Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Trigeminal Neuralgia: सलमान खानला झालेल्या आजाराला ‘suicide disease’ का म्हणतात? कोणाला त्याचा धोका जास्त

Trigeminal Neuralgia: सलमान खानला झालेल्या आजाराला ‘suicide disease’ का म्हणतात? कोणाला त्याचा धोका जास्त

What Is Trigeminal Neuralgia?: सलमान खानला (Salman Khan) काही वर्षांपुर्वी झालेला ट्रायजेमिनल न्युराल्जिया हा आजार नेमका कसा असतो आणि काय त्याची लक्षणं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2025 15:34 IST2025-06-24T15:33:51+5:302025-06-24T15:34:38+5:30

What Is Trigeminal Neuralgia?: सलमान खानला (Salman Khan) काही वर्षांपुर्वी झालेला ट्रायजेमिनल न्युराल्जिया हा आजार नेमका कसा असतो आणि काय त्याची लक्षणं ?

What is trigeminal neuralgia, Salman Khan shares causes and symptoms of trigeminal neuralgia | Trigeminal Neuralgia: सलमान खानला झालेल्या आजाराला ‘suicide disease’ का म्हणतात? कोणाला त्याचा धोका जास्त

Trigeminal Neuralgia: सलमान खानला झालेल्या आजाराला ‘suicide disease’ का म्हणतात? कोणाला त्याचा धोका जास्त

Highlights प्रचंड वेदना होत असल्याने मनुष्य या आजारात कधी कधी स्वत:ला संपविण्याचा विचार करतो. म्हणूनच त्याला सुसाईड डिसिज असंही म्हणतात.

नुकत्याच झालेल्या कपिल शर्मा या शोदरम्यान अभिनेता सलमान खान याने त्याला झालेल्या आजारांविषयी माहिती दिली आणि वरवर फिट दिसणारा हा कलाकार आतल्या आत किती त्रासाला तोंड देत आहे, हे त्याच्या चाहत्यांना समजलं. याआधीही सलमान खानने त्याला झालेल्या Trigeminal Neuralgia या आजाराचा उल्लेख केला हाेता. २०११ साली जेव्हा तो पार्टनर चित्रपटाची शुटिंग करत होता तेव्हा त्याला पहिल्यांदा या आजाराचा त्रास झाला. त्यानंतर त्याने काही महिन्यातच अमेरिकेत जाऊन शस्त्रक्रिया करून घेतली आणि या आजारातून तो बऱ्यापैकी बाहेरही पडला.(What Is Trigeminal Neuralgia?)

 

Trigeminal Neuralgia हा आजार नेमका काय असतो?

आपल्या चेहऱ्यापासून मेंदूपर्यंत सिग्नल पोहोचविणारी एक ट्रायजेमिनल नस असते. या नसेशी संबंधित हा आजार आहे. या आजारात सुरुवातीला असं होतं की तुमच्या चेहऱ्याच्या एखाद्या भागाला हलकासा धक्का लागला किंवा मग थोडासा हात जरी लागला तरी तुम्हाला करंट बसल्यासारख्या तिव्र वेदना होतात.

चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो हवा? बीटरुटचा रस घेऊन 'या' पद्धतीने लावा, त्वचा होईल स्वच्छ, उजळ

ब्रश करणे, चेहरा पुसणे, मेकअप करणे, चावणे अशी कोणतीही क्रिया करताना तुम्हाला कधी तो त्रास होईल ते सांगताच येत नाही. या वेदनांचा ॲटॅक आल्यासारखा होतो आणि तो कधी कधी काही मिनिटे तर कधी कधी काही दिवस सतत होत राहातो. सुरुवातीला क्वचितच कधीतरी होणारा हा त्रास नंतर मात्र वाढतो आणि वारंवार होऊ लागतो.

 

ट्रायजेमिनल न्युराल्जियाचा त्रास कोणाला जास्त?

साधारणे असं आढळून येतं की या आजाराचे प्रमाण पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. तसेच गाल, ओठ, दात, जबडा या भागात हा त्रास सर्वात जास्त होतो.

रातराणीच्या रोपाला फुलांचा बहर येण्यासाठी ३ गोष्टी!  मंद, धुंद सुगंधाने भरून जाईल घर.. 

या आजाराची लक्षणं हीच की सुरुवातीला अगदी बारीक दुखतं, अगदी काही सेकंदासाठी त्रास होतो आणि नंतर पुन्हा सगळं काही नॉर्मल होऊन जातं. काही जणांना तर हसताना, रडताना, चेहरा धुताना, चेहऱ्यावर हात लावतानाही हा त्रास होतो. चेहऱ्याला थोडं जोरात वारं लागलं तरीही दुखतं. प्रचंड वेदना होत असल्याने मनुष्य या आजारात कधी कधी स्वत:ला संपविण्याचा विचार करतो. म्हणूनच त्याला सुसाईड डिसिज असंही म्हणतात. पण योग्य औषधोपचार घेतले तर हा आजार नक्कीच बरा होण्यासारखा आहे.

 

Web Title: What is trigeminal neuralgia, Salman Khan shares causes and symptoms of trigeminal neuralgia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.