उन्हाळा सुरु झाला की, बाजारात आपल्याला अनेक फळांची चव चाखायला मिळते.(Papaya and Blood Sugar Levels) त्यात अनेकांना आवडणारी पपई ही आरोग्यासाठी जितकी फायदेशीर आहे तितकीच हानिकारक.(Is Papaya Safe for Diabetic Patients) भारतात ९० टक्के लोक मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त आहेत. रक्तातील साखर वाढल्याने अनेकांना मधुमेहासारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. (Health Risks of Eating Papaya for Pregnant Women)
चुकीची जीवनशैली, खाण्याच्या सवयी, अपुरी झोप आणि ताण यामुळे मधुमेहासारखा आजार वाढतो.(Should People with High Blood Sugar Eat Papaya) अशावेळी मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेकदा म्हटले जाते की, मधुमेहाच्या रुग्णांनी पपई खाऊ नये.(Papaya for Hypertension) याविषयी अनेक मिथ्य सांगण्यात आले आहे. जाणून घेऊया मधुमेहींनी पपई खावी की, नाही...
रोज सकाळी खा वाटीभर भिजवलेले हिरवे चणे, हृदय राहिल निरोगी, पचनसंस्थाही सुधारेल...
पपईमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स ६० च्या आसपास असतो. याचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील साखर झपाट्याने वाढत नाही. परंतु, याचे प्रमाण वाढले तर रक्तातील साखर वाढू शकते. मधुमेहाचे रुग्ण कच्ची किंवा अर्धी पिकलेली पपई खाऊ शकतात. कच्च्या पपईमध्ये साखर कमी असते. यात फायबरचे प्रमाण जास्त असते आणि चरबी कमी असते. कच्च्या पपईमध्ये लेटेक्स असते. तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियमचे स्त्रोत देखील असते. कच्ची आणि पिकलेली पपई रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील इन्सुलिन पेशींना वेगाने वाढवतात. तसेच साखर चयापचय गतिमान करतात. मधुमेहाच्या रुग्णांनी कच्ची पपई खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.
' या' वयातच महिलांमध्ये वाढतो गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका! वेळीच ओळखा लक्षणे...
पपई किती प्रमाणात खावी?
मधुमेहाच्या रुग्णांनी एक कपपेक्षा जास्त प्रमाणात पपई खाऊ नये. जास्त प्रमाणात पपई खाल्ल्याने शरीरातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. पपईचा आहारात अनेक प्रकारे आपण समावेश करु शकतो.
या लोकांनी खाऊ नका पपई
ज्या लोकांना लेटेक्सची ॲलर्जी असेल त्यांनी पपई खाल्ल्याने त्वचेवर लाल पुरळ, खाज येणे किंवा ॲलर्जी असेल त्यांनी चुकूनही पपई खाऊ नका.
पपईमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे किडनी स्टोन असणाऱ्याच्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते.
गरोदर असणाऱ्या महिलांनी या काळात पपईचे सेवन करणे धोक्याचे ठरु शकते. पपईत असणारे घटक बाळाच्या विकासासाठी धोकादायक ठरु शकतात.
अतिप्रमाणात पपईचे सेवन केल्यास पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खाताना विशेष काळजी घ्यावी.