Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळ्यात शिळं अन्न, दूध अन् फळं खात असाल तर दवाखान्यातच पोहचाल! पाहा काय खाणं टाळावंच..

उन्हाळ्यात शिळं अन्न, दूध अन् फळं खात असाल तर दवाखान्यातच पोहचाल! पाहा काय खाणं टाळावंच..

Summer Tips : उन्हाळ्यात भरपूर पाणी तर महत्वाचं आहेच, सोबतच या दिवसात शिळं अन्न किंवा फळं खाणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 17:50 IST2025-04-24T13:32:04+5:302025-04-24T17:50:00+5:30

Summer Tips : उन्हाळ्यात भरपूर पाणी तर महत्वाचं आहेच, सोबतच या दिवसात शिळं अन्न किंवा फळं खाणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.

Which food you should avoid in summer days | उन्हाळ्यात शिळं अन्न, दूध अन् फळं खात असाल तर दवाखान्यातच पोहचाल! पाहा काय खाणं टाळावंच..

उन्हाळ्यात शिळं अन्न, दूध अन् फळं खात असाल तर दवाखान्यातच पोहचाल! पाहा काय खाणं टाळावंच..

Summer Tips : उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून गरमीमुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा धोकाही खूप वाढला आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये तब्येत अधिक सांभाळावी लागते. त्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणंही पुरेसं आहे. भरपूर पाणी तर महत्वाचं आहेच, सोबतच या दिवसात शिळं अन्न किंवा फळं खाणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.

उन्हाळ्यात खाण्या-पिण्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जास्त तापमान असल्याने वेगवेगळे पदार्थ लवकर खराब होतात. अशात जर तुम्ही उन्हाळ्यात शिळं अन्न खात असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

किती तासांआधीचं अन्न खाऊ नये?

डॉक्टर सांगतात की, उकाड्याच्या दिवसांमध्ये ४ ते ५ तासांपेक्षा आधी तयार करण्यात आलेलं अन्न खाऊ नका. तसेच सलाड आणि फळं हे कापल्यानंतर लगेच खावीत किंवा जेव्हा खायचं आहे तेव्हाच कापावे. जर तुम्ही शिळं अन्न किंवा फळं खाल्लीत तर वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. 

दुधापासून तयार पदार्थ

काही लोक दूध फ्रिजमध्ये ठेवून २ ते ३ दिवसांपर्यंत वापरत राहतात. तुम्ही जर ताजं दूध घेतलं असेल ते उकडून त्याच दिवशी संपवा. जर तुम्ही पॅकेटमधील दुधाचा वापर करत असाल तर त्यावरील एक्सपायरी डेट चेक करुन वापर करा. 

फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न नुकसानकारक

जर तुम्ही रात्रीचं किंवा दिवसा शिल्लक राहिलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवत असाल आणि विचार करत असाल की, दुसऱ्या दिवशी हे खाऊ. तर तुमची ही सवय चुकीची आहे. फ्रिजमध्ये ताजी फळं आणि भाज्या ठेवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही कापलेल्या नसाव्यात. पण शिल्लक राहिलेलं ठेवलं आणि ते नंतर खाल्लं तर पोटाची समस्या होऊ शकते.

फूड पॉयजनिंग

तापमान वाढल्यावर फूड पॉयजनिंगचा धोका अधिक वाढतो. याचं कारण तापमान अधिक असल्याकारणाने अन्नात बॅक्टेरिया अधिक होतात आणि वाढतात. हे बॅक्टेरिया ५ जिग्री सेल्सीअस ते ६० डिग्री सेल्सीअसच्या तापमानात वेगाने वाढतात. एक-दोन तासातच बॅक्टेरियाची संख्या २ ते ३ पटीने वाढू लागते. ज्यामुळे अन्न विषारी होऊ शकतं. असं अन्न खाल्ल्यावर पोटदुखी, उलटी, फूड पॉयजनिंगची लक्षणे दिसू शकतात. 

डायरिया

या दिवसात लहान मुलं-मुली डायरियाचे अधिक शिकार होतात. लहान मुलांचं पचनतंत्र हे वयस्कांपेक्षा कमजोर असतं. त्यामुळे शिळे पदार्थ खाल्ल्याने मुलांवर लवकर वाईट परिणाम बघायला मिळतो. डायरिया झाल्यावर पुन्हा पुन्हा संडास लागणे, उलटी आणि ताप येणे या समस्या होतात. तसेच या समस्येमुळे शरीरातील पाणीही कमी होतं. याने समस्या अधिक वाढू शकतं. 

Web Title: Which food you should avoid in summer days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.