Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डायबिटीस राहील नियंत्रणात, फक्त फॉलो करा १०-१०-१० चा नियम - पोषणतज्ज्ञ सांगतात ३ गोष्टी कराच...

डायबिटीस राहील नियंत्रणात, फक्त फॉलो करा १०-१०-१० चा नियम - पोषणतज्ज्ञ सांगतात ३ गोष्टी कराच...

what is the best way to fight diabetes nutritionist shares easy rule : best way to fight diabetes naturally : how to control diabetes with diet : how to control diabetes 10-10-10 health rule : डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी १०-१०-१० चा नियम म्हणजे नक्की काय ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2025 17:33 IST2025-09-13T17:08:15+5:302025-09-13T17:33:43+5:30

what is the best way to fight diabetes nutritionist shares easy rule : best way to fight diabetes naturally : how to control diabetes with diet : how to control diabetes 10-10-10 health rule : डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी १०-१०-१० चा नियम म्हणजे नक्की काय ते पाहा...

what is the best way to fight diabetes nutritionist shares easy rule best way to fight diabetes naturally how to control diabetes with diet how to control diabetes 10-10-10 health rule | डायबिटीस राहील नियंत्रणात, फक्त फॉलो करा १०-१०-१० चा नियम - पोषणतज्ज्ञ सांगतात ३ गोष्टी कराच...

डायबिटीस राहील नियंत्रणात, फक्त फॉलो करा १०-१०-१० चा नियम - पोषणतज्ज्ञ सांगतात ३ गोष्टी कराच...

आजकाल डायबिटीस ही फारच कॉमन समस्या झाली आहे. अगदी लहान मुलांपासून ते तरुण वयातील व्यक्तींना कोणालाही डायबिटीस होण्याची शक्यता असते. सध्याची बदललेली लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे डायबिटीस होण्याचा धोका वाढतो. हा आजार एकदा झाला की तो पूर्णपणे (what is the best way to fight diabetes nutritionist shares easy rule) बरा होत नाही, पण योग्य काळजी घेतल्यास आणि नेहमीच्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल केल्यास तो नक्कीच नियंत्रणात ठेवता येतो. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि काही सोप्या लाईफस्टाईलमधील बदलांमुळे डायबिटीस सहज नियंत्रणात (best way to fight diabetes naturally) ठेवता येतो. रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या आणि सोप्या पद्धतीने नियंत्रणात ठेवायची असेल तर काही खास नियम आणि सवयी स्वतःला लावून घेणे फायदेशीर ठरते(how to control diabetes 10-10-10 health rule).

सध्या कमी वयातच अनेकजण या गंभीर आजाराच्या विळख्यात सापडत आहेत. अशा परिस्थितीत, आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. विशेषतः जर तुमच्या घरात आधीच कोणाला मधुमेह असेल, तर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी काही खास टिप्स पाहूयात. नुकतेच प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत, जे नैसर्गिकरित्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवू शकतात. त्यांनी याला '१०-१०-१० नियम' (10-10-10 Rule) असे नाव दिले आहे. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी १०-१०-१० चा नियम म्हणजे नक्की काय ते पाहूयात... 

डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी १०-१०-१० चा नियम करा फॉलो...  

१. दर ४५ मिनिटांनी १० स्क्वॅट्स करा :- पोषणतज्ज्ञ सांगतात की, जास्त वेळ एकाच जागेवर बसून राहिल्याने किंवा कोणतीही शारीरिक हालचाल न केल्याने आपले स्नायू ग्लुकोजचा योग्य वापर करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, लीमा महाजन दर ४५ मिनिटांनी फक्त १० स्क्वॅट्स करण्याचा सल्ला देतात. यामुळे पायांमधील स्नायूंची हालचाल होते, जे रक्तातील साखर शोषून घेऊन ऊर्जेच्या रूपात वापरले जातात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

५ वर्षांपासून लहान मुलांची स्मरणशक्ती व बुद्धी होईल तल्लख! पालकांनी कराव्यात ३ गोष्टी - साध्या आणि सोप्या...

२. जेवणानंतर १० मिनिटे चाला :- पोषणतज्ञ सांगतात की, जेवणानंतर रक्तातील साखर वेगाने वाढते. परंतु, एका अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, जेवणानंतर फक्त १० मिनिटे फिरल्याने रक्तातील साखर सुमारे २२ मिग्रॅ/डीएल (mg/dL) पर्यंत कमी होऊ शकते. चालल्यामुळे स्नायू लगेच ग्लुकोज शोषून घेतात आणि रक्तातील साखर अचानकपणे वाढत नाही. ही सवय शरीरात कोलेस्टेरॉल आणि चरबी देखील जमा होऊ देत नाही. यासाठीच, प्रत्येक जेवणानंतर किमान १० मिनिटे तरी चाला.

३. रात्री १० वाजायच्या आधी झोपा :- रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने शरीरात स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलची पातळी वाढते, ज्यामुळे रक्तातील साखर आणि रक्तदाब देखील वाढू शकतो. याउलट, जर तुम्ही दररोज वेळेवर झोपायची सवय लावली, तर हार्मोन्स संतुलित राहतात, इन्सुलिन चांगले कार्य करते आणि रात्रभर साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतरची झोप आवरत नाही ? टिफिनमध्ये न्या २ पदार्थ - झोप अजिबातच येणार नाही... 

४. योग्य आहार देखील तितकाच आवश्यक... 

या सर्वांव्यतिरिक्त लीमा महाजन सांगतात की, फक्त व्यायामच नाही तर आहाराची देखील मोठी भूमिका असते. व्हाईट ब्रेड किंवा मैदाऐवजी ब्राऊन राइस, ओट्स आणि मिलेट्स खा. भाज्या, फळे आणि डाळी जास्त प्रमाणात खा, जेणेकरून फायबरमुळे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढेल. यासोबतच, गोड पेये आणि जास्त साखर असलेल्या पदार्थांपासून दूर राहा. पोषणतज्ज्ञ म्हणतात की, मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप कठीण किंवा कठोर डाएट फॉलो करण्याची गरज नाही. फक्त दिवसभर थोडा व्यायाम, वेळेवर झोप आणि योग्य आहार घेतल्यानेही डायबिटीस नियंत्रणात राहू शकते.


Web Title: what is the best way to fight diabetes nutritionist shares easy rule best way to fight diabetes naturally how to control diabetes with diet how to control diabetes 10-10-10 health rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.