नंतर त्यांच्या स्तनांचा आकार वाढल्याचे सांगितले आहे. याची मुख्य कारणे पाहिली, तर त्यात वजन वाढणे आणि कंबरेच्या आसपास चरबी जमा होणे यांचा समावेश असतो."

रात्री मुलं सतत लघवीसाठी उठतात-गादी ओली करतात? असू शकतात ५ गंभीर समस्या, पाहा काय करायचं...

व्हजायनल डिस्चार्जचा रंग सांगतो महिलांच्या आरोग्याची स्थिती! गंभीर आजाराची लक्षणं कळतात वेळीच..

याव्यतिरिक्त, एनसीबीआईच्या आणखी एका अहवालात हे समोर आले आहे की, लग्नानंतर गर्भधारणेमुळे देखील महिलांच्या स्तनांचा आकार वाढतो. एकंदरीत सांगायचे झाल्यास, लग्नाचा थेट स्तनांच्या आकाराशी कोणताही संबंध नाही. याउलट, हार्मोनल बदल, गर्भधारणा आणि मेनोपॉज यांसारख्या टप्प्यांमध्ये स्तनांच्या आकारावर परिणाम होऊ शकतो.

लग्नानंतर कोणत्या कारणांमुळे वजन वाढते ? 

१. वजन वाढणे :- लग्नानंतर अनेकदा महिलांचे वजन वाढते. यामागे आहार आणि लाईफस्टाईलमधील बदल, शारीरिक हालचालींची कमतरता अशी अनेक कारणे असू शकतात. वजन वाढण्याचा परिणाम स्तनांच्या आकारावरही होतो. स्तनांमध्ये चरबीचे प्रमाण वाढल्याने आकार मोठा दिसू लागतो.

२. हार्मोनल बदल :- लग्नानंतर महिलांचे संपूर्ण आयुष्य बदलते. त्या माहेराहून सासरी जातात, ज्यामुळे कधीकधी त्यांना स्ट्रेस, तणाव जाणवतो. तसेच, त्या लैंगिकदृष्ट्या अ‍ॅक्टिव्ह होतात. अशा परिस्थितीत, त्यांच्या शरीरात हार्मोनल बदल होऊ लागतात. ही स्थिती देखील स्तनांचा आकार वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.

३. गर्भधारणा :- ही स्थिती थेट स्तनांचा आकार वाढवते. वास्तविक पाहता, गर्भधारणेमुळे महिलांचे शरीर स्तनपानासाठी तयार होऊ लागते, ज्यामुळे स्तनांचा आकार वाढू लागतो. गरोदर राहणाऱ्या प्रत्येक महिलेसोबत हे घडते.

लग्न आणि स्तनांचा आकार वाढण्याचा कोणताही थेट संबंध नाही. लग्नानंतर महिला नियमितपणे शारीरिक संबंध ठेवतात, ज्यामुळे हार्मोनल बदल होतात. याव्यतिरिक्त, अनेकदा मासिक पाळी, गर्भधारणा आणि मेनोपॉज यांसारख्या स्थिती देखील स्तनांचा आकार वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Does marriage affect breast size? Facts vs. Myths explained.

Web Summary : Breast size changes after marriage are often linked to hormonal shifts, weight fluctuations, lifestyle adjustments, and pregnancy, not marriage itself. Factors like diet, stress, and life stage play key roles.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलमहिला