Join us   

आंबा प्रचंड आवडतो, पण कापून खाणे चांगले की आमरस? तज्ज्ञ सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2023 2:15 PM

Which is the Best Form To Eat Mango according to Dietician : आंबा खाणे आणि आमरस किंवा मँगो मिल्क शेक खाणे यामध्ये नेमका फरक काय?

आंबा म्हणजे अनेकांसाठी विक पॉईंट. कधी एकदा बाजारात आंबा येतो आणि आपण खातो असे अनेकांना होऊन जाते. यातही हापूसच्या आंब्याला जास्त भाव असतो. मग  हा आंबा महाग असला तरी त्यासाठी वेगळं बजेट काढलं जातं आणि घरात पेट्याच्या पेट्या यायला लागतात. वर्षातून अवघा २ महिने येणारा हा आंबा मनसोक्त खाऊन घेतला तर वर्षभरासाठी तब्येत चांगली राहते असे म्हणतात. आंब्यामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त अशी खनिजं आणि जीवनसत्त्व असल्याने हे फळ खाल्लेले चांगले. लहान मुलं, अशक्तपणा असलेल्या व्यक्ती यांनी आंबा आवर्जून खायला हवा असं म्हटलं जातं. हे जरी खरं असलं तरी उष्णतेचे विकार असणाऱ्यांनी, डायबिटीस असणाऱ्यांनी, गर्भवती महिलांनी हे फळ खावं का? किती प्रमाणात खावं आणि कोणत्या फॉर्ममध्ये खावं असे बरेच प्रश्न आपल्याला असतात (Which is the Best Form To Eat Mango according to Dietician). 

आंबा आपण एकतर कापून फोडी करुन खातो, त्याचा आमरस करुन तो पोळी किंवा पुरीसोबत खातो. नाहीतर आंब्याचे पुडींग, मिल्क शेक, शिरा, जेली, केक, आईस्क्रीम असे काही ना काही पदार्थ करुन खातो. पण आंबा कोणत्या फॉर्ममध्ये खाणे आरोग्यासाठी चांगले याविषयी प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अमिता गद्रे यांनी नुकतीच अतिशय उपयुक्त अशी माहिती शेअर केली आहे. आंबा खाल्लेला चांगला आणि आमरस खाणे आहाराच्या दृष्टीने तितके योग्य नाही असे आहारतज्ज्ञ सांगतात. आमरसात आपण वरुन साखर घालत असल्याने आमरस खाणे चांगले नाही असे काही असते का? तर हे एक कारण असले तरी आमरस खाऊ नये यामागे आणखीही काही महत्त्वाचे कारण आहे.

(Image : Google)

आमरस खाणे चांगले की आंबा खाणे? यामागे नेमके कारण काय? 

आमरस हे काहीशा द्रव फॉर्ममध्ये असते तर आंबा हा घन पदार्थांमध्ये मोडणारा घटक आहे. आपल्या डोक्यात द्रव पदार्थ आणि घन पदार्थ खाण्याबाबत काही एक संकल्पना असते. त्यामुळे आंबा खाल्ल्यावर जे समाधान होते ते आमरस खाल्ल्यावर होत नाही. हेच सेम मँगो मिल्क शेक आणि मँगो स्मूदी बाबतही होते. आंबा ब्लेंड केला म्हणजे त्याचा रस काढला की त्यातील कॅलरीज शरीरात जास्त प्रमाणात आणि वेगाने शोषल्या जातात आणि रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. तसेच आंब्याच्या रसामुळे इन्शुलिन लेव्हलही वाढते. 

तसेच एक बाऊल आमरसासाठी २ मध्यम आकाराचे आंबे घ्यायला हवेत. तसेच आमरस असला की आपण नकळत एखादी पोळी किंवा पुरी जास्त खातो. त्यामुळे कॅलरीजचे प्रमाण जास्त वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीतरी आमरस खायला हरकत नाही. पण त्यासोबत भाजी, कोशिंबीर अशा प्रोटीनयुक्त पदार्थांचाही आहारात समावेश करायला हवा. त्यामुळे आठवड्यातून एकदा तुम्ही आंब्याचा रस खाऊ शकता.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआंबाआहार योजना