Join us

हार्टचा त्रास- ब्लड प्रेशरची समस्या असेल तर कोणतं मीठ खावं? डॉक्टर सांगतात, मिठाचं योग्य प्रमाण आणि प्रकार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2025 15:05 IST

which salt is good for heart patients : best salt for heart health : low sodium salt for heart patients : which salt is safe for cardiac patients : हृदयाशी संबंधित समस्या असल्यास कोणतं व किती मीठ खावं ते पाहा, हृदय राहील कायम ठणठणीत...

'मीठ' हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. जेवणात मीठ थोडे जरी कमी - जास्त झाले, तर संपूर्ण जेवणाची चव बदलते. मीठ फक्त अन्नाची चव वाढवत नाही, तर शरीराची (which salt is good for heart patients) अनेक महत्त्वाची कार्ये पार पाडण्यास फायदेशीर ठरते. यासोबतच, हृदय निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहाराची निवड करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यात मीठ हा आपल्या दैनंदिन आहारातील सर्वात जास्त वापरला जाणारा घटक असल्यामुळे हृदयाच्या (best salt for heart health) आरोग्यावर त्याचा थेट परिणाम होतो. जेव्हा हृदयाच्या आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा, मीठ नेमकं कोणतं व किती प्रमाणांत खावं असा प्रश्न पडतो( which salt is safe for cardiac patients).

जास्त प्रमाणांत मीठ खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर,  हृदयविकाराचा झटका, हृदय निकामी होणे आणि हार्ट स्ट्रोक यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. ज्यांना आधीच हृदयाशी संबंधित आजार किंवा काही समस्या आहेत, त्यांना साधे पांढरे मीठ टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यात असलेले उच्च सोडियम क्लोराईड हृदयावरील दबाव वाढवते. मग अशा परिस्थितीत, स्वयंपाकात नेमकं कोणतं मीठ वापरावं, जेणेकरुन जेवणाची चवही टिकेल आणि हृदयही सुरक्षित राहील असा प्रश्न पडतो. फरीदाबाद येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सीनियर कन्सल्टंट - इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी आणि इलेक्ट्रोफिजियोलॉजी असलेले डॉ. बिनय कुमार पांडे यांनी एका संकेस्थळाला दिलेल्या मुलाखतीत, हृदयाशी संबंधित समस्या असल्याने कोणतं व किती मीठ खावं याबद्दल अधिक माहिती दिली आहे. 

हृदयाशी संबंधित समस्या किंवा आजार असलेल्यांसाठी कोणते मीठ सर्वोत्तम आहे?

डॉ. बिनय कुमार यांचे म्हणणे आहे की, सोडियमयुक्त असलेले मीठ हृदयविकाराच्या रुग्णांसाठी हानिकारक असते. म्हणूनच, काही अशी मीठं आहेत, ज्यामध्ये सोडिअमचे प्रमाण कमी असते आणि इतर खनिजे देखील चांगल्या प्रमाणांत असतात, जी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकतात.

४८ वर्षांच्या मल्लिका शेरावतचा फिटनेस फॉर्म्युला! कोणतेही ट्रेंडी डाएट नाही, केला ‘हा’ उपाय रोज...

महिलांचा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करणारे ७ सुपरफूड्स! आहारतज्ज्ञांचा सल्ला, रोज १ तरी खा कारण...

१. लो-सोडियम मीठ (Low-Sodium Salt) :- लो-सोडियम मीठामध्ये सोडियमचे प्रमाण कमी करून त्याऐवजी पोटॅशियम मिसळले जाते. पोटॅशियम रक्तवाहिन्यांना आराम देते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. हे मीठ विशेषत: ज्या लोकांना हाय ब्लडप्रेशरची समस्या आहे, त्यांच्यासाठी असते. परंतु, ज्या लोकांना किडनीचा आजार आहे, त्यांनी हे मीठ घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यामुळे, तुम्ही तुमच्या आहारात या मिठाचा समावेश करू शकता.

२. सैंधव मीठ (Rock Salt) :- सैंधव मीठ ज्याला रॉक सॉल्ट (Rock Salt) किंवा उपवासाचे मीठ म्हणूनही ओळखले जाते, यात मॅग्नेशियम, कॅल्शियम यासारखी खनिजे व मिनरल्स भरपूर प्रमणात असतात. जरी यात सोडिअमचे प्रमाण सामान्य मीठाएवढेच असले, तरीही ते नैसर्गिक असल्यामुळे, त्याचा वापर मर्यादित प्रमाणात करणे सुरक्षित मानले जाते.

३. सी सॉल्ट  (Sea Salt) :- सी सॉल्ट म्हणजेच हिमालयीन पिंक सॉल्ट (Himalayan Pink Salt), यामध्ये नैसर्गिक खनिजे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांसाठी हा एक निरोगी पर्याय ठरतो. हिमालयीन पिंक सॉल्टमध्ये लोह, कॅल्शियम , मॅग्नेशियम इत्यादी खनिजे असतात, परंतु यामध्ये देखील सोडिअमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे मीठ देखील मर्यादित प्रमाणात खाणे आवश्यक असते. 

झटपट वेटलॉससाठी करा काळीमिरीचा उपाय, चवीला तिखट पण काम जबरदस्त-दिसेल वजनात फरक काही दिवसात...

दिवसभरात नेमके किती प्रमाणांत मीठ खावे ?

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), एका प्रौढ व्यक्तीने रोज ५ ग्रॅम, म्हणजेच अंदाजे १ चमच्यापेक्षा कमी मीठ खाल्ले पाहिजे. परंतु, हृदयाशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी ५ ग्रॅमपेक्षाही खूप कमी प्रमाणांत मीठ खावे. नेहमी आपल्या आरोग्याच्या स्थितीनुसार डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहारात मिठाचा समावेश करावा. पोटॅशियमयुक्त लो-सोडियम मीठ हृदयविकाराच्या रुग्णांसाठी एक चांगला पर्याय असू शकते, परंतु याचा वापर नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केला पाहिजे. सैंधव मीठ आणि हिमालयीन सॉल्ट हे देखील चांगले पर्याय आहेत, जे मर्यादित प्रमाणातच खाणे सुरक्षित मानले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Best Salt for Heart Patients: Types, Benefits, and Recommended Intake

Web Summary : For heart patients, choosing the right salt is crucial. Experts recommend low-sodium, rock, or Himalayan pink salt in moderation. These options offer minerals like potassium and magnesium, potentially aiding blood pressure and heart health. Consult a doctor for personalized advice on salt intake.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहृदयरोगहृदयविकाराचा झटका