Join us
Daily Top 2 Weekly Top 5

वाढलेलं कोलेस्टेरॉल धोकादायक- कोरोनरी आर्टरी डिसिजमुळे अनेकांच्या जीवाला धोका, ओळखणार कसं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 16:33 IST

Heart Blockage Sign : हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, जेव्हा हृदयापर्यंत रक्त पोहोचवणाऱ्या धमण्यांमध्ये कोलेस्टेरॉल, फॅट आणि इतर तत्व जमा होतात, तेव्हा प्लाक तयार होतो.

Heart Blockage Sign : हृदय आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयव आहे. जर हृदय बंद पडलं तर सगळंच बंद पडतं. हृदय सतत रक्त पंप करून पूर्ण शरीरात ऑक्सीजन पोहोचवतं. पण जेव्हा हृदयाच्या धमण्यांमध्ये अडथळा निर्माण होतो किंवा ब्लॉकेज होता तेव्हा शरीरात मोठी गडबड होते. ब्लॉकेज होण्याच्या स्थितीला कोरोनरी आर्टरी डिसिज असं म्हणतात. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, जेव्हा हृदयापर्यंत रक्त पोहोचवणाऱ्या धमण्यांमध्ये कोलेस्टेरॉल, फॅट आणि इतर तत्व जमा होतात, तेव्हा प्लाक तयार होतो. यामुळे धमण्या आकुंचन पावतात आणि रक्तप्रवाह कमी होतो. गंभीर स्थितीत हेच ब्लॉकेज हार्ट अॅटॅकचं कारण ठरतात. 

हृदयाच्या नसा ब्लॉक होण्याची लक्षणं 

हृदयाच्या नसा ब्लॉक होण्याचं सगळ्यात सामान्य लक्षण छातीत वेदना किंवा दबाव आहे. यात वेदना अनेकदा छातीच्या मधे होतात किंवा जडपणा जाणवतो. उजवा हात, खांदा, मान, जबडा किंवा पाठीत वेदना पसरतात. अनेक लोकांना चालण्यात, पायऱ्या चढण्यात अडचण होते. तणावाच्या स्थितीत वेदना अधिक वाढतात आणि आराम केल्यावर त्रास कमी होतो.  

त्याशिवाय दम लागणे, जास्त थकवा, चक्कर येणे, मळमळ, थंड घाम येणे आणि अस्वस्थता असेही संकेत दिसतात. काही रूग्णांमध्ये हृदयाचे ठोके वाढतात किंवा अनियमित होतात. महिला, वृद्ध आणि डायबिटीसच्या रूग्णांमध्ये लक्षणं स्पष्ट दिसत नाहीत. त्यांना छातीत जोरात वेदना तसेच अपचन, पाठीत वेदना, घाबरलेपणा किंवा कमजोरी जाणवते. त्यामुळे त्यांच्यात आजाराचं निदान उशिरा होतं. 

ब्लॉकेजची कारणं? 

ब्लॉकेजच्या मुख्य कारणांमध्ये हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, वाढलेलं कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा यांचा समावेश करता येईल. धूम्रपान धमण्यांमधील आतीर थराचं नुकसान करून प्लाक बनवण्याची प्रक्रिया वेगाने करतं. शारीरिक निष्क्रियता, असंतुलित आहार, जास्त तळलेले पदार्थ आणि प्रोसेस्ड फूड, सोबतच मानसिक तणाव यामुळेही ब्लॉकेजचा धोका वाढतो. ज्या लोकांच्या परिवारात हृदयरोगाचा इतिहास राहिला आहे, त्यांना अधिक धोका असतो.

कसा कराल बचाव? 

वेळोवेळी हृदयाची टेस्ट करा, जसे की, लिपिड प्रोफाइल, ईसीजी आणि स्ट्रेस टेस्ट. या टेस्टच्या माध्यमातून संभावित धोक्याची माहिती मिळवू शकता. तसेच नियमितपणे व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, धूम्रपान बंद करा आणि तणाव कमी करण्यासाठीही उपाय करा. हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करून आपण हृदयरोगाचा धोका टाळू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Know heart blockage: Causes, symptoms, and prevention tips for healthy heart.

Web Summary : Heart blockage, or coronary artery disease, is caused by cholesterol and fat buildup. Symptoms include chest pain, shortness of breath, and fatigue. High blood pressure, diabetes, smoking, and unhealthy lifestyle increase the risk. Regular check-ups, exercise, balanced diet, and stress management are crucial for prevention.
टॅग्स : हृदयरोगहृदयविकाराचा झटकाआरोग्य