Join us
Daily Top 2 Weekly Top 5

रात्री वारंवार लघवीसाठी उठावं लागणं - झोपमोड होणं नॉर्मल नाही, पाहा कारणं आणि उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2026 18:05 IST

what does frequent night urination indicate about health : reasons for frequent urination at night : nutritionist explains nocturia causes and prevention : रात्रीची झोपमोड होऊन लघवीला उठावं लागतं? लिव्हरशी संबंधित १ चूक पडेल महागात - पाहा सोपे उपाय...

रात्री झोपेतून वारंवार उठून लघवीला जाणं ही अनेकांच्या आयुष्यातील एक कॉमन पण त्रासदायक समस्या आहे. सुरुवातीला साधी वाटणारी ही सवय काहीवेळा शरीरात चालू असलेल्या काही आरोग्य समस्यांचे संकेतही असू शकते. विशेषतः झोप मोड झाल्याने चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव असे अनेक बदल आपल्या शरीरात होऊ शकतात. अनेकांना वाटते की, रात्री जास्त पाणी प्यायल्यामुळे किंवा वाढत्या वयामुळे असे होत असावे. हे काही प्रमाणात खरे असले तरी, अनेकदा हे लक्षण शरीरातील काही छुपे आजार किंवा विस्कळीत झालेल्या लाईफस्टाईलचे काही विशेष संकेत असू शकतात(what does frequent night urination indicate about health).

अनेकदा आपण या छोट्याशा सवयीला नॉर्मल मानून त्याकडे दुर्लक्ष करतो. पण खरंच ही सवय नॉर्मल आहे का? सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांच्या मते, रात्री वारंवार उठून लघवीला जाणे अजिबात सामान्य नाही. विशेषतः जर रात्री १ ते ३ वाजेच्या दरम्यान लघवीला लागल्यामुळे तुमची झोप उडत असेल, तर हे मुळीच नॉर्मल नसून आपल्या शरीराच्या आत होत असलेल्या बदलांशी संबंधित एक मोठा संकेत असू शकतो. जर तुम्हीही दररोज रात्री १ ते ३ च्या दरम्यान उठत असाल, तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी आपल्या शरीरातील लक्षणांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांच्या मते रात्री लघवीसाठी झोप मोड (nutritionist explains nocturia causes & prevention) होण्याची कारणे काय आहेत आणि ही समस्या दूर करण्यासाठी उपाय काय आहेत ते पाहूयात... 

रात्री १ ते ३ वाजेची वेळ असते खास... 

 सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह सांगतात की, आयुर्वेदानुसार रात्री १ ते ३ वाजेच्या दरम्यानची वेळ लिव्हरसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या काळामध्ये शरीर स्वतःला डिटॉक्स (विषारी घटक बाहेर काढणे) करण्याच्या प्रक्रियेत असते. अशा परिस्थितीत जर एखादी व्यक्ती या वेळी वारंवार उठत असेल, तर हे या गोष्टीचे संकेत असू शकतात की लिव्हरवर जास्त ताण आहे किंवा शरीराला आरामाची अत्यंत गरज आहे.

समंथा प्रभू सांगते २१ दिवसांत वजन कमी करण्याचं  सिक्रेट, पोट होते कमी आणि दिसता एकदम फिट...

रोज खाते वरणभात तरी तमन्ना भाटियाची फिगर कमाल, पाहा वरणभात खाण्याची तिची पद्धत आणि प्रमाण...

या समस्येची मुख्य कारणं नेमकी कोणती आहेत ? 

न्यूट्रिशनिस्टच्या मते, जर रात्री एक ते तीन वाजायच्या दरम्यान तुमची झोप उडत असेल, तर याची अनेक कारणे असू शकतात. जसे की - जर तुम्ही दिवसभरात जास्त चहा किंवा कॉफी पीत असाल, तर त्यातील कॅफिन हे रात्री वारंवार लघवीला येण्याचे कारण होऊ शकते. याशिवाय आहारात जास्त मीठ खाल्ल्यानेही शरीराचे संतुलन बिघडू शकते. तसेच शरीरातील हॉर्मोनल बदल, विशेषतः महिलांमध्ये 'मेनोपॉज'च्या (रजोनिवृत्ती) काळातही अशी समस्या निर्माण होऊ शकते.

या समस्येवर घरगुती उपाय कोणते ? 

श्वेता शाह सांगतात की, जर तुम्हाला रात्री उठून लघवीला जाण्याची समस्या असेल, तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी काही वेळ आपले पाय मीठ मिसळलेल्या कोमट पाण्यात बुडवून ठेवा. यामुळे 'नर्व्हस सिस्टम'ला आराम मिळतो आणि शरीर शांत होते. दुसरा उपाय असा की, तुम्ही एक मोठा चमचा धणे आणि एक मोठा चमचा बडीशेप १०० मिली पाण्यात उकळून घ्या आणि त्यानंतर हे पाणी प्या. यामुळे शरीराचे संतुलन राखले जाते. याशिवाय, शरीराला शांत ठेवण्यासाठी आणि हॉर्मोन्स संतुलित राखण्यासाठी नियमितपणे 'भ्रामरी प्राणायाम' करण्याचा सल्लाही श्वेता शाह देतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Frequent Night Urination: Causes, Remedies, and When It's Not Normal

Web Summary : Frequent nighttime urination isn't normal, signaling underlying health issues or lifestyle imbalances. It could indicate liver stress, hormonal changes, or excessive caffeine/salt intake. Simple remedies include warm foot soaks, coriander-fennel seed tea, and Bhramari Pranayama for hormonal balance.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलहोम रेमेडी