Join us   

खाऊन झाले की वजन वाढण्याचं टेन्शन येतं? ४ हेल्दी पदार्थ; वजन वाढणार नाही-खा बिनधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2024 2:37 PM

What To Do After Eating Oily Food? Here Is The List To Escape The Aftermath : तेलकट पदार्थ खाल्लं की ४ पैकी १ पदार्थ खायला विसरू नका; खाल्लेलं पचेल व्यवस्थित..

चमचमीत तेलकट पदार्थ खायला कोणाला नाही आवडत (Oily Food). यामुळे मन आणि जीभेचे चोचले दोन्ही समाधानी होतात. पण अतिप्रमाणात तेलकट पदार्थ खाल्ल्यावर वजन वाढण्याची भीती असते (Weight Loss). शिवाय गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. यामुळे हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, पोटाचे विकार, लठ्ठपणा यासह इतर समस्या निर्माण होतात (Fitness).

चरबीयुक्त, तेलकट पदार्थ खाण्यापूर्वी हेल्थचा विचार करणं गरजेचं (Junk Food). पण मनाला कितीही आवर घातलं तरीही, तेलकट चमचमीत खाण्याची इच्छा काही केल्या कमी होत नाही. जर आपण तेलकट पदार्थ खात असाल आणि वजन वाढण्याची भीती मनात असेल तर, ४ गोष्टी खा. यामुळे वजन वाढणार नाही. शिवाय तेलकट पदार्थ खाल्लेलं व्यवस्थित पचेल(What To Do After Eating Oily Food? Here Is The List To Escape The Aftermath).

बडीशेपचा चहा

अन्न व्यवस्थित पचन होण्यासाठी आपण जेवल्यानंतर चमचाभर बडीशेप खातो. हे माऊथ फ्रेशनर म्हणूनही काम करते. त्यात व्हिटॅमिन सी, ई, के, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सेलेनियम, लोह आणि फायबर आढळते. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. शिवाय खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचते. जेवणानंतर आपण बडीशेपचा चहा तयार करून पिऊ शकता. यासाठी उकळत्या पाण्यात बडीशेप घाला, ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. तयार पाणी जेवणानंतर आपण पिऊ शकता.

म्हशीचं की गायीचं? कोणत्या दुधाचं दही चांगलं लागतं? विकतसारखं घट्ट दही हवं तर..

फायबरयुक्त पदार्थ

तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर नेहमी फायबरयुक्त पदार्थ खा. जसे की, ओट्स किंवा दलिया खा. हे फायबरयुक्त पदार्थ आतडे स्वच्छ करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, फायबर-समृद्ध जेवण खाल्ल्याने पोट अधिक काळ भरलेले राहते. ज्यामुळे तेलकट खाल्लेलं व्यवस्थित पचते.

ग्रीन टी

तेलकट अन्न खाल्ल्याने आपल्या पचनसंस्थेवर ऑक्सिडेटिव्ह भार वाढतो. अशावेळी संतुलित करण्यासाठी ग्रीन टी पिणं गरजेचं आहे. ग्रीन टी मधील पौष्टीक घटक पचनसंस्था सुधारते. शिवाय आरोग्यही सुदृढ राहते. ग्रीन टी व्यतिरिक्त आपण  गरम पाणी, कॅमोमाइल, पेपरमिंट किंवा आल्याचा चहा देखील पिऊ शकता.

चार पायऱ्या चढताच दम लागतो? श्वासही फुलतो? न चुकता ५ पैकी १ गोष्ट रोज खा; राहाल फिट

प्रोबायोटिक्सयुक्त पदार्थ खा

प्रत्येकाने आपल्या आहारात प्रोबायोटिक्सचा समावेश करायला हवा. जेव्हा आपण नियमितपणे प्रोबायोटिक्सयुक्त पदार्थ खातो, तेव्हा पचनसंस्थेवरही सकारात्मक परिणाम होतात. ज्यामुळे तळकट पदार्थ खाल्ल्यानंतर दही, ताक किंवा प्रोबायोटिक दूध प्या. यामुळे तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर व्यवस्थित पचेल.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स