Join us
Daily Top 2 Weekly Top 5

शुगर वाढण्याची भीती विसरा! स्वयंपाकघरातील चिमूटभर मसाला डायबिटीसवर रामबाण, 'या' पद्धतीने खा-साखर राहिल नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2026 14:15 IST

Diabetes control: Blood sugar control: Natural remedy for diabetes: Kitchen spice for diabetes: हा मसाला केवळ पदार्थांची चव वाढवत नाही तर योग्य प्रमाणात घेतल्यास रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

सध्याच्या काळात डायबिटीस हा आजार प्रत्येक वयोगटामध्ये पाहायला मिळतो. चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढणं सामान्य झालं आहे.(Diabetes control) पण मधुमेहाचा आजार एकदा झाला की, औषधे आणि पथ्यपाणी यांचा आयुष्यभराचा फेरा सुरु असतो.(Blood sugar control)  चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव आणि झोपेची अनियमितता यामुळे रक्तातील साखरेची पातळी सतत चढ-उतार घेत राहते.(Natural remedy for diabetes) अनेकजण औषधांसोबत घरगुती उपायही शोधत असतात, जे नैसर्गिक, स्वस्त आणि रोजच्या आयुष्यात सहज करता येतील. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण स्वयंपाकघरातील मसाल्याचा वापर करु शकतो. तो म्हणजे दालचिनी पावडर.(Kitchen spice for diabetes) हा मसाला केवळ पदार्थांची चव वाढवत नाही तर योग्य प्रमाणात घेतल्यास रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. 

केसांचा अंबाडा दिसेल मोठा- भरगच्च, कुंडीतल्या हिरव्या पानांचे बनवा हेअर सिरम- केस होतील मुलायम चमकदार

आयुर्वेदानुसार दालचिनीचा वापर हा पचनक्रिया मजबूत करण्यासाठी, अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी आणि कफ नियंत्रणात ठेवण्यासाठी केला जातो. रोज एक दालचिनीचा तुकडा चावून खाल्ल्याने चयापचयणाला चालना मिळते. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. 

आहारात आपण दालचिनीचा समावेश केल्याने जेवणानंतर हळूहळू साखरेचे प्रमाण कमी होऊन रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. यामुळे आपले पोट देखील स्वच्छ राहते. हा मसाला रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास देखील मदत करतो. 

रात्री एक ग्लास पाण्यात दालचिनीचा छोटा तुकडा भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून प्या. हे पाणी शरीरातील चयापचय सुधारते आणि साखर नियंत्रणात ठेवते. नेहमीच्या चहामध्ये किंवा कोऱ्या चहामध्ये साखरेऐवजी एक चिमूटभर दालचिनी पावडर टाका. यामुळे चवीसोबतच आरोग्यालाही फायदा होतो. दिवसाला १ ते २ ग्रॅमपेक्षा जास्त दालचिनी घेऊ नका.  

English
हिंदी सारांश
Web Title : Cinnamon: Your Kitchen Spice to Control Diabetes Naturally and Effectively

Web Summary : Control diabetes with cinnamon! This kitchen spice helps manage blood sugar levels. Consume it in tea, soaked overnight in water, or directly. Cinnamon boosts metabolism and aids digestion, keeping glucose levels stable. Limit intake to 1-2 grams daily for best results.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स