घरात मोठ्यांकडून आपण अनेकदा ऐकतो, 'वात वाढलाय', 'वाताचा त्रास होतोय'. पण नेमकं हा वात म्हणजे काय, आणि तो त्रास देतो तरी कसा? साध्या भाषेत सांगायचं झालं तर वात म्हणजे शरीरात निर्माण होणारा गॅस, कोरडेपणा आणि हालचालींमधील बिघाड. (When Vata increases, everything deteriorates, the main cause of pain in the stomach - back - legs - joints ....)हा त्रास मुख्यतः पचनसंस्था आणि सांधे यांच्याशी संबंधित असतो आणि म्हणूनच त्याची लक्षणंही शरीरभर वेगवेगळ्या प्रकारे जाणवतात.
वात वाढला की सर्वात आधी पोट बिघडायला सुरुवात होते. पोट फुगणे, गॅस होणे, वारंवार ढेकर येणे, अॅसिडिटी होणे किंवा शौच व्यवस्थित न होणे अशा तक्रारी सुरू होतात. यासोबतच शरीरात कडकपणा जाणवतो, सांधे दुखायला लागतात, चालताना किंवा बसताना कटकट आवाज येतो. काही जणांना हात-पाय सुन्न होणे, मुंग्या येणे, पाठदुखी किंवा मान आखडणे यासारखे त्रासही होतात. झोप न लागणे, चिडचिड वाढणे हे ही वात वाढल्याचेच लक्षण मानले जाते. म्हणजेच, वात हा फक्त पोटापुरता मर्यादित नसून संपूर्ण शरीरावर परिणाम करणारा त्रास आहे.
या वाताचा संबंध आपल्या रोजच्या सवयींशी खूप जवळचा आहे. वेळेवर न खाणं, खूप वेळ उपाशी राहणं, थंड किंवा कोरडं अन्न जास्त खाणं, सततचा ताणतणाव, झोपेची कमतरता आणि हालचालींचा अभाव या सगळ्या गोष्टी वात वाढवतात. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हे सगळं नकळत घडत असल्यामुळे वाताचा त्रासही वाढताना दिसतो.
वात आटोक्यात ठेवण्यासाठी मोठ्या औषधांची गरज नसते, तर साध्या सवयी बदलण्याची गरज असते. नियमित आणि वेळेवर जेवण घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गरम, ताजं आणि थोडं स्निग्ध अन्न जसं की वरण-भात, खिचडी, सूप किंवा तुपाचा वापर यामुळे पचन सुधारतं आणि वात कमी होतो. थंड पाणी, फ्रिजमधील अन्न, जास्त कोरडे पदार्थ किंवा फरसाणसारखे पदार्थ टाळणंही तितकंच गरजेचं आहे. कोमट पाणी पिण्याची सवय लावल्यास पोट हलकं राहतं.
याशिवाय, शरीराला हालचाल देणंही आवश्यक आहे. रोज थोडा वेळ चालणं, हलका व्यायाम करणं किंवा योगा करण यामुळे शरीरातील stiffness कमी होतो. पुरेशी झोप घेणं आणि ताण कमी ठेवणंही वात नियंत्रित ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे. काही साधे घरगुती उपाय जसे की जेवणानंतर बडीशेप खाणं, हिंगाचा वापर करणं किंवा पोटाला गरम शेक देणं यामुळेही आराम मिळतो. तसेच मसाज तेलाने चांगली मालीश फादेशीर ठरते.
Web Summary : Vata, an imbalance of gas and dryness, causes digestive issues, joint pain, and stiffness. Manage it by eating warm foods, staying hydrated, exercising regularly, and reducing stress. Simple home remedies can provide relief.
Web Summary : वात, गैस और रूखेपन का असंतुलन, पाचन संबंधी समस्याएं, जोड़ों का दर्द और अकड़न पैदा करता है। गर्म भोजन, हाइड्रेटेड रहकर, नियमित व्यायाम और तनाव कम करके इसे प्रबंधित करें। सरल घरेलू उपचार राहत दे सकते हैं।