आपल्या ७ ते ८ तासांची झोप पुरेशी असते. परंतु, व्यवस्थित झोप घेतल्यानंतरही सकाळी थकवा जाणवणे, जांभळ्या येणे किंवा आळस जाणवत असेल तर आरोग्याची पुरेशी काळजी घ्यायला हवी.(Best energy-boosting foods for daily diet) शरीरात जीवनसत्त्वाची कमतरता जाणवू लागली की, आपल्याला आळस येतो.
सध्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आपले खाण्यापिण्याकडे फारसे लक्ष नसते.(Natural remedies for fatigue and low energy) त्यामुळे शरीराला पोषक तत्वांची कमतरता जाणवते.(Signs your body lacks essential vitamins) शरीराची ऊर्जा कमी होऊ लागली की, आपल्याला आळस येतो.(Diet changes to improve sleep and energy) जीवनसत्त्वांच्या अभावामुळे आपल्याला सुस्ती आणि झोप येते. त्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे जाणून घ्या.
लिप बाम लावल्यानंतरही ओठ कोरडे पडतात-फुटतात? घरगुती उपाय, ओठ होतील मऊ-मुलायम
हेल्थ लाईनच्या अहवालानुसार जास्त झोप येणे किंवा थकवा जाणवण्याचे कारण शरीरात व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असू शकते. हे दोन्ही जीवनसत्त्वे शरीराच्या ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात.
अहवालानुसार स्नायूंच्या बळकटीसाठी आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. याच्या कमतरतेमुळे मूडवर परिणाम स्पष्टपणे दिसून येतो. शरीरात या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे व्यक्तीला सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. शरीरात व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. ज्यामुळे शरीराला सतत थकवा आणि सुस्ती जाणवते. सतत झोप आणि आळस जाणवत राहतो.
उन्हाळ्यात 'या' पद्धतीने चेहऱ्यावर लावा मुलतानी माती, त्वचेला मिळेल गारवा, जळजळ-टॅनिंग होईल कमी
व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर करण्यासाठी आहारात मासे, मशरुम, दुग्धजन्य पदार्थ, अंडी आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश करु शकता. या सर्व पदार्थांमुळे आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी वाढण्यास मदत होते. अंडी हे व्हिटॅमिन बी १२ चा एक उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये असणारे पिवळ्या बल्कमध्ये व्हिटॅमिन बी १२ मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय शरीरात व्हिटॅमिन बी १२ वाढवण्यासाठी आपण दूध, दही, सोया उत्पादने खाऊ शकता.