Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कोणत्या वयापासून मुलांचे डोळे नियमितपणे तपासायला हवेत? मुलांना लहानपणीच चष्मा नको असेल तर....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2026 09:45 IST

Eye Health Tips For Kids: मुलांच्या डोळ्यांचं नुकसान टाळायचं असेल तर योग्य वयापासूनच त्यांच्या डोळ्यांची नियमितपणे तपासणी होणं गरजेचं आहे.(correct age for kids eye checkup)

ठळक मुद्दे आई- वडील पहिल्यांदाच मुलांना डॉक्टरांकडे घेऊन जातात आणि मग तिथे गेल्यावर मुलांना खूप मोठ्या नंबरचा चष्मा लागला आहे हे समजतं.

लहान मुलांचे डोळे हा हल्ली एक मोठाच चिंतेचा विषय झाला आहे. कारण खूप कमी वयापासूनच मुलं स्क्रिन पाहात आहेत. अगदी काही महिन्यांची मुलंही टक लावून टीव्ही, मोबाईल पाहत असतात. त्यांच्यामधून येणारा तीव्र प्रकाश मुलांचे डोळे खराब करतो. याशिवाय हल्ली ऑनलाईन क्लासेसचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळेही मुलांचे टीव्ही, मोबाईल पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या तुलनेत मोकळ्या सुर्यप्रकाशात खेळण्याचे, फिरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचा परिणाम डोळ्यांवर होतो आणि त्यामुळे कमी वयातच कित्येक मुलांना चष्मा लागत आहे. बऱ्याचदा तर आई- वडील पहिल्यांदाच मुलांना डॉक्टरांकडे घेऊन जातात आणि मग तिथे गेल्यावर मुलांना खूप मोठ्या नंबरचा चष्मा लागला आहे हे समजतं. असं आपल्या मुलांच्या बाबतीत टाळायचं असेल तर मुलांचे डोळे कोणत्या वयापासून नियमितपणे तपासायला हवे, ते पाहुया..(correct age for kids eye checkup)

 

मुलांचे डोळे तपासून घेण्याचं योग्य वय कोणतं?

डॉ. तुषार ग्रोव्हर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार बाळ जन्माला आल्यानंतर काही तासांतच त्याच्या डोळ्यांची तपासणी व्हायला हवी. त्यातच बाळाला काही गंभीर दृष्टीदोष असल्यास लगेच लक्षात येऊ शकतो.

पोट साफ होण्यासाठी ३ साध्या- सोप्या टिप्स, सकाळी उठताच पोट साफ होऊन लगेच फ्रेश वाटेल

यानंतर बाळ ६ महिन्यांचे झाल्यानंतर त्याचे डोळे तपासून घ्यायला हवे आणि त्यानंतर बाळ १ वर्षाचे झाल्यावर डोळ्यांची तपासणी करायला हवी. जर बाळाला जन्मजात काही दृष्टीदोष असेल तर तो या तपासण्यांमधून लगेच लक्षात येऊ शकतो.

 

यानंतर ३ ते ५ वर्षे या वयात मुलांच्या डोळ्यांचा झपाट्याने विकास होत असतो. त्यामुळे या ३ वर्षांत दरवर्षी किंवा वर्षातून दोन वेळा बाळांचे डोळे तपासायला हवे.

ज्येष्ठमधाची चिमूटभर पावडर म्हणजे पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स, ॲक्ने गायब, बघा अतिशय सोपा आयुर्वेदिक उपाय 

त्याचबरोबर बाळ डोळ्यांची उघडझाप नीट करत आहे का, टीव्ही, मोबाईल पाहताना त्याचे डोळे तिरळे तर होत नाहीत ना, बुबुळांची हालचाल कशी आहे याकडेही पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. यातून मुलांच्या डोळ्यांच्या समस्या लवकर लक्षात येऊ शकतात. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : When should children's eyes be checked? Preventing early glasses.

Web Summary : Regular eye checkups are crucial for children, starting shortly after birth. Subsequent checks should occur at 6 months, 1 year, and then annually (or bi-annually) between ages 3-5. Early detection of vision problems can prevent issues and the need for glasses later in life.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सडोळ्यांची निगा