Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तिलक वर्माने सांगितली जुन्या गंभीर आजाराची गोष्ट, अचानक सुजली बोटे.. काय असतो ' तो ' आजार?

तिलक वर्माने सांगितली जुन्या गंभीर आजाराची गोष्ट, अचानक सुजली बोटे.. काय असतो ' तो ' आजार?

Tilak Varma illness: Tilak Varma health news: rhabdomyolysis Disease: रॅबिडोमायोलिसिस हा आजार कसा होतो? याचं नेमकं कारण काय, जाणून घेऊया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2025 15:13 IST2025-10-27T15:11:47+5:302025-10-27T15:13:00+5:30

Tilak Varma illness: Tilak Varma health news: rhabdomyolysis Disease: रॅबिडोमायोलिसिस हा आजार कसा होतो? याचं नेमकं कारण काय, जाणून घेऊया.

What disease does Tilak Varma have rhabdomyolysis reveals old serious illness details Fingers Suddenly Swelled Up What Exactly Is This Disease | तिलक वर्माने सांगितली जुन्या गंभीर आजाराची गोष्ट, अचानक सुजली बोटे.. काय असतो ' तो ' आजार?

तिलक वर्माने सांगितली जुन्या गंभीर आजाराची गोष्ट, अचानक सुजली बोटे.. काय असतो ' तो ' आजार?

आशिया कप २०२५ टुर्नामेंटच्या अंतिम फेरीत तिलक वर्मा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. तिलक वर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतून पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे.(Tilak Varma illness) आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या या क्रिकेटरने जीवघेण्याचा आजाराचा सामना केला आहे.(Tilak Varma health news) त्याने एका मुलाखतीत सांगितलं की, २०२२ मध्ये अचानक तब्येत बिघडली. त्याला रॅबिडोमायोलिसिस नावाच्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागले. (rhabdomyolysis Disease)
या आजारात स्नायू तुटतात आणि रक्तप्रवाहात अडथळे येतात. वेळीच उपचार केले नाही तर जीव देखील गमवावा लागतो. टीओआयच्या वृत्तानुसार तिलक वर्माने म्हटलं की, मला फिट राहायला अधिक आवडते.(Tilak Varma finger swelling) याविषयी मी कधीही कोणाला सांगितले नाही. या काळात मला गंभीर आजाराचा सामना करावा लागला. माझे स्नायू तुटू लागले, माझी प्रकृती अचानक बिघडली.(Indian cricketer health update) मला रॅबिडोमायोलिसिस आजार झाला. हा आजार कसा होतो? याचं नेमकं कारण काय, जाणून घेऊया. 

किडनीच्या आजाराने सतीश शाह याचं निधन, पन्नाशी ओलांडल्यानंतर शरीरात दिसतात २ बदल- लक्ष द्या..

तिलक वर्मा यांने आपल्या फिटनेसकडे अतिप्रमाणात लक्ष दिले. या काळात त्यांने आपल्या शरीराला पुरेशी विश्रांती दिली नाही. वर्कआउट, कठोर प्रशिक्षण आणि बर्फाने आंघोळ नियमितपणे करत. ज्या दिवशी विश्रांती करण्याचा दिवस असायचा त्यादिवशी देखील त्याने हेवी वर्कआउट केलं. मला तंदुरुस्त खेळाडू आणि चांगला क्षेत्ररक्षक बनायचे होते. पण स्नायूंवर ताण आल्यामुळे ते जास्त प्रमाणात कडक झाले. 

बांगलादेश विरुद्ध सामना खेळताना मला हातात कंपण जाणवू लागली. चालू सामन्यात अचानक हात थरथरु लागले. बोटांनी पूर्णपणे हालचाल बंद केली. ज्यामुळे मला रिटायर हर्ट म्हणून मैदानातून परतावं लागलं. त्यावेळी मला बोटेही वाकवता येत नव्हती म्हणून ग्लोव्ह्ज ही कापून काढले. पण वेळेत उपचार मिळाल्याने माझा जीव वाचला. 

रॅबिडोमायोलिसिस या आजारात शरीराचे स्नायू जलदगतीने तुटतात. ज्यामुळे हानिकारक पदार्थ आपल्या रक्तप्रवाहात प्रवेश करतात. आपण हेवी वर्कआऊट करतो, त्यावेळी आपल्या स्नायूंवर ताण येतो. शरीराला पुरेशा प्रमाणात विश्रांती मिळाली नाही की अनेकदा असं घडतं. 

हेवी वर्कआऊट केल्यानंतर स्नायू दुखतात, सूज येणे किंवा जडपणा जाणवतो तेव्हा रॅबडोमायलोसिस सारखा गंभीर आजार होतो. कधीकधी स्नायू कमकुवत होतात, ज्यामुळे शरीरात कडकपणा येतो. लघवीमध्ये बदल होणे, रंग बदलणे यांसारख्या समस्या देखील उद्भवतात. डोकेदुखी, चक्कर, उलट्या होणे, मूत्रपिंडावर दाब येणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. 
 

Web Title : तिलक वर्मा ने बताई गंभीर बीमारी: रैबडोमायोलिसिस और अचानक उंगली में सूजन।

Web Summary : क्रिकेटर तिलक वर्मा ने रैबडोमायोलिसिस से अपनी लड़ाई का खुलासा किया, जिससे मांसपेशियों का टूटना होता है। बिना आराम के अत्यधिक परिश्रम से यह बीमारी हुई। एक मैच के दौरान, उन्होंने उंगली में कंपन और अकड़न का अनुभव किया, जिसके लिए तत्काल चिकित्सा ध्यान देने की आवश्यकता पड़ी और उनकी जान बच गई।

Web Title : Tilak Varma reveals serious illness: Rhabdomyolysis and sudden finger swelling.

Web Summary : Cricketer Tilak Varma disclosed his battle with rhabdomyolysis, a condition causing muscle breakdown. Overexertion without rest led to the illness. During a match, he experienced finger tremors and stiffness, requiring immediate medical attention and saving his life.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.