Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > भेंडी दिसायला हेल्दी पण ‘या’ ५ लोकांसाठी विषासारखी! चुकूनही खाऊ नका, अन्यथा गाठवं लागेल हॉस्पिटल

भेंडी दिसायला हेल्दी पण ‘या’ ५ लोकांसाठी विषासारखी! चुकूनही खाऊ नका, अन्यथा गाठवं लागेल हॉस्पिटल

bhendi side effects: bhendi disadvantages: Who should not eat bhendi : चुकीच्या लोकांनी भेंडी खाल्ली तर आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होतात. जाणून घेऊया कोणत्या लोकांनी भेंडीची भाजी खाऊ नये.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2025 14:09 IST2025-09-10T14:08:53+5:302025-09-10T14:09:41+5:30

bhendi side effects: bhendi disadvantages: Who should not eat bhendi : चुकीच्या लोकांनी भेंडी खाल्ली तर आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होतात. जाणून घेऊया कोणत्या लोकांनी भेंडीची भाजी खाऊ नये.

Who should avoid eating bhendi Why bhendi is harmful for some people Health risks of eating too much bhendi | भेंडी दिसायला हेल्दी पण ‘या’ ५ लोकांसाठी विषासारखी! चुकूनही खाऊ नका, अन्यथा गाठवं लागेल हॉस्पिटल

भेंडी दिसायला हेल्दी पण ‘या’ ५ लोकांसाठी विषासारखी! चुकूनही खाऊ नका, अन्यथा गाठवं लागेल हॉस्पिटल

भेंडीची भाजी अनेकांना खायला अधिक प्रमाणात आवडते. घरात कितीही वेळाही बनवली तरी अनेक लोक आवडीने खातात.(bhendi side effects) भेंडी फ्राय, भरली भेंडी, बेसन भेंडी किंवा दही भेंडी यासारखे विविध पदार्थ बनवून खाल्ले जातात. भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन सी, के, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. (bhendi disadvantages) ज्यामुळे पचन सुधारतं. रोगप्रतिकारशक्ती वाढते, वजन नियंत्रणात राहतं आणि हाडं देखील मजबूत होतात. (Who should not eat bhendi) पण असं म्हटलं जातं ना, की जेवण कितीही हेल्दी असलं, तरी सगळ्यांसाठी ते योग्यचं असेल असं नाही. अगदी तसंच काही भेंडीबाबतही लागू होतं. (bhendi harmful effects)
भेंडी ही खूप फायदेशीर आहे पण काही लोकांसाठी ती एकदम विषासारखी ठरु शकते.(bhendi health risks) याचं कारण म्हणजे भेंडीतील काही खास नैसर्गिक घटक आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम. चुकीच्या लोकांनी भेंडी खाल्ली तर आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होतात. जाणून घेऊया कोणत्या लोकांनी भेंडीची भाजी खाऊ नये.

गव्हाच्या पिठात कालवून लावा ‘हा’ पदार्थ, फेसवॉश-क्रिम विसराल इतकी त्वचा होइल मऊ-पिंपल्स गायब

1. किडनी स्टोन असणाऱ्या लोकांनी भेंडी खाऊ नये. यामध्ये ऑक्सलेट भरपूर प्रमाणात असते. ऑक्सलेट शरीरात कॅल्शियमसोबत मिसळून स्टोन तयार करु शकतो. ज्यांना आधीपासून किडनी स्टोनचा त्रास आहे, त्यांनी भेंडी खाणे टाळावे. जर खायचे असेल तर कमी प्रमाणात खा आणि भरपूर पाणी प्या. 

2. शरीरात वाढलेल्या युरिक अ‍ॅसिडमुळे गाउटचा त्रास होतो. भेंडीमध्ये असलेले ऑक्सलेट्स युरिक अ‍ॅसिडचे क्रिस्टलायझेशन वाढवतात. ज्यामुळे सांधेदुखी आणि सूज येण्याची समस्या वाढते. म्हणून सांधेदुखी असणाऱ्या लोकांनी भेंडी खाऊ नये. 

जुन्या चहाच्या गाळणीला करा नव्यासारखी! खास ट्रिक- घासण्याची गरजच नाही- मिनिटांत होईल साफ

3. भेंडीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. जे सामान्यत: पचनासाठी चांगले आहे. ज्यांना पोटफुगी, गॅस किंवा आतड्यासंबंधित समस्या असतील त्यांनी भेंडी खाऊ नका. यामुळे त्रास अधिक वाढतो. इतकेच नाही तर अपचनाचा त्रास देखील होतो. 

4. भेंडी ही व्हिटॅमिन के चा उत्तम स्त्रोत आहे. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी व्हिटॅमिन के आवश्यक आहे. रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्या लोकांनी आपल्या आहारात व्हिटॅमिन के चे प्रमाण कमी ठेवायला हवे. अन्यथा औषधाचे रिअॅक्शन होऊ शकते. 

5. काही लोकांना भेंडी खाल्ल्याने ऍलर्जी होती. ज्यामुळे त्वचेवर खाज सुटणे, पुरळ येणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

 

Web Title: Who should avoid eating bhendi Why bhendi is harmful for some people Health risks of eating too much bhendi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.