Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हृतिक रोशनची गर्लफ्रेन्ड सबाला भाज्यांमुळे झालं गंभीर इन्फेक्शन, १४ दिवसांपासून दवाखान्यात ॲडमिट

हृतिक रोशनची गर्लफ्रेन्ड सबाला भाज्यांमुळे झालं गंभीर इन्फेक्शन, १४ दिवसांपासून दवाखान्यात ॲडमिट

What is Cyclospora Cayetanesis : सबाने तिला झालेल्या इन्फेक्शनबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली जेणेकरून लोकांना सुद्धा हे इन्फेक्शन नेमकं काय, कशामुळे होतं हे कळावं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 14:18 IST2026-03-28T13:02:16+5:302026-03-28T14:18:01+5:30

What is Cyclospora Cayetanesis : सबाने तिला झालेल्या इन्फेक्शनबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली जेणेकरून लोकांना सुद्धा हे इन्फेक्शन नेमकं काय, कशामुळे होतं हे कळावं.

What is cyclospora cayetanensis Hrithik Roshan girlfriend Saba Azad suffering from this infection | हृतिक रोशनची गर्लफ्रेन्ड सबाला भाज्यांमुळे झालं गंभीर इन्फेक्शन, १४ दिवसांपासून दवाखान्यात ॲडमिट

हृतिक रोशनची गर्लफ्रेन्ड सबाला भाज्यांमुळे झालं गंभीर इन्फेक्शन, १४ दिवसांपासून दवाखान्यात ॲडमिट

What is Cyclospora Cayetanesis : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेन्ड सबा आझाद सध्या तिला झालेल्या एका वेगळ्याच इन्फेक्शनमुळे चर्चेत आहे. सबाला झालेल्या इन्फेक्शनला सायक्लोस्पोरा कॅटेनेसिस (Cyclospora cayetanesis) म्हणतात. ज्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. सबाने तिला झालेल्या इन्फेक्शनबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली जेणेकरून लोकांना सुद्धा हे इन्फेक्शन नेमकं काय, कशामुळे होतं हे कळावं. चला तर पाहुयात काय आहे हे सायक्लोस्पोरा कॅटेनेसिस इन्फेक्शन.

सबाने इन्स्टाग्रावर फोटो शेअर करत तिला झालेल्या या इन्फेक्शनची माहिती दिली. सबाने सांगितलं की, या इन्फेक्शनमुळे १४ दिवसात तिचं ४ किलो वजन कमी झालं. ज्यामुळे तिचं चालणं-फिरणं तर दूरच, तिला टूथपिकही उचलणं अवघड झालं आहे. 

काय आहे सायक्लोस्पोरा कॅटेनेसिस इन्फेक्शन?

सायक्लोस्पोरा कॅटेनेसिस इन्फेक्शन हे पॅरेसाइट सायक्लोस्पोरा कॅटेनेसिसमुळे होतं. या आजाराचं इन्फेक्शन हे सामान्य ते गंभीर होऊ शकतं. हे एकप्रकारचं फूड पॉयझनिंग आहे. कच्च्या भाज्या, सॅलेड खाल्ल्याने किंवा दुषित पाण्यानं हा त्रास होऊ शकतो. त्यावर असलेल्या सुक्ष्मजीवींमुळे पोट बिघडू शकतं.

काय असतात याची लक्षणं?

जुलाब

भूक न लागणे

पोट फुगणे / गॅस

खूप कमजोरी

हलका ताप

उलटी

चक्कर येणे

पोटात वेदना किंवा आकडी

१४ दिवसात घटलं ४ किलो वजन  


सबाने पुढे पोस्टमध्ये लिहिलं की, 'माझ्या जीवनातील सगळ्यात वाईट १४ दिवस. सायक्लोस्पोरा कॅटेनेसिस फार वाईट आणि खतरनाक आहे. माझ्यासारखी मुलगी जी फक्त घरचं जेवण करते आणि सगळीकडे आपली पाण्याची बॉटल घेऊन जाते, तिला पोटातील या कीटकाने घेरलं. मी खूप बिझी असताना हे झालं. दोन आठवड्यात माझं ४ किलो वजन कमी झालं. माझं वजन कधी जास्त नव्हतंच. मला व्यवस्थित चालताही येत नाहीये. हे व्हायच्या आधी मी दिवसातून दोनदा ट्रेनिंग करत होते, पुल अप्स करत होते, वजन उचलत होते आणि आता मी अर्धी झालीये'. 

पुढे लिहिते की, 'जर आपल्याला आपल्या पोटावर प्रेम असेल तर प्लीज सॅलेडमध्ये घालता त्या भाज्या, पानं चांगल्या धुवा. भाज्या धुण्यासाठी एक उपाय आहे बेकिंग सोडा आणि व्हेजिटेबल वॉश. या वाईट दिवसांमध्ये माझा मूड चांगला ठेवण्यासाठी हृतिक रोशनचे धन्यवाद. मी जेवढी बारीक दिसतेय, तेवढी नाहीये. बेड मोठा आणि रूंदही आहे'.

Web Title : सायक्लोस्पोरा संक्रमण से सबा आज़ाद बीमार: लक्षण और जानकारी

Web Summary : सबा आज़ाद सायक्लोस्पोरा संक्रमण के कारण अस्पताल में भर्ती। इस संक्रमण में दस्त, उल्टी और कमजोरी जैसे लक्षण होते हैं। सबा ने संक्रमण से बचने के लिए सब्जियों को अच्छी तरह धोने की सलाह दी और ऋतिक रोशन को धन्यवाद दिया।

Web Title : Cyclospora Infection Sidelines Saba Azad: Details and Symptoms

Web Summary : Saba Azad's Cyclospora Cayetanesis infection led to hospitalization and weight loss. The infection, a form of food poisoning, causes symptoms like diarrhea, vomiting, and weakness. She emphasized washing vegetables thoroughly to prevent infection and thanked Hrithik Roshan for his support.