Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दिवसाची सुरुवात कशाने करावी? चहा की लिंबू पाणी - काय तब्येतीला जास्त बरे

दिवसाची सुरुवात कशाने करावी? चहा की लिंबू पाणी - काय तब्येतीला जास्त बरे

Best morning drink for health: Morning tea health effects: Healthy drinks to start the day: अनेकजण चहा-कॉफी, लिंबू पाणी -ग्रीन टी सारखे पेय पिऊन दिवसाची सुरुवात करतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2025 15:51 IST2025-05-21T15:50:34+5:302025-05-21T15:51:32+5:30

Best morning drink for health: Morning tea health effects: Healthy drinks to start the day: अनेकजण चहा-कॉफी, लिंबू पाणी -ग्रीन टी सारखे पेय पिऊन दिवसाची सुरुवात करतात.

What should you start the day with which morning drink is best for health tea or lemon water know the benefits | दिवसाची सुरुवात कशाने करावी? चहा की लिंबू पाणी - काय तब्येतीला जास्त बरे

दिवसाची सुरुवात कशाने करावी? चहा की लिंबू पाणी - काय तब्येतीला जास्त बरे

सकाळी उठल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना चहा-कॉफी किंवा लिंबू पाणी पिण्याची सवय असते.(Healthy drinks to start the day) सकाळीच्या दिवसाची सुरुवात योग्य पदार्थांनी केली नाही तर आरोग्यावर त्याचे परिणाम होतात.(Morning tea health effects) इतकेच नाही तर सकाळी काय खावे आणि प्यावे याकडे आपल्याला अधिक लक्ष द्यायला हवे. (Best morning drink for health)
अनेकजण चहा-कॉफी, लिंबू पाणी -ग्रीन टी सारखे पेय पिऊन दिवसाची सुरुवात करतात.(Which is better in the morning: tea or lemon water?) पण यापैकी कोणते पेय आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे, हे समजायला हवे. रात्रीची ८ ते ९ तासांची झोप घेतल्यानंतर सगळ्यात आधी पोटात काय जायला हवे.(Health benefits of drinking lemon water on an empty stomach) ज्यामुळे दिवसभरात आपल्याला कोणत्याही गोष्टींचा त्रास होणार नाही. याविषयी जाणून घेऊया तज्त्रांकडून. (Is tea good for morning energy?)


प्रमाणापेक्षा जास्त केसगळती-टक्कल पडण्याची भीती वाटते? रोज प्या आयुर्वेदिक ड्रिंक, केसांच्या वाढीसाठी असरदार उपाय

दिवसाची सुरुवात करण्यासाठी पेय 

1. चहा 

तज्ज्ञ म्हणतात दिवसाची सुरुवात सकाळी चहा पिऊन केली तर शरीरातील आम्ल वाढते. ज्यामुळे आपल्या आतड्यांचे नुकसान होते. काही न खाता चहा प्यायल्याने ॲसिडीटी होऊ शकते. त्यासाठी दिवसाची सुरुवात चहाने करु नका. 

2. लिंबू पाणी 

काही लोकांना सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी पिण्याची सवय असते. लिंबू पाणी पचनसंस्थेला चालना देते. तसेच यकृताला देखील आधार मिळतो. लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.

3. ग्रीन टी 

सकाळी ग्रीन टी प्यायल्याने पोट फुगण्याचा त्रास कमी होतो. तसेच त्यात अँटी-ऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात. सकाळी आणि संध्याकाळी ग्रीन टी प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो. 

4. नारळ पाणी 

नारळाच्या पाण्यात भरपूर पोटॅशियम असतात. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते. सकाळी नारळ पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी नारळचे पाणी फायदेशीर आहे. 

5. आल्याचे पाणी 

सकाळी आल्याचे पाणी प्यायल्याने चयापचय वाढते. तसेच शरीराची एकूण रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. यासाठी सकाळी आल्याचे पाणी पिणे केव्हाही चांगले. 

 

Web Title: What should you start the day with which morning drink is best for health tea or lemon water know the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.