एखाद्या गोष्टी बाबत चिंता करण्यासाठी आपल्याला काही वेळ काळ लागत नाही. (vitamin and minerals deficiencies) प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये आपण चिंता करतच असतो. कामाच्या ठिकाणी असो किंवा नवीन लोकांशी भेटीगाठी असो. अभ्यास असो किंवा परीक्षेचा पहिला दिवस असो. चिंता ही कायम आपल्या मागेच लागलेली असते. (anxiety vs panic attack) पाहायला गेले तर चिंता ही आपल्या मेंदूला अस्वस्थ करुन सोडते. ज्यामुळे आपले डोके व्यवस्थित काम करत नाही.
आपल्यापैकी अनेकांना अस्वस्थ वाटू लागले की, आपण चारचौघात मिसळतो किंवा दीर्घ श्वास घेऊन त्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो. परंतु, जर एकाच गोष्टीचा सारखा विचार केला तर आपले हात पाय थरथरु लागतात.(anxiety panic attacks vitamin deficiency) त्याचबरोबर हृदयाचे ठोके देखील जलद होतात. काहींना आपल्या चिंतेवर मात करता येते तर काहींना अशावेळी नेमकं काय करावं सुचत नाही.
सोशल मीडियाच्या अतीवापराने डोक्यावर परिणाम, एकटेपणा वाढून बिघडतेय मानसिक संतूलन; संशोधनाचा नवा दावा
अमेरिकत झालेल्या संशोधनातून असे समजले आहे की, सतत चिंतेत केल्यामुळे १.३ कोटी प्रौढांना या आजाराने घेरले आहे. ज्यामुळे त्यांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे जवळजवळ अशक्य होते. पॅनिक झाल्यामुळे शरीरावर आणि मनावर देखील त्याचा खोल परिणाम होतो. अनेकदा पॅनिक अटॅक हा अचानक आल्यासारखा वाटतो. ज्यामुळे हृदयाचे ठोके प्रचंड वाढतात, हात-पाय थरथरतात आणि श्वास घेण्यास देखील त्रास होतो. परंतु हे कशामुळे होते? याचं नेमकं कारण काय? योग्य वेळी काळजी कशी घ्यायला हवी? जाणून घेऊया
चिंता आणि पॅनिक अटॅकची कारणे
जर आपल्या शरीरात सेरोटोनिनचे प्रमाण कमी असेल तर चिंता आणि पॅनिक अटॅक येण्याची शक्यता अधिक असते. न्यूरोट्रांसमीटर आपला मूड आणि भावना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा शरीरातील सेरोटोनिनची पातळी कमी होते तेव्हा आपण चिंतेत सापडतो किंवा सतत अस्वस्थ वाटू लागते. सेरोटोनिन हा ट्रिप्टोफॅन या अमिनो आम्लापासून बनला जातो. ही पूर्ण प्रक्रिया व्हिटॅमिन बी ६ आणि लोहावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. ओकायामा विद्यापीठातील संशोधकानी पॅनिक अटॅक आणि त्यावरील पोषक तत्वांमधील संबंधांचा अधिक खोलवर शोधण्याचा निर्णय घेतला. पॅनिक अटॅक किंवा हायपरव्हेंटिलेशन आलेल्या रुग्णांवर अभ्यास करण्यात आला. या रुग्णांमधील बी ६ आणि लोहाची कमतरता जाणवली. रुग्णांनी यावर मात कशी करावी याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.
चिंता आणि पॅनिक अटॅक कमी करण्यासाठी टिप्स
1. पोषक तत्व असलेले पदार्थ
आपल्या आहारात व्हिटॅमिन बी ६ आणि लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामध्ये मासे, पालेभाज्या आणि बीन्ससारखे पदार्थ खाऊ शकतो. शरीरातील सेरोटोनिन वाढल्यावर मूड सुधारण्यास मदत होतो, ज्यामुळे सतत चिंता करण्याची सवय नियंत्रणात राहाते.
2. दीर्घ श्वास घ्या
3. सक्रिय राहा
4.आराम करा
5. मदत मागण्यास घाबरु नका