Join us

चहा प्यायल्याशिवाय दिवसच सुरू होत नाही ना? बघा त्याचे शरीरावर काय परिणाम होतात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2025 13:08 IST

What Happens When You Start Your Day With A Cup Of Tea: चहा पिऊन दिवसाची सुरुवात करण्याची सवय तुम्हालाही असेल तर पुढे सांगितलेली माहिती वाचायलाच हवी..(side effects of having tea as your first drink on empty stomach in morning)

ठळक मुद्दे आहारतज्ज्ञांच्या मते नाश्ता झाल्यानंतर एखाद्या तासाने किंवा मग दुपारी ४ ते ५ ही वेळ चहा पिण्यासाठी योग्य आहे. 

भारत हा चहाप्रिय लोकांचा देश. इथे प्रत्येक गोष्टीला चहा लागतोच.. भारतातले ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोक असे आहेत, ज्यांच्या दिवसाची सुरुवात चहा पिऊनच होते. सकाळी झोपेतून उठताच त्यांना चहा लागतो आणि मगच काय तो त्यांचा दिवस सुरू होतो. सकाळचा चहा जर लवकर मिळाला नाही तर अनेकांना डोकं जड पडल्यासारखं वाटायला लागतं. तुमचंही असंच असेल आणि चहाशिवाय तुमचाही दिवस सुरू होत नसेल तर तज्ज्ञांनी सांगितलेली ही काही माहिती वाचा आणि चहाचा तुमच्या शरीरावर कसा परिणाम होत जातो ते पाहा..(side effects of having tea as your first drink on empty stomach in morning)

चहा पिऊन दिवसाची सुरुवात केल्याने आरोग्यावर होणारे परिणाम

 

सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण उपाशीपोटी सगळ्यात आधी चहा घेतो तेव्हा आपल्या शरीरात ॲसिड तयार होण्याची क्रिया अधिक जलद होते. त्यामुळे चहा घेऊन दिवसाची सुरुवात करणाऱ्या कित्येकांना नेहमीच ॲसिडीटीचा त्रास होतो. पण तो त्रास चहामुळे होतो आहे, हेच आपल्या लक्षात येत नाही.

Navratri 2025: नवरात्रीसाठी अखंड वात तयार करताना ३ गोष्टी लक्षात ठेवा, दिवा अखंड तेवत राहील...

चहामध्ये असणारे टॅनिन अन्नपदार्थांमधील लोह रक्तात मिसळू देण्यास अडथळा निर्माण करतं. त्यामुळे ज्या व्यक्तींचं हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं त्यांच्या ॲनिमियामागचं कारण चहा हे देखील असू शकतं.

 

चहामध्ये टॅनिन आणि इतर काही घटक असे असतात जे शरीरातलं पाणी बाहेर टाकतात. त्यामुळेच काही जणांना चहा प्यायल्यानंतर वारंवार लघवीला जावे लागते. यामुळे शरीरातलं पाणी कमी होऊन डिहायड्रेशनचा त्रासही होऊ शकतो.

शरीरातलं HB खूप कमी झालंय हे सांगणारी ५ लक्षणं, वेळीच ओळखा आणि तब्येत सांभाळा

आहारतज्ज्ञ रुपाली दत्ता असं सांगतात की चहाचा परिणाम तुमच्या एनर्जीवरही होतो. चहा प्यायल्यानंतर त्यातल्या टॅनिन आणि कॅफीनमुळे काही वेळासाठी एनर्जी वाढल्यासारखी वाटते. पण तेवढ्याच जलद ती कमीसुद्धा होते. त्यामुळे मग लगेचच थकवा आल्यासारखं होतं. त्यामुळे आहारतज्ज्ञांच्या मते नाश्ता झाल्यानंतर एखाद्या तासाने किंवा मग दुपारी ४ ते ५ ही वेळ चहा पिण्यासाठी योग्य आहे.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स