पूर्वीपासूनच तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याची सवय अनेकांना आहे. आपल्या अनेकांच्या घरात तांब्याची भांडी देखील पाहायला मिळतात.(Copper water side effects) आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी मदत होते.(Who should not drink copper water) तसेच आपली पचनसंस्था देखील सुधारते. पण जसं खाण्यापिण्यात आपल्याला काही मर्यादा राखाव्या लागतात तसेच पाणी पिताना देखील काळजी घ्यायला हवी.(Copper vessel water) तांब्याच्या भांड्यातील पाण्याबाबतही काही नियम आणि काळजी घेणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने किंवा अतिरेकी सेवन केल्यास शरीरासाठी नुकसानकारक ठरु शकते.(Health tips in Marathi)
अनेकजण रात्रभर तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे फायदेशीर मानतात. शरीराचे योग्य कार्य राखण्यासाठी तांबे हे एक आवश्यक खनिज मानले जाते.(Drinking water from copper vessel) पण तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणे प्रत्येकासाठी चांगले नाही.
सावधान, हे प्रेम नव्हे! नवराबायकोने एकमेकांचा टॉवेल वापरणं अत्यंत धोकादायक, होतात ५ गंभीर आजार
NIH नुसार किडनीचा आजार असलेल्या लोकांनी तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणे धोकादायक ठरु शकते. किडनी निकामी झाल्यामुळे शरीरातील अतिरिक्त तांबे काढून टाकण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे तांबे साठते. ज्यामुळे आपल्याला मळमळ, उलट्या आणि पोटदुखीची लक्षणे दिसू शकतात.
तांबे हे इतर धातूंपेक्षा कमी संवेदनशील असते. परंतु काही लोकांना तांब्याची अॅलर्जी असू शकते. यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे किंवा जळजळ होऊ शकते. लहान मुलांचे यकृत आणि मूत्रपिंड हे व्यवस्थितपणे विकसित झालेले नसतात. ज्यामुळे तांबे सहजपणे पचवू शकत नाहीत. मुलांमध्ये तांब्याचे प्रमाण जास्त झाल्यास त्यांना गॅस, अपचन आणि अतिसारसारख्या लक्षणांना सामोरे जावे लागते.
तांब्याचे शरीरात जास्त प्रमाण झाल्यास यकृत, मेंदू आणि मूत्रपिंडावर परिणाम होतो. ज्यामुळे गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवतात. या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी तांब्याच्या बाटलीत पाणी पिणे टाळावे. कारण ते खूप धोकादायक असू शकते. काही लोकांना डोकेदुखी, चक्कर येणे आणि सामान्य अशक्तपणा देखील येऊ शकतो.
बाटलीत जास्तीत जास्त ६ ते ८ तास पाणी साठवून ठेवू नका. नियमितपणे बाटली धुवा. तसेच, लिंबूपाणी किंवा व्हिनेगरसारखे आंबट पेय कधीही तांब्याच्या बाटलीत ठेवू नका, कारण यामुळे तांब्याचे जास्त सेवन होऊ शकते.