Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आरोग्यासाठी वरदान पांढरे तीळ! नियमित खा, हाडं होतील मजबूत, पाठदुखी-कंबरदुखीपासून होईल सुटका

आरोग्यासाठी वरदान पांढरे तीळ! नियमित खा, हाडं होतील मजबूत, पाठदुखी-कंबरदुखीपासून होईल सुटका

white til benefits in marathi: white sesame seeds benefits: white sesame seeds benefits for hair: white sesame seeds benefits for diabetes: white sesame seeds benefits for female: is white sesame seeds good for health: Back Pain Remedies: पाठदुखी कंबरदुखीचा त्रास वारंवार होतो, हिवाळ्यात खा पांढरे तीळ, अनेक आजार होतील दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2025 13:31 IST2025-02-16T13:28:45+5:302025-02-16T13:31:05+5:30

white til benefits in marathi: white sesame seeds benefits: white sesame seeds benefits for hair: white sesame seeds benefits for diabetes: white sesame seeds benefits for female: is white sesame seeds good for health: Back Pain Remedies: पाठदुखी कंबरदुखीचा त्रास वारंवार होतो, हिवाळ्यात खा पांढरे तीळ, अनेक आजार होतील दूर

white sesame seed benefits for health bones strong get relief from back pain and waist pain. | आरोग्यासाठी वरदान पांढरे तीळ! नियमित खा, हाडं होतील मजबूत, पाठदुखी-कंबरदुखीपासून होईल सुटका

आरोग्यासाठी वरदान पांढरे तीळ! नियमित खा, हाडं होतील मजबूत, पाठदुखी-कंबरदुखीपासून होईल सुटका

थंडीचे दिवस सुरु झाले की, आपल्या आरोग्याच्या तक्रारीदेखील अधिक वाढतात. हिवाळ्यात आपल्या आहारात रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला हवा. (white til benefits in marathi) त्यापैकी एक म्हणजे पांढरे तीळ. पांढऱ्या तीळाचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. हे बहुगुणी आणि पौष्टिक खाद्यपदार्थ मानला जातो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि बी6 सारखे पोषकतत्व अधिक आढळतात. जे हाडांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते. (white sesame seeds benefits for diabetes)
पांढऱ्या तिळाला नियमितपणे खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच हृदयविकार आणि उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. पांढऱ्या तिळात फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे वजन कमी होते. (is white sesame seeds good for health) यामुळे आपली पचनशक्ती देखील सुधारते. हिवाळ्यात आपल्याला गुडघेदुखी, पाठदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास होतो. अशावेळी हाडं मजबूत करण्यासाठी नियमित रुपात तीळ खायला हवे. 

हिवाळा संपत आला, ‘पोपटी’ खाल्ली की नाही? पाहा हा पारंपरिक पदार्थ करतात कसा


पांढऱ्या तीळात असणारे पोषक तत्व शरीरातील कॅल्शियम वाढवते. त्यासाठी रोज चमचाभर तीळ खायला हवे. (Back Pain Remedies) तिळाच्या तेलात व्हिटॅमिन ई आहे. जे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या सुरळीत करतात. सांधिवात, हाडांच्या तक्रारी असणाऱ्या लोकांनी तर आवर्जून तीळ खा. तसेच पांढरे तीळ हे सूपरफुड मानले जाते. मुठभर तीळ खाल्ल्याने आळस, कमकुवतपणा आणि थकवा दूर होतो. थंडीच्या दिवसात तुम्हाला सक्रिय राहण्यास मदत करतात. हाडांसोबतच केस, सेल्स मेंब्रेन आणि मेंदू चांगला राहातो. जर तुम्हालाही नुसते तीळ खायला आवडत नसतील तर या पद्धतीने ट्राय करुन पाहा. 

पांढऱ्या तीळाचा रोल 

  • पांढऱ्या तीळाचा रोल बनवण्यासाठी सर्वात आधी २५० ग्रॅम काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, खजूर, १५ ते २० अंजीर, ५० ग्रॅम खरबूजाच्या बिया, ५० ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया, २५ ग्रॅम पांढरे तीळ घ्या.
  • त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि अंजीर बारीक चिरून तुपात भाजून घ्या.
  • तसेच सूर्यफुलाच्या बिया, खरबूजाच्या बिया आणि पांढरे तीळ भाजून घ्या.
  • तयार मिश्रण थंड झाल्यानंतर बारीक करा.
  • पॅनमध्ये तुप घालून गरम करा, त्यात गूळ घालून त्याचे पाक तयार करा. 
  • गूळ वितळला की, त्यात भाजलेला सुका मेवा आणि पांढरे तीळ घालून मिश्रण चांगले मिसळा. 
  • तयार मिश्रण कणकेसारखे मळून त्याचा पातळ रोल बनवा. त्याचे बारीक तुकडे करा किंवा लाडूसारखे वळवू शकता. 
     

Web Title: white sesame seed benefits for health bones strong get relief from back pain and waist pain.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.