Join us

मुलांसाठी रोज जेवणात ‘ही’ चपाती बेस्ट! डॉक्टर म्हणतात- पचन होईल नीट, आरोग्यासाठी हेल्दी पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2025 11:30 IST

healthy chapati for children: best flour for kids: healthy Indian food for kids: मुलांसाठी कोणती चपाती अधिक चांगली आहे पाहूया.

भारतीय ताटात चपाती नसेल तर जेवण अपूर्णच.(chapati for kids) आपल्या रोजच्या जेवणात चपाती हमखास खाल्ली जाते.(healthy chapati for children) प्रत्येक घराघरात चपाती बनवली जाते. पण अनेकदा हीच चपाती मुले खात नाही.(best flour for kids) त्यांना चपातीपेक्षा बाहेरचे जंक फूड खायला जास्त आवडतात.(kids diet tips) पालकांना हीच चिंता सतावत असते की, माझं मूल चपाती नीट खात नाही. चपाती खाल्ल्यानंतर त्यांना पोटदुखी, गॅस किंवा अपचनाचा त्रास होतो. याच सगळ्यात महत्त्वाच कारण आपण एकसारखी चपाती बनवतो. डॉक्टर म्हणतात की, मुलांची पचनसंस्था ही अतिशय नाजूक असते. म्हणून नेहमीच गव्हाची चपाती त्यांच्यासाठी चांगली असेल असं नाही. (healthy Indian food for kids) सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत मुले बाहेरचे पदार्थ अतिप्रमाणात खातात. ज्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्याच्या आहारात पौष्टिकतेसोबतच हलकं, सहज पचणारं अन्न असणं खूप गरजेचं आहे. चपाती ही कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि ऊर्जा देणारा पौष्टिक पदार्थ असला तरी यात ग्लुटेन जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे मुलांच्या पचनसंस्थेवर परिणाम होतो. मुलांसाठी कोणती चपाती अधिक चांगली आहे पाहूया. 

सकाळचा नाश्ता होईल सुपरहेल्दी! झटपट करा ज्वारीचा पुलाव- वजन कमी करण्यासाठी परफेक्ट डाएट फूड

1. डॉक्टर झैदी म्हणतात गव्हाची चपाती ही मुलांसाठी सगळ्यात शेवटचा पर्याय आहे. यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. प्रथिने आणि जीवनसत्त्व कमी असतात. जे ऊर्जा तर देतात पण मुलांच्या वाढीसाठी सूक्ष्म पोषक घटकांचा अभाव असतो. 

2. मुलांना आपण ज्वारीच्या पीठाची चपाती बनवून खाऊ घालू शकतो. यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. ज्वारीच्या रोटीमध्ये प्रथिने चांगली असतात. ज्वारी हे ग्लूटेन फ्री असणारं धान्य आहे. जे मुलांसाठी फायदेशीर ठरते. त्यांची पचनसंस्था देखील मजबूत करते. 

3. बाजरीमध्ये लोह, मॅग्नेशियम, जस्त आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे अशक्तपणा कमी होतो. यात असणारे घटक मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवतात. 

4. नाचणीची चपाती ही मुलांसाठी सगळ्यात चांगला पर्याय आहे. यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. ज्यामुळे मुलांच्या हाडे आणि दातांच्या विकासात खूप मदत होते. लोह, प्रथिने आणि फायबर जास्त असते. ज्यामुळे कमी भूक आणि कमकुवत मुलांसाठी नाचणी चांगली आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Best roti for kids: Doctors recommend healthy, easily digestible options.

Web Summary : Wheat roti isn't always best for kids due to gluten. Doctors suggest jowar, bajra, or ragi rotis. These offer fiber, antioxidants, calcium and iron, aiding digestion and boosting immunity, crucial for healthy growth amid junk food consumption.
टॅग्स : आरोग्यलहान मुलंअन्न