Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > 'या' ५ व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे महिलांच्या हृदयाचे आरोग्य येते धोक्यात, जीव वाचवायचा तर...

'या' ५ व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे महिलांच्या हृदयाचे आरोग्य येते धोक्यात, जीव वाचवायचा तर...

How To Improve Quality Of Diet During Menopause For Healthy Heart : 5 Essential Vitamins You Need After Age 40 : Vitamin Deficiency Increase The Risk Of Heart : Nutrient Deficiencies & Heart Disease : वयाच्या चाळीशीनंतर महिलांच्या हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शरीरात होऊ नये ५ व्हिटॅमिन्सची कमतरता... कोणते ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2025 13:04 IST2025-01-01T12:40:25+5:302025-01-01T13:04:08+5:30

How To Improve Quality Of Diet During Menopause For Healthy Heart : 5 Essential Vitamins You Need After Age 40 : Vitamin Deficiency Increase The Risk Of Heart : Nutrient Deficiencies & Heart Disease : वयाच्या चाळीशीनंतर महिलांच्या हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शरीरात होऊ नये ५ व्हिटॅमिन्सची कमतरता... कोणते ते पाहा...

Vitamin Deficiency Increase The Risk Of Heart 7 Essential Vitamins You Need After Age 40 Nutrient Deficiencies & Heart Disease How To Improve Quality Of Diet During Menopause For Healthy Heart | 'या' ५ व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे महिलांच्या हृदयाचे आरोग्य येते धोक्यात, जीव वाचवायचा तर...

'या' ५ व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे महिलांच्या हृदयाचे आरोग्य येते धोक्यात, जीव वाचवायचा तर...

महिलांच्या शरीरात वयोमानानुसार अनेक हार्मोनल बदल सतत फार मोठ्या प्रमाणावर होत असतात. जसजसे स्त्रीच्या वयात वाढ होत जाते तसे तिच्या शरीरातील होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम तिच्या (How To Improve Quality Of Diet During Menopause For Healthy Heart) आरोग्यावर होताना दिसतो. महिलांच्या आयुष्यातील (5 Essential Vitamins You Need After Age 40) पिरेड्स, प्रेग्नेंसी, पोस्ट प्रेग्नेंसी, मेनोपॉज या सगळ्या टप्प्यांवर तिला शरीरात होणाऱ्या अनेक बदलांना सामोरे जावे लागते. याचबरोबर महिलांच्या वयाची चाळीशी उलटली की आरोग्याच्या अनेक लहानसहान कुरबुरी डोकं वर काढतात. महिलांच्या (Nutrient Deficiencies & Heart Disease) वयाची चाळीशी उलटली की महिलांनी (Vitamin Deficiency Increase The Risk Of Heart) आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. अशा परिस्थितीत महिलांनी जर वेळीच योग्य ती काळजी घेतली नाही तर महिलांना अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो.

महिलांच्या शरीरात होणाऱ्या सततच्या या हार्मोनल बदलांमुळे काहीवेळा त्यांच्या शरीरात काही महत्वाच्या पोषक तत्वाची कमतरता भासते, आणि या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेच महिलांना वयाच्या चाळीशी नंतर शारीरिक व्याधी सतावतात. मुंबईच्या वॉकहार्ट हॉस्पिटलच्या डाएटिशियन रिया देसाई यांनी नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीनुसार, वयाच्या चाळीशीनंतर महिलांच्या हृदयाचे तसेच एकूणच आरोग्य चांगले टिकून राहण्यासाठी कोणत्या ५ व्हिटॅमिन्सची कमतरता शरीरात होऊ नये याबद्दल अधिक माहिती दिली आहे. 

१. कॅल्शियमची कमतरता :- साधारणतः वयाच्या चाळीशी नंतर मोनोपॉजमुळे महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होऊ लागते. याचा परिणाम महिलांच्या हाडांच्या आरोग्यावर होतो. यामुळे हाडे कमकुवत होऊ लागतात, त्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. कॅल्शियममुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होते. शरीरातील रक्तदाब आणि हृदयाचे कार्य सुरळीत ठेवण्यातही कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे वयाच्या चाळीशीनंतर महिलांनी आहारात कॅल्शियमचे प्रमाण वाढवावे. शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी महिलांनी कमी फॅट्सयुक्त दुग्धजन्य पदार्थ जसे गायीचे दूध, दही, चीज, हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, तीळ आणि खसखस ​​यांचा आहारात समावेश करावा. यामुळे महिला मोनोपॉजनंतर ऑस्टिओपोरोसिस आणि हृदयाच्या समस्यांपासून दूर राहू शकतात.

हिवाळ्यात आंघोळ करताना करू नका 'ही' चूक, येईल हार्ट अ‍ॅटॅक, पाहा आंघोळ करण्याची योग्य पद्धत...

२. व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता :- व्हिटॅमिन 'डी' शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करते, जे हाडे मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे. याचबरोबर हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि दाह कमी करण्यासाठी देखील व्हिटॅमिन 'डी' उपयुक्त आहे. व्हिटॅमिन 'डी' च्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. शरीरातील व्हिटॅमिन 'डी' च्या कमतरतेवर मात करण्यासाठी दररोज सूर्यप्रकाशात बसा. आहारात दूध, दही, मशरूम, संत्री, इत्यादींचा समावेश करून व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता भरून काढता येते. शरीरात व्हिटॅमिन 'डी'चे प्रमाण खूप कमी असल्यास डॉक्टरांकडून स्वतःची तपासणी करून घ्या. आवश्यक असल्यास, व्हिटॅमिन 'डी' पूरक आहार घ्या.

३. आयर्नची कमतरता :- मोनोपॉजमुळे शरीरातील आयर्नचे प्रमाण कमी होऊ शकते. शरीरातील लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आणि अशक्तपणा टाळण्यासाठी आयर्न खूप महत्वाचे असते. अशक्तपणामुळे थकवा येऊ शकतो, ज्याचा शरीराच्या कार्यांवर आणि हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. शरीरातील आयर्नच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पालेभाज्या, शेंगा, कडधान्ये यांचा आहारात समावेश करा. व्हिटॅमिन 'सी' मुळे आयर्न चांगले शोषले जाते, म्हणून चणे, पालक खाताना त्यावर लिंबू पिळून घ्या.

४. व्हिटॅमिन 'बी' १२ ची कमतरता :- व्हिटॅमिन 'बी' १२ शारीरिक ऊर्जा, मज्जातंतूंच्या आरोग्यासाठी आणि शरीरातील लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण असते. व्हिटॅमिन 'बी' १२ कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा येऊ शकतो. व्हिटॅमिन 'बी' १२ हृदयाचे आरोग्य, मज्जासंस्था आणि लाल रक्तपेशींचे कार्य चांगले सुरळीत चालण्यास मदत करते. शरीरात व्हिटॅमिन 'बी' १२ ची कमतरता भासू नये यासाठी आहारात दूध, दही, चीज, पालक, बीटरूट, मशरूम, केळी, सफरचंद यांचा समावेश करा.

बाळंतपणात वाढलेलं २३ किलो वजन नेहा धुपियाने चटकन केलं कमी! ते कसं, वाचा...

५. ओमेगा-३ फॅटी ॲसिडची कमतरता :- ओमेगा-३ फॅटी ॲसिड हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते. हे खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. ओमेगा - ३ हृदयरोगाचा धोका कमी करण्यास आणि निरोगी कोलेस्टेरॉलची पातळी चांगली राखण्यास मदत करते. चिया सीड्स, अंबाडीच्या बिया, अक्रोड अशा पदार्थांमध्ये ओमेगा - ३ फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण भरपूर असते. 

६. फायबर आहे महत्वाचे :- उच्च फायबरयुक्त आहार रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतो. यामुळे अपचन, गॅस, ॲसिडिटीचा त्रास होत नाही. फायबर आपल्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ब्राऊन राइस, ओट्स, क्विनोआ आणि ओटमील यांसारख्या संपूर्ण धान्यांचा समावेश करा. सर्व फळे आणि भाज्या फायबरचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. याशिवाय डाळी आणि शेंगा यांचा आहारात समावेश करा.

Web Title: Vitamin Deficiency Increase The Risk Of Heart 7 Essential Vitamins You Need After Age 40 Nutrient Deficiencies & Heart Disease How To Improve Quality Of Diet During Menopause For Healthy Heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.