'डोळे' हे आपल्या सगळ्यात महत्वांच्या अवयवांपैकी एक. डोळे फारच नाजूक असल्याने त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकदा आपल्याला डोळ्यांशी संबंधित (What vitamin deficiency causes eye twitch) अनेक लहान - मोठ्या समस्या फार त्रास देतात. डोळे फडफडण्याची समस्या ही डोळ्यांच्या समस्यांपैकी एक (nutritional deficiency eye twitch) फारच कॉमन आणि सगळ्यांना सतावणारी समस्या आहे. अनेकदा आपला डोळा फडफडतो, परंतु आपण या समस्येकडे कायमच दुर्लक्ष करतो(eye twitching due to lack of vitamins).
आपल्याकडे तर काहीजण याला शकुन - अपशकुन किंवा अंधश्रद्धेचा भाग समजून थट्टा मस्करी करतात. पण प्रत्यक्षात, ही शरीरात काही महत्त्वाच्या पोषणतत्त्वांची कमतरता असल्याचे संकेत असू शकतात. विशेषतः व्हिटॅमिन बी १२ आणि मॅग्नेशियम यांची कमतरता असली की स्नायूंवर परिणाम होतो, ज्यामुळे डोळा (how to stop eye twitching naturally) सतत फडफडतो. वेळेवर लक्ष न दिल्यास ही समस्या वाढू शकते आणि इतर त्रास उद्भवू शकतात. याचबरोबर, ही समस्या वरचेवर वारंवार होत राहिल्यास थकवा, चक्कर, त्वचेचा कोरडेपणा किंवा निद्रानाशासारखे गंभीर त्रासही जाणवू शकतात. त्यामुळे अशा छोट्या वाटणाऱ्या लक्षणांकडे वेळेवर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे!
१. डोळे नेमकं का फडफडतात ?
नुकतेच प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की डोळा वारंवार फडफडण्याची समस्या आपण फारशी गंभीरपणे घेत नाही, पण यामागे मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी १२ या पोषकद्रव्यांची कमतरता असू शकते.
टू - व्हीलर चालवून मान- पाठ- कंबर दुखते? ३ गोष्टी करा, दुखणे होते कमी...
२. मॅग्नेशियमची कमतरता झाल्यास काय होतं?
मॅग्नेशियमची हा शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा खनिज घटक आहे. याच्या कमतरतेमुळे स्नायूंना योग्य प्रकारे काम करण्यात अडथळा येतो आणि मज्जासंस्थेच्या कार्यावर परिणाम होतो. यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूच्या स्नायूंवर ताण येतो आणि डोळा वारंवार फडफडतो.
३. मॅग्नेशियमची वाढवण्यासाठी काय खावं ?
शरीरात मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात काही नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. न्यूट्रिशनिस्टच्या मते, भोपळ्याच्या बिया, केळं आणि पालक हे मॅग्नेशियमचे उत्तम स्रोत आहेत. हे पदार्थ नियमित आहारात घेतल्यास मॅग्नेशियमची कमतरता दूर होण्यास मदत होते आणि डोळा फडफडण्याच्या त्रासापासूनही आराम मिळतो.
४. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे काय होत ?
व्हिटॅमिन बी १२ शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. याच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, मज्जासंस्थेशी संबंधित समस्या, आणि स्नायूंमध्ये क्रॅम्स यांसारख्या समस्या सतावतात. याशिवाय, डोळा वारंवार फडफडणे हे देखील व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्याचे लक्षण असू शकते.
५. व्हिटॅमिन बी १२ वाढवण्यासाठी आहारात काय खावे ?
शरीरातील व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी दूध आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ जसे की दही, पनीर हे नियमितपणे खाणे फायदेशीर ठरते.
मासिक पाळीच्या दिवसात फक्त १ मिनिट करा ‘ही’ गोष्ट, स्तनांमधला जडपणा-दुखणं होईल कमी...
या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा....
न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन सांगतात की, जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिणे देखील डोळा फडफडण्याचे कारण असू शकते. यात असलेला कॅफीन मसल्समध्ये ताण वाढवतो, ज्यामुळे डोळा फडफडू शकतो. तसेच, नीट झोप न लागणे हे सुद्धा यामागचं महत्त्वाचं कारण असू शकतं. त्यामुळे दररोज किमान ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. यामुळे डोळ्यांची थकवा, तणाव आणि फडफडण्यासारखे त्रास दूर होण्यास मदत होते.