Join us   

स्वयंपाकात वापरा '१' हेल्दी तेल! उच्च रक्तदाब - वजन वाढ - हार्ट अॅटॅक येण्याची भीती कमी-आरोग्यही निरोगी राहील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2024 4:26 PM

Which is the best Indian cooking oil for high blood pressure? : बीपी राहील नियंत्रणात! रोज फक्त आहारात 'या' तेलाचा समावेश न चुकता करा..

असंतुलित आहार आणि खराब जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाबेची (High Blood Pressure) समस्या वेगाने वाढत आहे. पूर्वी उच्च रक्तदाब बहुतांश वृद्धांमध्ये दिसून येत होता. परंतु आता ही समस्या तरुणांमध्ये सामान्य होत चालली आहे. उच्च रक्तदाबामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढत आहे. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, आपण आपल्या आहार आणि जीवनशैलीची (Lifestyle) विशेष काळजी घेतली पाहिजे. मुख्य म्हणजे आपण आहारात वापरत असलेले तेल देखील महत्वाचे ठरते.

जर आपल्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर, आपण आपल्या आहारात ऑलिव्ह ऑइलचा समावेश करू शकता. ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेले गुणधर्म आणि पोषक तत्व रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यास खूप उपयुक्त ठरते. पण याचे सेवन कधी आणि कसे करावे? पाहूयात(Which is the best Indian cooking oil for high blood pressure?).

भारतात ५ पदार्थांवर बंदी, तरीही सर्रास होते विक्री! FSSAI सांगतत कॅन्सरचा धोका अधिक आणि..

हाय ब्लड प्रेशरने त्रस्त? ऑलिव्ह ऑइलचा करा आहारात समावेश...

ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, 'उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी ऑलिव्ह ऑइलचे सेवन करायला हवे. यामध्ये असलेले गुणधर्म रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यासह अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे उच्च रक्तदाब कण्ट्रोलमध्ये राहण्यास मदत करते. शिवाय यात पॉलिफेनॉल आणि मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आढळतात. ज्यामुळे रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास, बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास, यासह ब्लड सर्क्युलेशन योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते.

खाण्याच्या सवयींमुळे भारतीय आजारी पडतात! ICMR च्या तज्ज्ञांनी सांगितलं, सतत आजारपण नको तर..

उच्च रक्तदाबात ऑलिव्ह ऑईलचे सेवन कसे करावे?

उच्च रक्तदाब कण्ट्रोलमध्ये ठेवण्यास ऑलिव्ह ऑईल मदत करते. याचे सेवन केल्याने वजन देखील कण्ट्रोलमध्ये राहते. जर आपल्याला हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर, सकाळी दोन चमचे ऑलिव्ह ऑईलचा आहारात समावेश करा. आपण या तेलाचा समावेश, भाज्या, सॅलड आणि इतर पदार्थ देखील तयार करण्यास करू शकता. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य