पुरेशी झोप ही चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतेच. दिवसा कितीही झोपलो तरी रात्रीची झोप घेणे महत्वाचे असतेच. आपल्यापैकी बरेचजण असे आहेत ज्यांना रात्रीच्या वेळी वारंवार लघवीस (Do You Also go to Washroom many times in the Night) उठावे लागते. रात्रीच्या वेळी वारंवार लघवीस उठल्याने आपली झोपमोड होते. रात्रीच्या झोपेत व्यत्यय आल्याने थकवा, चिडचिड, आणि एकूणच आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. वैद्यकीय भाषेत या स्थितीला 'नोक्ट्युरिया' (Nocturia) असे म्हणतात वय वाढणे, मधुमेह, मूत्राशयाचे आजार, औषधांचा परिणाम किंवा बदलती लाईफस्टाईल ही त्यामागची कारणे असू शकतात( Waking Up At Night To Urinate Try These 4 Doctor Recommended Home Remedies).
रात्री वारंवार लघवी होण्याच्या या समस्येकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, कारण ही समस्या एखाद्या गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. रात्री वारंवार झोपमोड होऊन लघवी करण्यासाठी उठण्याची ही समस्या त्रासदायक तर आहेच, पण वेळीच या कडे काळजीपूर्वक लक्ष देऊन योग्य ते उपचार करणे गरजेचे असते. यासाठीच, युट्युबवरील 'हेल्दी हमेशा' या अकाऊंटवरून डॉक्टर सलीम यांनी रात्री वारंवार लघवी होण्याच्या समस्येवर काही घरगुती उपाय सांगितले आहेत, ते पाहूयात...
रात्री वारंवार लघवीस उठावे लागते ?
रात्री वारंवार लघवी होणे ही एक सामान्य समस्या वाटू शकते, परंतु त्यामागे अनेक कारणे असू शकतात. वयानुसार, मूत्राशयाची क्षमता कमी होऊ शकते, शरीरात पाण्याचे असंतुलन होऊ शकते किंवा एखाद्या प्रकारचा संसर्ग होऊ शकतो. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखे आजार देखील या सवयीमुळे निर्माण होऊ शकतात. बऱ्याचदा झोपण्यापूर्वी जास्त पाणी किंवा चहा-कॉफी पिण्याने देखील ही समस्या उद्भवते. या समस्येकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, त्याचे कारण ओळखणे आणि योग्य दिशेने पावले उचलणे खूप महत्वाचे आहे.
या समस्येवर काही घरगुती उपाय....
१. धणे आणि खडीसाखर :- धणे आणि खडीसाखर समप्रमाणांत घेऊन त्याची एकत्रित वाटून बारीक पूड तयार करून घ्यावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत ही पूड खाल्ल्याने रात्री वारंवार लघवीला होण्याच्या समस्येचे प्रमाण कमी करता येऊ शकते. धणे मूत्रमार्गातील होणारी जळजळ शांत करतं आणि जास्त लघवी होण्याची प्रक्रिया नियंत्रित करतं. तर खडी साखरेचा शीतल गुणधर्म शरीराला आराम देतो. हा उपाय केवळ वारंवार लघवीला होण्याच्या समस्येपासून आराम देत नाही, तर पोटाच्या विकारांवरही उपयुक्त ठरतो. विशेष म्हणजे, हा संपूर्णतः नैसर्गिक आणि सुरक्षित असा उपाय आहे.
स्वयंपाकघरात तासंतास उभं राहून पाय दुखतात? ३ सोप्या गोष्टी, पाय-टाचा-कंबर दुखणार नाही...
२. तीळ आणि गूळ :- काळे तीळ थोडेसे भाजून घ्यावेत आणि गूळ घालून रोज एक छोटा लाडू तयार करावा. हा लाडू रात्री झोपण्यापूर्वी खावा. तीळामध्ये असणारे खनिजद्रव्य (मिनरल्स) मूत्राशयाच्या स्नायूंना बळकट करतात, तर गूळ शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळवून देण्यास मदत करते. हा उपाय विशेषतः त्यांच्या उपयोगी आहे ज्यांना रात्री थंडी जाणवते किंवा लघवीवर नियंत्रण ठेवण्यात अडचण होते. हा उपाय शरीरातील एकंदर कार्यप्रणाली संतुलित ठेवतो आणि झोपेमध्ये अडथळा येऊ देत नाही.
कोमट पाण्यांत मिसळा 'या' तेलाचे फक्त २ थेंब, बेली फॅट होईल कमी, डॉक्टर सांगतात...
३. बडीशेपचा काढा :- बडीशेपचा उपयोग आपल्याकडे प्रामुख्याने पाचनासाठी केला जातो, पण ती मूत्रविकारांवरसुद्धा अतिशय फायदेशीर ठरते. एक चमचा बडीशेप एक कप पाण्यात उकळावी, नंतर गाळून घ्यावी. हे पाणी कोमट असताना, झोपण्याच्या अर्धा तास आधी प्यावं. हा काढा मूत्राशयाला आराम देतो, सूज कमी करतो आणि वारंवार लघवी होण्याच्या समस्येला नियंत्रणात ठेवतो. हा बडीशेपचा काढा नियमित प्यायल्याने युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) होण्याची शक्यता कमी होते. याची चव सौम्य गोडसर आणि थंडावा देणारा असल्यामुळे झोपेसुद्धा शांत आणि गाढ लागते.
४. लाईफस्टाईलमध्ये बदल आवश्यक :- फक्त घरगुती उपायच नाहीत, तर काही डेली रुटीनमधील साधेसोपे बदलही या समस्येपासून आराम मिळवून देऊ शकतात. उदाहरणार्थ, झोपण्याच्या किमान दोन तास आधी द्रवपदार्थ पिणे कमी करावे. रात्री चहा, कॉफी किंवा थंड पेयांपासून दूर राहावे. झोपण्यापूर्वी मूत्राशय पूर्णपणे रिकामा करणे आणि दररोज हलकीशी व्यायाम किंवा योगासने करणे उपयुक्त ठरते – विशेषतः कपालभाती किंवा मोलासन यांसारखी योगासने. तणाव आणि चिंता कमी करणे देखील गरजेचे आहे, कारण यांचा थेट परिणाम मूत्रविकारांवर होतो. अशा या छोट्या छोट्या सवयींमुळे तुमची रात्र अधिक शांत, आणि दिवस अधिक ऊर्जावान व समाधानी होतील.