शरीरात जीवनसत्त्व B12 ची कमतरता ही एक गंभीर पण अनेकदा दुर्लक्ष केली जाणारी आरोग्यसमस्या आहे. ही कमतरता विशेषतः महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. या स्थितीला 'Vitamin B12 deficiency' असे म्हणतात. या कमतरतेचे परिणाम शरीरातील अनेक यंत्रणांवर होऊ शकतात.
जीवनसत्त्व B12 हे एक अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. ( 'Vitamin B12 deficiency, Check out the 4 symptoms and get treatment on time, women should be aware about this deficiency)जे मेंदूच्या कार्यासाठी, रक्तातील लाल पेशी तयार होण्यासाठी, आणि मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असते. शरीरात या जीवनसत्त्वाची पातळी कमी झाली तर, त्याचे अनेक प्रकारे दुष्परिणाम दिसू लागतात.
१. B12ची कमतरता असल्यास सारखे चक्कर आल्यासारखे होते. अगदी चक्कर नाही तर कधी गरगरल्यासारखे वाटते. साधे चालताना बोलताना थकवा जाणवतो. पटकन डोकं जड होतं. त्यामुळे डोळेही जड होतात. अशक्तपणा जाणवतो. श्वास घेताना जरा त्रास होऊ शकतो. हृदयाची धडधड वाढते.
२. हात-पाय सुन्न होतात. शरीरात बधिरता जाणवते. लक्ष केंद्रित करणे कठीण जाते. त्यामुळे शरीर आणखी थकते. तसेच मानसिक ताण आणि थकवा येतो. शरीरात सुई टोचल्या सारखे जाणवते असे अनेक जण सांगतात. विसरभोळेपणा वाढतो. साध्यासोप्या गोष्टी लक्षात राहत नाहीत.
३. मानसिक ताण जास्त झाल्यामुळे चिडचिड होते. रडावेसे वाटते. लहान गोष्टीतही राग येतो. तसेच प्रसन्न , उत्साही अजिबात वाटत नाही. B12 ची कमतरता असलेले सतत वैतागलेले असतात. त्यांना आनंद, जल्लोष फार जाणवत नाही.
४. तोंड येण्याची समस्या वारंवार होते. पोट साफ नसल्यामुळे तोंडात उष्णतेचे फोड येतात. तसेच B12 कमी असल्यामुळेही
सतत तोंड येते. ज्याला आपण माऊथ अल्सर असे म्हणतो. काही ठराविक दिवसांनी हे फोड बरे होतात. मात्र काहीच दिवसात पुन्हाही समस्या जाणवते.
महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात का आढळते याची अनेक कारणे आहेत. गर्भधारणा, स्तनपान, मासिक पाळीमुळे होणारा रक्तस्राव यामुळे महिलांमध्ये B12 ची गरज अधिक असते. आहारात कमी प्रथिने खाणाऱ्या महिलांमध्ये ही कमतरता अधिक दिसून येते. शिवाय काही महिलांमध्ये पचनसंस्थेचे काही विकार असतील तर ते B12 ची पातळी कमी करतात.
या समस्येचे निदान सुद्धा सहज होत नाही, कारण अनेक लक्षणे इतर समस्यांसारखीच असतात. त्यामुळे अनेक महिलांना योग्य उपचार उशिरा मिळतो. वेळीच समस्या समजल्यास योग्य औषधे आणि चांगला आहार घेऊन B12 ची कमतरता भरून काढली जाऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याने B12 च्या गोळ्या, इंजेक्शन्स किंवा सप्लिमेंट्स घेणे आवश्यक असते. महिलांनी खास काळजी घ्यायला हवी.