Join us

बॅड कोलेस्टेरॉल वाढलं तर शरीरात कुठं कुठं दुखू लागतं? पाहा काय आहेत आयुर्वेदिक उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 15:52 IST

Bad Cholesterol Reduce Tips : चिंतेची बाब म्हणजे अनेकांना हे माहीत नाही की, त्यांचं कोलेस्टेरॉल वाढलं आहे. अशात कोलेस्टेरॉल वाढल्याची काही लक्षणं आणि ते कमी करण्याचे काही आयुर्वेदिक उपाय पाहुयात...

Bad Cholesterol Reduce Tips : आजकाल खाद्यपदार्थ इतके अनहेल्दी खाल्ले जात आहेत की, त्यांमुळे हळूहळू का होईना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. शहरात संख्येने कितीही आणि कितीही मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाय ठेवायला जागा नसते. इतकी गर्दी असते. दिवसेंदिवस हार्ट अ‍ॅटॅकच्या केसेस वाढत आहेत. हार्ट अ‍ॅटॅक येण्याची कारणं वेगवेगळी असतात. मात्र, गेल्या काही वर्षात हार्ट अ‍ॅटॅक वाढण्याचं मुख्य कारण वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल ठरत आहे. पण चिंतेची बाब म्हणजे अनेकांना हे माहीत नाही की, त्यांचं कोलेस्टेरॉल वाढलं आहे. अशात कोलेस्टेरॉल वाढल्याची काही लक्षणं आणि ते कमी करण्याचे काही आयुर्वेदिक उपाय पाहुयात...

घातक आहे बॅड कोलेस्टेरॉल

चुकीची लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे जेव्हा बॅड कोलेस्टेरॉल शरीरात वाढतं तेव्हा धमण्यांमध्ये ते जमा होतं. ज्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. या स्थितीला अ‍ॅथेरोस्क्लेरोसिस असंही म्हणतात. यानं पुढे जाऊन हार्ट अ‍ॅटॅक येतो आणि स्ट्रोक येतो. कोलेस्टेरॉल वाढल्याची लक्षणं सुरूवातीला दिसत नाहीत. त्यामुळेच याला सायलेंट किलर म्हटलं जातं. 

कोलेस्टेरॉल वाढल्याची लक्षणं

- शरीरात जर कोलेस्टेरॉल लेव्हल वाढली असेल तर छातीत वेदना किंवा जडपणा जाणवू लागतो. जेव्हा लोक वॉक करू लागतात किंवा पायऱ्या चढतात तेव्हा हे लक्षण दिसून येतं.

- जर हलकं काम करूनही श्वास भरून येत असेल तर हे कोलेस्टेरॉल वाढल्याचं लक्षण असू शकतं. कारण कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयापर्यंत पुरेसं ऑक्सीजन पोहोचत नाही.

- कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर अचानक पायांमध्ये वेदना सुरू होतात. काही लोकांचे पाय सुन्न होतात. पायांमध्ये ब्लड सर्कुलेशन कमी झाल्यानं असं होतं.

- कोलेस्टेरॉल वाढल्यावर अनेकदा चक्कर येणे किंवा डोकेदुखीची समस्या देखील होऊ शकते. असं नेहमीच होत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.

- काही केसेसमध्ये ज्या लोकांना जास्त घाम येतो, त्यांच्यातही कोलेस्टेरॉल वाढलेलं असू शकतं.

आयुर्वेदिक उपाय 

आयुर्वेद डॉक्टर प्रताप चौहान यांनी एका वेबसाईटला सांगितलं की, चुकीच्या आहारामुळे लोकांमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. बॅड कोलेस्टेरॉल तशी काही फार मोठी समस्या नाही. ही समस्या आयुर्वेदाच्या मदतीनं बरी केली जाऊ शकते. यासाठी नियमितपणे आवळ्याचा ज्यूस प्या. सोबतच नारळ सुद्धा पिऊ शकता. 

अक्रोडच्या मदतीनं देखील वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत मिळते. यातील ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडनं कोलेस्टेरॉल कमी होतं. इतरही ड्राय फ्रूट्सचा आहारात समावेश करा. डॉक्टरांनुसार, बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी नेहमीच गोळ्या खाणं फायदेशीर नसतं.

टॅग्स : आरोग्यहृदयरोगहृदयविकाराचा झटका