Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > प्लास्टिकची खुर्ची, दाराला हात लावताच झटकन शॉक बसतो तुम्हाला? करंट लागण्याचं पाहा कारण..

प्लास्टिकची खुर्ची, दाराला हात लावताच झटकन शॉक बसतो तुम्हाला? करंट लागण्याचं पाहा कारण..

Why do I get shocked when I touch things: Electric shock from plastic objects: How to stop static shock on doors: Static charge buildup in electronics: शरीरातून करंट पास होणे हा आजार आहे की, आणखी काही... करंट लागण्याचे नेमके कारण काय जाणून घेऊया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2025 12:03 IST2025-04-10T12:03:06+5:302025-04-10T12:03:53+5:30

Why do I get shocked when I touch things: Electric shock from plastic objects: How to stop static shock on doors: Static charge buildup in electronics: शरीरातून करंट पास होणे हा आजार आहे की, आणखी काही... करंट लागण्याचे नेमके कारण काय जाणून घेऊया.

when touching plastic chair door small do you feel electric shock doctor said reason | प्लास्टिकची खुर्ची, दाराला हात लावताच झटकन शॉक बसतो तुम्हाला? करंट लागण्याचं पाहा कारण..

प्लास्टिकची खुर्ची, दाराला हात लावताच झटकन शॉक बसतो तुम्हाला? करंट लागण्याचं पाहा कारण..

शरीर हे अतिसंवेदनशील असते. ज्यामुळे कोणताही दुखापत किंवा करंट बसला की तो सहज जाणवतो. अनेकदा आपल्या हाताच्या कोपऱ्याला काही लागलं किंवा भिंतीला आपटलं.(Why do I get shocked when I touch things) प्लास्टिकच्या खुर्चीवर बसलो किंवा दाराला हात लावला की, आपल्या शरीरातून करंट पास होतो. अनेकदा एकमेकांचा हाताला स्पर्श झाला तरी देखील शरीरातून ऊर्जा बाहेर निघते जी शॉक बसण्यासारखी असते. (Electric shock from plastic objects)
अचानक शॉक का बसतो? वीज नसताना देखील आपल्याला करंट पास झाल्यासारखे का वाटते.(Static charge buildup in electronics) यामगे नेमके कारण काय? शरीरातून करंट पास होणे हा आजार आहे की, आणखी काही... करंट लागण्याचे नेमके कारण काय जाणून घेऊया. (Static electricity shock)

बाथरुममध्ये चुकूनही ठेवू नका ५ गोष्टी, तब्येत सतत बिघडेल आणि डॉक्टरांकडे चकरा मारुन वैतागाल!

तज्ज्ञांच्या मते शरीरातील ज्या नसा असतात त्या सतत इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीमध्ये असतात. आपल्या घरातील विजेच्या तारेवर ज्याप्रमाणे प्लास्टिकचे कोटिंग असते तसेच काहीसे आपल्या शरीरावरील नर्व्ह्जवरही असते. याला वैद्यकीय भाषेत म्येलिन शीथ असे म्हणतात. कधी कधी ही शीथ बिघडते. त्यातील इलेक्ट्रॉन्समध्ये गुंतागुंत जाणवू लागते. ज्यामुळे अचानक कोणी स्पर्श केला की, म्येलिन शीथ ॲक्टिव्हिटी होऊन आपल्या शरीरातून करंट पास झाल्यासारखे होते. 

हा करंट आपल्याला सगळ्यात जास्त प्लास्टिकची खुर्ची, कोपरा किंवा दाराला हात लावल्यानंतर होतो. आपल्या कोपऱ्याजवळ असणारी नर्व्ह ती मणक्यातून निघून खांद्यावरुन सरळ हातांच्या बोंटापर्यंत पोहोचते. या नर्व्हला धक्का बसल्यास आपल्याला स्पर्श केल्यावर करंट बसतो. जेव्हा प्लास्टिकच्या खुर्चीवर आपण बसतो तेव्हा देखील आपल्याला अनेकदा करंट लागतो. प्लास्टिकच्या खुर्चीवर बसल्यानंतर आपले पाय जमिनीला स्पर्श करत नाही. तेव्हा प्लास्टिकची खुर्ची आपल्या कपड्यांपासून वेगळे झालेले इलेक्ट्रॉन गोळा करते. ज्यामुळे खु्र्चीवरुन उठताना करंट पास असतो. 

नॅशनल क्रश तृप्ती डिमरीसारखी सडपातळ कंबर हवी तर रोज सकाळी करा 'असा' व्यायाम, पाहा बदल

असे का होते? 

शरीरात जीवनसत्त्वाची बी १२, बी६ आणि बी१  ची कमतरता हे यामागचं कारण आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. एखाद्या व्यक्तीला एकाच दिवसात अनेक वेळा करंट लागत असेल. तर त्यांनी डॉक्टरांची वेळीच भेट घ्यावी. 

Web Title: when touching plastic chair door small do you feel electric shock doctor said reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.