रात्रीचं जेवण कायमच लवकर करण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो. वजन कमी करण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी सूर्यास्तापूर्वी जेवा असं आयुर्वेदात पूर्वीपासून सांगण्यात आलं.(which dal is good for dinner) त्यात रात्रीचं जेवण हलकं, पचायला सोपं आणि पोटाला आराम देणारं असावं असं आपल्याला नेहमीच सांगितलं जातं.(best dal for night meal) पण नेमकं काय खायला हवं असा प्रश्न आपल्याला कायमच पडत असतो. (dal for acidity and gas)
अनेकजण रात्रीच्या जेवणात हलका आहार घेतात. जेवणामध्ये डाळीच्या बाबतीत अनेकदा संभ्रम असतो. तुरीची डाळ की हरबऱ्याची डाळ. रात्रीच्या जेवणात कोणती योग्य? गॅस, अपचन, जडपणा टाळायचा असेल तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो. जाणून घेऊया आयुर्वेदानुसार कोणती डाळ आरोग्यासाठी चांगली आहे.
टपरीवर मिळतो तसा फक्कड मसाला चहा करा घरीच, पंकज त्रिपाठींनी शेअर केली खास ट्रिक, चहा होईल घट्ट
पोषणतज्ज्ञांच्या मते मूग डाळ ही लवकर पचणारी डाळ आहे. यात प्रथिने चांगले असतात. तर ही डाळ पोटासाठी जड नसते. यात संतुलित प्रमाणात फायबर देखील असते. जे पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. मूग डाळीमध्ये चरबीचे प्रमाण खूप कमी असते. ज्यामुळे ही डाळ खाल्ल्यावर लगेच पचते. त्यासाठी आजारी मुले, वयोवृद्ध आणि पचनाची समस्या असणाऱ्यांना मूगाची डाळ खाण्याचा सल्ला दिला जातो.
तूर आणि हरबऱ्याच्या तुलनेत मूग डाळ कमी गॅस आणि पोटफुगी निर्माण करते. यामध्ये फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे पोटफुगण्याची समस्या वाढते. तूर पौष्टिक असले तरी मूग डाळीइतके ते हलके नसतात. मूग डाळीत असणारे एंजाइम पचन सुरळीत करण्याचे कार्य करते. तसेच आतड्यांवर कमी ताण देतात. ज्यामुळे आम्लपित्त, बद्धकोष्ठता आणि पचनक्रियाची गडबड झाल्यानंतर मूग डाळ हा चांगला पर्याय आहे.
आपण रात्रीच्या जेवणात तुरीच्या डाळीसोबत मुगाची डाळ समप्रमाणात मिक्स करुन खाऊ शकतो. तसेच मुगाच्या डाळीत शरीराला हवे असणारे लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि बी जीवनसत्त्वे आहेत. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण लवकर देखील वाढत नाही. त्यामुळे मधुमेहाचे रुग्ण देखील ही डाळ खाऊ शकता. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठीही ही डाळ फायदेशीर आहे. यामुळे जास्त काळ पोट भरलेले राहते.
