Join us
Daily Top 2 Weekly Top 5

काय आहे कॅस्टर ऑइल बेली पॅच ट्रेंड, खरंच याने काही फायदे मिळतात की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:21 IST

Castor Oil Belly Patch Trend : दावा केला जात की हा उपाय पचन सुधारण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी मदत करतो. पण हा ट्रेंड खरोखर प्रभावी आहे की फक्त एक मिथक आहे, ते जाणून घेऊया.

Castor Oil Belly Patch Trend : आजच्या काळात हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करणं जितकी महत्त्वाची झाली आहे, तितकीच ती पाळणंही कठीण झाली आहे. सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, हेल्दी आहार घेणे आणि वेळेवर झोपणे अशा गोष्टी अनेकदा फक्त प्लॅनिंगपर्यंतच मर्यादित राहतात. अशा परिस्थितीत लोक सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वेलनेस हॅक्सकडेही वेगाने आकर्षित होत आहेत. अशाच ट्रेंडपैकी एक म्हणजे सध्या चर्चेत असलेला कॅस्टर ऑइल बेली पॅच. दावा केला जात की हा उपाय पचन सुधारण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी मदत करतो. पण हा ट्रेंड खरोखर प्रभावी आहे की फक्त एक मिथक आहे, ते जाणून घेऊया.

कॅस्टर ऑइल बेली पॅच काय आहे?

या ट्रेंडमध्ये कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडेल तेल कापसावर किंवा कापडावर लावून ते नाभीच्या आसपासच्या भागावर ठेवलं जातं. त्यानंतर टेप किंवा कापडाने ते फिक्स केलं जातं आणि काही तास किंवा पूर्ण रात्र तसेच ठेवलं जातं. काही लोक हा उपाय आठवड्यात ४ ते ७ वेळा करण्याचीही शिफारस करतात.

आयुर्वेद काय सांगते?

आयुर्वेदानुसार पोटाच्या आसपासचा भाग पचनाग्नीशी संबंधित मानला जातो. पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यात या भागाची महत्त्वाची भूमिका असते. काही तज्ज्ञांच्या मते, हा उपाय केल्याने काही लोकांना पचनात थोडा सुधार, बद्धकोष्ठतेपासून आराम, सूज कमी होणे आणि मासिक पाळीच्या वेदनांमध्ये आराम मिळू शकतो. मात्र याला उपचार नाही तर फक्त पूरक उपाय मानले जाते.

मेडिकल एक्सपर्ट्सचे मत

वैद्यकीय तज्ज्ञ या ट्रेंडबाबतचे दावे मान्य करत नाहीत. त्यांच्या मते, आपल्या त्वचेची रचना अशी असते की बाहेरून लावलेले तेल शरीराच्या आत खोलवर पोहोचत नाही. त्यामुळे पोटावर लावलेले कॅस्टर ऑइल पचनसंस्था किंवा हार्मोन्सवर परिणाम करते, याचे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. काही वेळा लोकांना जो आराम जाणवतो, तो प्लेसिबो इफेक्ट किंवा उबेमुळेही असू शकतो.

कुणी टाळावे?

संवेदनशील त्वचा असलेल्यांनी हा उपाय टाळावा. ज्यांना अॅलर्जी किंवा त्वचेचे आजार आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गर्भवती महिलांनी हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जर वारंवार पोट फुगणे, अपचन किंवा पचनासंबंधी त्रास होत असेल, तर फक्त सोशल मीडिया ट्रेंडवर अवलंबून राहू नये.

खालील गोष्टी अधिक महत्त्वाच्या

संतुलित आणि फायबरयुक्त आहार

पुरेसे पाणी पिणे

नियमित शारीरिक हालचाल

ताणतणाव कमी ठेवणे

जर समस्या कायम राहिली, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे अधिक योग्य ठरते.

English
हिंदी सारांश
Web Title : Castor Oil Belly Patch Trend: Does It Really Work?

Web Summary : The castor oil belly patch trend, promoted for digestion and detox, involves applying castor oil to the navel area. While some claim benefits, experts cite a lack of scientific evidence and suggest caution, especially for sensitive skin and pregnant women. Prioritize diet, exercise, and consult doctors for persistent issues.
टॅग्स : हेल्थ टिप्ससोशल व्हायरल