अंगावरुन पांढरे जाणे किंवा व्हाईट डिस्चार्ज ही समस्या अनेक महिलांमध्ये होते. (White discharge home remedies) अनेकदा हा डिस्चार्ज पाळी येण्याच्या आधी सुरु होतो तर काही वेळेस हा त्रास पाळीनंतर वाढतो. व्हाईट डिस्चार्जला ल्युकोरिया असे देखील म्हणतात.(Leucorrhea treatment at home)
मासिक पाळीच्या काही दिवसाआधी ठराविक प्रमाणात पांढरं पाणी जाणे ही समस्या सामान्य असते. (Yoga for white discharge control)परंतु, मासिक पाळी येऊन गेल्यानंतर किंवा अचानक हा त्रास सुरु झाला तर हे नॉर्मल नाही. अनेकदा याचा रंग देखील वेगळा असतो. सतत लघवीला गेल्यानंतर याचा वास देखील येऊ लागतो. त्यासाठी आपण याकडे दुर्लक्ष करायला नको. (How to stop excessive vaginal discharge)
काहीही खाल्ले तरी पोट फुगते-अपचनाचा त्रास होतो? ४ घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम
अंगावरुन पांढरे जाण्याची अनेक कारणे असतात. बॅक्टेरिया किंवा यीस्ट इन्फेक्शन, हार्मोनल असंतुलन, अस्वच्छता, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव किंवा कमकुवत प्रतिकारशक्ती यांसारख्या गोष्टींमुळे व्हाईट डिस्चार्ज सुरु होतो. अशावेळी डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा. परंतु,आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण काही घरगुती उपाय किंवा व्यायाम देखील करायला हवे.
व्यायाम केल्याने शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहाते. श्वास, ध्यान केल्याने ताणतणाव कमी होतो. रक्ताभिसरण सुरळीत होऊन हार्मोन्स देखील संतुलित राहतात. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते. महिलांच्या प्रजनन क्षमतेच्या प्रणालीवर देखील भर पडतो. व्हाईट डिस्चार्जचा त्रास आपल्याला होत असेल तर आपण काही योगासने करायला हवी. ज्यामुळे आपल्याला काही प्रमाणात आराम मिळेल. जाणून घेऊया त्याबद्दल
1. पश्चिमोत्तानासन - हे योगासन अंडाशयांना उत्तेजित करते. आपल्या पेल्विक क्षेत्रावर ताण येतो. तसेच पुनरुत्पादक अवयवांमध्ये सामान्य रक्त प्रवाहाला प्रोत्साहन देते.
2. बद्धकोनासन - व्हाईट डिस्चार्जसाठी हे योगासन चांगले आहे. या मुद्रेमुळे पेल्विक स्नायूंना बळकटी देते. आपल्या शरीरातील रक्ताभिसरण वाढवते . कंबर आणि मांडीचा भाग मोकळा करुन हार्मोनल असंतुलन झाल्यास त्यावर काम करते.
3. सर्वांगासन - या योगासनामुळे पेल्विक क्षेत्रातील रक्त प्रवाह सुरळीत होतो. हार्मोनल संतुलन व्यवस्थित होते. तसेच अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून आराम मिळतो.
4. कपालभाती - कपालभाती या योगासनामध्ये आपल्याला जोरात श्वास घ्यावा लागतो. ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत होतात तसेच हार्मोनल स्त्राव नियंत्रणात राहतो.
5. विपरिता करणी - या योगसनामुळे शरीरातील रक्तप्रवाह वाढतो,ताण कमी होतो. तसेच संप्रेरक उत्पादन नियंत्रित होते. आपल्या पोटांच्या स्नायूंना बळकटी देऊन प्रजनन आरोग्य सुधारण्यास मदत होते.
व्हाईट डिस्चार्जमुळे आतले कपडे ओले होणे, वास येणे, अस्वच्छ वाटणे अशा समस्या होतात. यामुळे आपल्या ओटी पोटात दुखणे, पाठदुखी, मूड स्विंग्ज, कॅल्शियमच्या तक्रारी वाढतात. यासाठी आपल्याला वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.