Join us

बसून राहिल्यामुळे हातापायाला सुज येण्यामागे नक्की काय कारणे असतात? पाहा कोणता आजार तर नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2025 15:45 IST

What exactly are the causes of swelling in the hands and feet due to sitting? Let's see what disease it is. health care tips : हातापायाला सारखी सुज येण्यामागे नक्की काय कारणे असतात ते जाणून घ्या.

काहीही न करता नुसते बसून राहिल्यावर पायाला सुज येते. ही समस्या अगदी सामान्य आहे. त्याची कारणेही आपण जाणून आहोतच. सध्या अनेक कामे ही डेस्कवर बसूनच करावी लागतात. (What exactly are the causes of swelling in the hands and feet due to sitting? Let's see what disease it is. health care tips)दिवसातून किमान आठ ते नऊ तास एकाच जागी बसून काम करावे लागते. त्याच प्रमाणे एसीही चालू असतोच. त्यामुळेही हाता- पायाला सुज येते. वर्क फ्रॉम होम असल्यावर घरीच बसून काम होते. त्यामुळे चालणे होत नाही. सतत बसून असल्यामुळे शरीराची हालचाल कमी होते आणि त्यामुळे सुज येते. वाहनांनी प्रवास करताना एकाजागी बराच वेळ उभे राहावे लागते. किंवा बसमध्ये बराच वेळ एकाच जागी बसल्यामुळेही पाय सुजतात. ही सुज रक्त साकळल्यामुळे येतेच. मात्र त्यामागे इतरही काही कारणे असू शकतात. 

१. सतत बसून राहिल्यामुळे रक्ताचा प्रवाह मंदावतो. त्यामुळे सुज येते. हातापायापाशी साठलेले रक्त आणि इतरही द्रव्य शरीरामध्ये साठून राहते. त्यामुळे पाय सुजतात. खास म्हणजे घोट्याभोवती सुज येते आणि पाय जड होतो. घट्ट झाल्यासारखे जाणवते. 

२. हृदयापर्यंत रक्त भिसरण जर नीट होत नसेल तरी हात पाय सुजतात. रक्ताभिसरण मंदावल्यामुळे शिरांवर जोर पडतो आणि रक्त साखळते. त्यामुळे सुज, थकवा आणि पाय दुखण्याच्या समस्या जाणवतात. 

३. शरीरातील मीठाचे प्रमाण वाढल्यामुळेही सुज येते. आहारात काही जण भरपूर मीठ घेतात. त्यामुळे सुज येते. तसेच हार्मोनल बदलांमुळेही ही समस्या उद्भवते. गरोदर महिलांच्या हातापायाला सुज येते. 

४. सतत सुज येणे मात्र चांगले नाही. किडनीमध्ये काही बिघाड असेल तर हाता पायाची सुज त्याचे एक लक्षण आहे. त्यामुळे वेळीच वैद्याकीय उपचार करायला हवेत. यकृताचे विकार असतील तरी हातापायाला सुज येते. 

५.  रक्तगाठ झाली असेल तरी सुज येते. लालसरपणा वाढतो आणि वेदनाही होतात. त्यामुळे अशी सुज सतत येत असेल तर वेळीच उपाय करायला हवेत. शरीर आपल्याला सुचित करत असते त्या सूचना समजून घेता आले पाहिजे.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडी