Join us

पाणी पिण्याची कसं, कधी प्यावं? डॉक्टर सांगतात योग्य पद्धत, प्रत्येक अवयवाला होईल फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 21:42 IST

What Is Right Way To Drink Water : हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की तुम्ही पाणी किती पिता, त्याचप्रमाणे कसं पिता हे सुद्धा महत्वाचं असतं. पाणी कसं, किती प्यावं हे समजून घेऊ. 

पाणी (Drinking Water) तुम्ही कधी आणि कसं पिता हे फार महत्वाचं असतं. कारण बऱ्याच लोकांना पाणी पिण्याची योग्य पद्धत माहिती नसते. ज्यामुळे पाणी पिण्याचा पुरेपूर फायदा मिळत नाही. पाणी फक्त तहान भागवण्यासाठीच नाही तर आरोग्य चांगले ठेवण्यासाठीसुद्धा प्यायलं जातं. हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की तुम्ही पाणी किती पिता, त्याचप्रमाणे कसं पिता हे सुद्धा महत्वाचं असतं. पाणी कसं, किती प्यावं हे समजून घेऊ.  (What Is Right Way To Drink Water)

हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते पाणी पिण्याचे काही नियम असतात जे फॉलो केल्यास फक्त आजारांपासून बचाव होत नाहीतर तुम्ही वयापेक्षा कमी वयाचे दिसाल. हेल्थ एक्सपर्ट्स डॉ. निकिता यांनी सांगितले पाणी पिण्याची योग्य पद्धत  आणि फायदे सांगितले आहेत.

डॉ. निकिता यांच्यामते शरीरात ७० टक्के पाणी असते म्हणून शरीरासाठी पाणी खूप आवश्यक आहे. पाणी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं पिऊ शकता. एक्सपर्ट्स सांगतात की पाणी नेहमी जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा जेवल्यानंतर  अर्ध्या तासानं प्यावं.  जर तुम्ही जेवताना पाणी प्यायलात तर मेटाबॉलिझ्म कमकुवत हतो. ज्यामुळे एसिडीटी, ब्लॉटिंग, गॅसची समस्या उद्भवते. चुकीच्या पद्धतीनं पाणी प्यायल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.पाणी नेहमी बसून प्यायला हवं. 

उभं राहून पाणी प्यायल्यानं शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन बिघडते आणि शरीरातील पाण्याचे  अवशोषण प्रभावित होते. बसून पाणी प्यायल्यानं पाणी व्यवस्थित पचते. पाणी नेहमी घोटून प्यायला हवं. एकदाच जास्त पाणी पिऊ नका. पाणी हळूहळू प्या. छोट्या छोट्या सिपमध्ये पाणी प्या. यामुळे रक्त आणि गॅस्ट्रिक रस पातळ होत नाही. पचन चांगले राहते. 

पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

पाणी झोपेतून उठल्यानंतर प्यावं. सकाळी एक ते दोन ग्लास पाणी प्या. जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर एक ग्लास पाणी प्या. जेणेकरून पाचक रस तयार होईल. व्यायामाच्या आधी आणि व्यायामानंतर पाणी प्या. याशिवाय तहान लागल्यानंतरच पाणी प्या. दिवसाला कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्यायलाच हवं. ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Drink Water Right: Doctor's Advice for Maximum Health Benefits

Web Summary : Proper hydration is vital. Drink water sitting down, in small sips, before or after meals, not during. This aids digestion, prevents acidity, and maximizes health benefits. Aim for 8-10 glasses daily, especially after waking and exercising, to support weight loss.
टॅग्स : हेल्थ टिप्सलाइफस्टाइल