अनेकांना अनेक कारणांमुळे पोटाच्या विविध समस्या होत असतात. पोट दुखते म्हणजे नक्की काय होते हे तर आपल्याला माहिती आहे. पण त्याची कारणे वेगवेगळी असल्याने त्या त्रासाला वेगवेगळी नावे असतात. असाच एक त्रास म्हणजे अन्नातून विषबाधा होणे. अनेकदा आपण फूड पॉयझनिंग हा शब्द ऐकत असतो. अन्नातून विषबाधा झाली हे ऐकायला जरा चिंता जनक वाटते मात्र घाबरण्याची गरज नाही. फूड पॉयझनिंग झाल्यावर साध्या उपायांनी आराम मिळतो. (When does food poisoning occur? see how to avoid 'this' problem)मात्र वेगळीच डॉक्टरांचा सल्ला घेणेही तेवढेच गरजेचे असते. अनेकांना वाटते फक्त बाहेरचे खलल्यामुळे फूड पॉयझनिंग होते. अरवटचरवट खातात आणि आजारी पडतात असे आईचे टोमणेही आपण ऐकतोच. पण अन्नातून विषबाधा होण्यामागे फक्त हे एकच कारण नसते इतरही काही कारणे असतात.
आपण जेवण तयार करायला कोणती भांडी वापरतो याचा विचार करणे गरजेचे असते. चुकीच्या भांड्यांचा वापर केल्याने अशी विषबाधा होऊ शकते. पातेल्यांना कल्हही असणे फार गरजेचे असते. खास काही आंबट घालून पदार्थ करताना उरलेले पदार्थ कल्हही नसलेल्या भांड्यात काढून ठेवल्यानेही पोटाला त्रास होतो. घरातील अन्न शिजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यांना कल्हही आहे का नाही याची तपासणी करा. (When does food poisoning occur? see how to avoid 'this' problem)असे अन्न खाल्यानेही विषबाधा होते. त्यामुळे अनेकदा काहीही चुकीचे खाल्ले नाही तरीही पोटाला त्रास का झाला असा प्रश्न पडत असेल तर नक्कीच भांडे चुकते आहे.
अन्न वाया जाऊ नये म्हणून आपण कालचे उरलेले खातो तसेच परवाचेही खातो तेवढेच नाही तर अगदी तेरवाचेही गरम करुन खातो. मात्र असे शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे ताजे गरम पदार्थच खावेत. जुने करुन ठेवलेले खायचे नाही. फळे आरोग्यासाठी फार चांगली असतात. मात्र फळे फार दिवस ठेवायची नाहीत. फळांमध्ये सालमोनेला नावाचा एक जंतू तयार होतो. त्यामुळे फळे ताजी आणि धुतल्यानंतरच खायची. अन्न कायम झाकून ठेवायचे. कधीही उघडे राहू द्यायचे नाही. फार वेळ उघडे राहीलेले पदार्थ खाऊच नका. माश्या, झुरळे, चिलटी अन्ना बाजूला फिरणार नाहीत याची काळजी घ्यायची.