lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > समजा, साखर पूर्णच बंद केली तर तब्येतीवर वाईट परिणाम होतात का?

समजा, साखर पूर्णच बंद केली तर तब्येतीवर वाईट परिणाम होतात का?

What Happens When You Stop Eating Sugar साखर कमी केली किंवा पूर्ण बंदच केली तर आपल्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2023 01:25 PM2023-04-26T13:25:14+5:302023-04-26T13:25:53+5:30

What Happens When You Stop Eating Sugar साखर कमी केली किंवा पूर्ण बंदच केली तर आपल्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो?

What Happens When You Stop Eating Sugar | समजा, साखर पूर्णच बंद केली तर तब्येतीवर वाईट परिणाम होतात का?

समजा, साखर पूर्णच बंद केली तर तब्येतीवर वाईट परिणाम होतात का?

बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे अनेकांचं जीवनचक्र बदलेलं आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे विविध आजार होतात.स्वतःच्या डाएट व व्यायामाकडे लक्ष द्यायला लोकांना जमत नाही. डाएट फॉलो करत असताना सर्वप्रथम तज्ज्ञ आपल्याला साखर सोडण्याचा सल्ला देतात. साखर खाल्ल्याने शरीरात अनेक आजार  होतात, चरबी देखील वाढते. त्यामुळे डाएटमध्ये साखरेचं प्रमाण कितपत असावे? डाएटमध्ये साखरेचा समावेश करायचा की नाही? आहारातून साखर वगळावी का?

डायबिटिज न्यूट्रिशनिस्ट रिध्दिमा बत्रा सांगतात, ''आपल्याला साखरेपासून कोणतेही पौष्टीक घटक मिळत नाही. आपल्या शरीराला साखरेपासून फक्त कॅलरी मिळतात. आपल्या शरीराला साखरेच्या कॅलरीची अजिबात गरज नसते. साखरेचा आपल्या शरीराला काही फायदा होत नाही, उलट ती खाणे म्हणजे व्यसनच आहे.

लघवीचा रंग बदलला, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा! तज्ज्ञ सांगतात, लघवीचा रंग आणि आजारांचा धोका

हे इन्शुलीन हार्मोन वाढवते ज्यामुळे शरीरात चरबी वाढते. रिफांइड साखर आपल्या आहारातून पूर्णपणे वगळली पाहिजे.ती फक्त शरीराचे नुकसान करते. साखरेमुळे मुरुम, लठ्ठपणा, हृदयाशी संबंधित आजार उद्भवण्याची शक्यता असते''(What Happens When You Stop Eating Sugar).

नखांवर नखं घासल्याने केसांची वाढ खरंच होते? काय खरं आणि काय खोटं, तज्ज्ञ सांगतात..

साखर वगळली तर?

रिफांइड साखरेऐवजी आपण आहारात कोकोनट शुगर, खजूर, अंजीर, गुळ, बदाम, खाऊ शकतो. हे पदार्थ खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात. गोडवा तर मिळतोच यासह विविध आरोग्यदायी फायदे देखील मिळतात. ज्यांना उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, वाढलेले यूरिकॲसिड, किंवा जे लोकं मेटाबॉलिक डिस्फंक्शनने ग्रस्त आहे, त्यांनी हे पदार्थ खावेत.

Web Title: What Happens When You Stop Eating Sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.