Peripheral vascular disease : हार्ट अटॅक येण्याची कारणं वेगवेगळी असतात. चुकीची लाइफस्टाईल, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉल, नसा ब्लॉक होणे अशा वेगवेगळ्या कारणांनी हार्ट अटॅक येऊ शकतो. हार्ट अटॅकची ही कॉमन कारणं लोकांना माहीत असतात. पण एक असं कारण आहे, ज्याबाबत लोकांना फार माहिती नाही. महत्वाची बाब म्हणजे अनेकांना हार्ट अटॅकचं कारण ठरणारी ही समस्या असते, पण त्यांना त्याबाबत माहीत नसतं. याच समस्येबाबत डॉक्टरांनी आता इशारा दिला आहे.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या वैज्ञानिकांनी एका अशा स्थितीबाबत सांगितलं ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो वैज्ञानिकांना सांगितलं की, पीवीडी म्हणजेच पेरिफेरल वस्कुलर डिजीजबाबत लोकांना फार जास्त माहीत नाही आणि त्याबाबत जास्त काही शोधलंही गेलं नाही. एका आकडेवारीनुसार, अमेरिकेत १ कोटी लोकांना हा आजार आहे. खासकरून महिलांची संख्या यात खूप जास्त आहे.
महिलांना अधिक धोका
डेलीमेलच्या एका रिपोर्टनुसार, लाखो महिला वस्कुलर डिजीजच्या शिकार आहेत. पण त्यांना तो आजार असल्याचं कळतही नाही. एका रिसर्चनुसार, महिला या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे डॉक्टरांनाही त्याबाबत समजत नाही.
रिपोर्टनुसार, पीवीडीचा धोका महिलांना पुरूषांच्या दुप्पट असतो. कारण याच्या सामान्य लक्षणांबाबत फारसं कुणाला माहीत नसतं. जसे की, चालताना वेदना होणे.
काय आहे पीवीडी?
पीवीडी पेरिफेरल आर्टरी डिजीजचा (पीएडी) एक प्रकार आहे. पीवीडीमध्ये आर्टरी म्हणजे धमण्या आंकुचन पावतात, ज्यामुळे शरीरातील इतर अवयवांपर्यंत रक्त पोहोचत नाही. त्यामुळे मेंदू किंवा हृदयामध्ये रक्त पुरवठा थांबतो. या स्थितीत हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो.
पीएडीची लक्षणं
पीएडी झाल्यास पायांमध्ये बदल आढळून येतो. चालताना वेदना होणे, पायांवरील केस जाणे, पाय कमजोर होणे, तळपाय थंड किंवा सुन्न पडणे हे या समस्येचे संकेत असू शकतात.