पदार्थाची चव वाढवण्यासाठी वेलची सुगंधाचं आणि चवीचं प्रतीक मानलं जातं. हिरवी वेलची जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात आढळणारा मसाला आहे.(cardamom benefits) याचा वापर आपण पदार्थांची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी केला जातो.(cardamom for digestion) आयुर्वेदानुसार वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटीइन्फ्लेमेटरी आणि डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात.(health benefits of cardamom) जे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यास मदत करतात. पचनसंस्था मजबूत ठेवतात. (benefits of eating cardamom daily) प्रसिद्ध योग गुरु हंसा योगेंद्र म्हणतात जर आपण रोज १५ दिवस हिरवी वेलची खाल्ली तर आपल्या शरीरात अनेक बदल आपल्याला पाहायला मिळतील.(cardamom for gas and acidity) नियमितपणे हिरवी वेलची खाल्ल्यास आरोग्याला कसा फायदा होतो पाहूया.(natural home remedies for digestion)
फक्त १० मिनिटांत करा लक्ष्मीनारायण चिवडा! मार्केटसारखी चव, घरचे म्हणतील पुन्हा कर ना..
1. वेलचीत अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे तोंडाची दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया मारतात. नियमितपणे वेलची खाल्ल्यास श्वास ताजा होण्यास आणि नैसर्गिकरित्या तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल.
2. वातावरणातील बदलामुळे सध्या अनेकांना सर्दी-खोकल्यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी वेलची खाल्ल्यास फायदेशीर ठरु शकते. वेलची आपल्या छातीतला कफ वितळवण्यास मदत करते. छातीतील रक्तसंचय कमी करते आणि श्वास घेण्यास मदत करते.
3. वेलचीमुळे पचनक्रिया देखील सुधारते. हा छोटासा मसाला आपली पाचक एंजाइम सक्रिय करतो. जेवणानंतर एक किंवा दोन वेलची चावून खाल्ल्याने गॅस, जडपणा आणि पोटफुगी कमी होण्यास मदत होते. अन्न लवकर पचते आणि पोट हलके वाटते.
4. वेलची आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. वेलचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीरातून अतिरिक्त पाणी आणि मीठ काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते.
5. हंसा योगेंद्र म्हणतात की, जेवल्यानंतर रोज २ वेलची चावून खाणं चांगले. वेलची पावडर, मध, लिंबू आणि थोडी काळी मिरी पावडर मिसळून आपण त्याचा ज्यूस बनवू शकतो. खोकल्यासाठी हे औषध म्हणून चांगले आहे. तसेच याचा हर्बल चहा पिणे देखील फायदेशीर ठरु शकते.
Web Summary : Cardamom boasts antioxidants, fights bad breath, and aids digestion. It helps with coughs, clears congestion, and may regulate blood pressure. Eating cardamom daily promotes overall well-being and fresh breath.
Web Summary : इलायची एंटीऑक्सीडेंट से भरपूर है, सांसों की दुर्गंध से लड़ती है और पाचन में सहायता करती है। यह खांसी में मदद करती है, जमाव को दूर करती है और रक्तचाप को नियंत्रित कर सकती है। रोजाना इलायची खाने से समग्र कल्याण और ताज़ी सांस को बढ़ावा मिलता है।