व्हिटॅमिन डी ची कमतरता असणारे अनेक लोक आहेत. बहुतांश लोकांना त्यामुळे मग वेगवेगळे त्रासही होतात.. भारतात एवढं ऊन असूनही तिथल्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी काय असते, असा प्रश्नही अनेकदा विदेशातल्या अनेक तज्ज्ञ मंडळींना पडतो.. शरीरातली व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्याचा सगळ्यात उत्तम स्त्रोत म्हणजे सुर्यप्रकाश. सुर्यप्रकाशातून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळतं. त्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात आपण काही वेळ घालवला पाहिजे असं आपल्याला माहिती आहे. पण काही तज्ज्ञांच्या मते मात्र सकाळचे कोवळे ऊन तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी पुरेसे ठरत नाही (which is the correct time for getting vitamin d from sun light?). त्यासाठी नेमकं कोणत्या वेळी उन्हात गेलं पाहिजे, ते पाहा..(best natural source of getting vitamin D)
सुर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळविण्याची सगळ्यात उत्तम वेळ कोणती?
शरीरातली व्हिटॅमिन डी ची कमतरता सुर्यप्रकाशाच्या माध्यमातून भरून काढायची असेल तर त्यासाठी घराबाहेर पडण्याची सगळ्यात उत्तम वेळ कोणती याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉ. राजीव राज चौधरी यांनी asutoshhospital या पेजवर शेअर केला आहे.
स्वयंपाकासाठी तुम्ही चुकीचं तेल वापरता म्हणून वाढतोय लठ्ठपणा-हृदयरोग, पाहा कोणतं तेल वापरणं योग्य..
यामध्ये त्यांनी सुर्यप्रकाशात गेल्यावर पडणारी तुमची सावली आणि व्हिटॅमिन डी याचं एक समीकरण सांगितलं आहे. त्यात डॉक्टर असं सांगतात की उन्हात गेल्यानंतर जेवढी तुमची सावली छोटी असते तेवढं जलद गतीने तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळतं. जेवढी सावली लांबत जाते, तेवढं कमी वेगात व्हिटॅमिन डी मिळतं.
सावलीचं हे गणित पाहून व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी कोणत्या वेळी घराबाहेर पडायला हवं हे लक्षात येतं.
वाढत्या वयाला लागेल ब्रेक! 'या' पद्धतीने खा शेवग्याची पावडर- चेहऱ्यावरच्या सुरकुत्या होतील गायब..
डॉक्टरांच्या मते सकाळी ११ ते दुपारी ३ हा वेळ जलद गतीने व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी योग्य आहे. पण सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे या दिवसातली उन्हाची तिव्रता लक्षात घेऊन व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळायलाच हवे.