lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > घामामुळे शरीराला दुर्गंधी येते? ४ पैकी १ गोष्ट रोज खा; उन्हाळ्यातही परफ्यूमची गरज पडणार नाही..

घामामुळे शरीराला दुर्गंधी येते? ४ पैकी १ गोष्ट रोज खा; उन्हाळ्यातही परफ्यूमची गरज पडणार नाही..

What foods make you smell better : आंघोळ-परफ्यूमचा वापर करूनही दुर्गंधी जात नसेल तर, ४ गोष्टी खा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2024 06:08 PM2024-04-21T18:08:16+5:302024-04-22T19:07:51+5:30

What foods make you smell better : आंघोळ-परफ्यूमचा वापर करूनही दुर्गंधी जात नसेल तर, ४ गोष्टी खा..

What foods make you smell better? | घामामुळे शरीराला दुर्गंधी येते? ४ पैकी १ गोष्ट रोज खा; उन्हाळ्यातही परफ्यूमची गरज पडणार नाही..

घामामुळे शरीराला दुर्गंधी येते? ४ पैकी १ गोष्ट रोज खा; उन्हाळ्यातही परफ्यूमची गरज पडणार नाही..

शरीराचे तापमान संतुलित राहावे यासाठी आपल्याला घाम येत असतो (Summer Special). घामामुळे शरीरातील हानीकारक घटक बाहेर पडतात. पण घामामुळे आपल्या अंगाला दुर्गंधीदेखील येते (Foods For Good Smell). शिवाय घामामुळे कपडे देखील खराब होतात (Summer Special). घामातून दुर्गंधी येऊ लागल्याने आपल्याला चारचौघात लाजिरवाणे वाटते. उन्हाळ्यामध्ये ही समस्या वाढते.

हा त्रास दूर व्हावा म्हणून आपण शरीराला कायम डिओड्रेंट किंवा परफ्यूमचा वापर करत असतो. पण याच्या अधिक वापरामुळे त्वचा खराब होऊ शकते. किंवा इन्फेक्शन निर्माण होऊ शकते. जर आपल्या अंगाला दुर्गंधी येऊ नये असे वाटत असेल तर, आहारात ४ गोष्टींचा समावेश करा. यामुळे आरोग्य सुधारेल. शिवाय शरीरातून वाहणाऱ्या घामातून दुर्गंधीही येणार नाही(What foods make you smell better?).

शरीराच्या घामातून दुर्गंधी येऊ नये म्हणून..

फळे

बऱ्याचदा आंघोळ केल्यानंतर किंवा परफ्यूम लावूनही घामातून येणारी दुर्गंधी येणं कमी होत नाही. ही दुर्गंधी घालवण्यासाठी आपण व्हिटॅमिन सीयुक्त फळांचा आहारात समावेश करू शकता. मोसंबी, लिंबू, द्राक्षे इत्यादी लिंबूवर्गीय फळे खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळे शरीरात वास निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाची वाढ कमी होईल.

झाडांवर बुरशी - कीड पडते? भाज्यांच्या सालींचा कुंडीत करून पाहा 'असा' वापर; रोप इतके वाढेल की..

फायबर रिच फुड्स

सकाळची सुरुवात फायबरयुक्त पदार्थांनी करा. फायबरयुक्त पदार्थ पचायला हलके असतात. शिवाय उन्हाळ्यात जड वाटत नाही. यासोबतच फायबरयुक्त पदार्थ वेट लॉससाठी मदत करतात. जर उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य राहावे असे वाटत असेल तर, फायबरयुक्त पदार्थ रोज खा.

वेलची

वेलची फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठी नसून, शरीराचे गंध संतुलित ठेवण्यासही मदत करते. वेलची फक्त श्वासाच्या दुर्गंधीशी लढत नाही तर, शरीराच्या दुर्गंधीशी देखील लढते. यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आहे. ज्यामुळे शरीरातून येणाऱ्या घामातून दुर्गंधी येणार नाही.

पोलीस कॉन्स्टेबलच्या बहिणीची लग्नपत्रिका व्हायरल; लग्नात नक्की या पण, मतदान..

पालेभाज्या

पालेभाज्या फक्त आरोग्यासाठी नसून, शरीरातून येणाऱ्या दुर्गंधीपासून मुक्त करते. यासाठी आहारात ओव्याचे पान, पालक, केळी खा. हे पदार्थ आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे देतात. शिवाय शरीरात दुर्गंधी निर्माण करणारे घटक नष्ट करतात.

Web Title: What foods make you smell better?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.