Join us

डोनाल्ड ट्रम्प यांना झालेला त्रास नेमका काय आहे? अँप्यूटेशन म्हणजे करतात काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2025 18:54 IST

What does amputation means? Donald Trump might face serious treatment says doctor : अँप्यूटेशन म्हणजे नक्की काय? आजार की उपचार ? जाणून घ्या.

गेले काही दिवस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प काही आरोग्यसंबंधी त्रासांतून जात आहेत. त्यांना क्रोनिकल आजारांचा सामना करावा लागला. त्यादरम्यानच त्यांचे अँप्यूटेशन करावे लागू शकते, त्याबाबत अजून काही ठोस माहिती नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्याचे काही मिडिया साईट्सवर दिसले. अँप्यूटेशन म्हणजे नक्की काय असते ? तसेच कोणाला करावे लागू शकते. जाणून घ्या. कारण ही वेळ योग्य काळजी न घेतल्यास कोणावरही येऊ शकते.   

अँप्यूटेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा हात, पाय किंवा बोट यासारखा अवयव शस्त्रक्रियेद्वारे कापून टाकणे. हा  आजार नसून उपचाराचा एक भाग मानला जातो. कारण जेव्हा एखाद्या अवयवाचे फारच गंभीर नुकसान होते तेव्हा तो अवयव शरीरापासून वेगळा करणे हा एकच पर्याय उरतो. बऱ्याच उपचारांदरम्यान डॉक्टरांना हा कठोर निर्णय घ्यावा लागतो. तो अवयव वेळीच काढला नाही तर इतर अवयवही निकामी होण्याची शक्यता असते. रक्त पुरवठा पूर्णपणे बंद झाला असेल, अशा वेळी अँप्यूटेशन करावे लागते. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये हा धोका जास्त आढळतो, कारण त्यांच्या पायावर झालेल्या लहानसहान जखमा सहज बऱ्या होत नाहीत आणि संसर्ग वाढत जातो. रक्तवाहिन्यांचे विकार, धूम्रपानामुळे होणारी रक्ताभिसरणाची अडचण, हाडांचा कर्करोग किंवा जन्मजात जर काही त्रास असेल यामुळेही अवयव काढून टाकण्याची वेळ येऊ शकते.

हा आजार कोणालाही होऊ शकतो, पण ज्या लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, जास्त प्रमाणात व्यसनांची सवय  असलेल्यांना जास्त धोका असतो. अशा लोकांमध्ये रक्तवाहिन्या लवकर खराब होतात. एकदा अँप्यूटेशन झाल्यावर माणसाला फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक त्रासही सहन करावा लागतो. बऱ्याचदा लोकांना कापलेला अवयव अजून आहे आणि तिथे वेदना होत आहेत असं भासतं, याला फँटम पेन म्हणतात. योग्य वेळी फिजिओथेरपी, कृत्रिम हात–पाय बसवणे आणि मानसिक आधार दिल्यास व्यक्ती पुन्हा सामान्य आयुष्य जगू शकतो. त्यामुळे अँप्यूटेशन हा शेवटचा पर्याय असला तरी तो आयुष्य वाचवण्यासाठी आवश्यक ठरतो. त्याची वेळ येऊ नये यासाठी शरीर मजबूत ठेवणे गरजेचे आहे. योग्य आहार तसेच व्यायाम आणि व्यसन टाळणे गरजेचे आहे. 

टॅग्स : हेल्थ टिप्सडोनाल्ड ट्रम्पआरोग्यसोशल व्हायरल