Join us

गुडघे, टाचा खूप दुखतात? 'या' पद्धतीने तिळाचं तेल लावा, काही दिवसांतच दुखणं थांबेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2025 12:46 IST

Home Made Oil To Get Relief From Joint Pain: गुडघेदुखी, सांधेदुखी असा त्रास कमी करायचा असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा...

ठळक मुद्दे मातीच्या पणत्या किंवा मातीची वाटी तुमच्याकडे असेल तर त्याचा वापर करूनही गुडघेदुखी कमी करण्यासाठी तेल तयार करता येतं.

कमी वयातच अनेकांना गुडघेदुखीचा त्रास होत आहे. त्यातही ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना हा त्रास जास्त होतो. गुडघेदुखीसोबतच टाचाही दुखतात. त्यामुळे मग बसणं, उठणं, चालणं कठीण होतं. खूप वेळ बसल्यानंतर जेव्हा आपण उठतो, तेव्हा तर सुरुवातीची ८- १० पावलं लंगडतच चालावी लागतात. त्यानंतर मग कुठे थोडं व्यवस्थित चालता येतं. या दुखण्यावर वेळीच उपाय केला नाही तर ते वाढत जातं. सध्या तर दिवाळीच्या कामांमुळे खूप दगदग झाल्यानेही अनेक जणींना हा त्रास होतच आहे. हा त्रास कमी करायचा असेल तर तिळाचं तेल अतिशय गुणकारी ठरतं (how to get rid of joint pain?). ते कशा पद्धतीने लावायचं ते पाहूया..(use of sesame oil to reduce knee pain and joint pain)

 

गुडघेदुखी आणि सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी तिळाचं तेल

गुडघेदुखी आणि सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी तिळाचं तेल कशा पद्धतीने वापरता येईल याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ snehyoga_official या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला १ कप तिळाचं तेल आणि ३ ते ४ कापूर वड्या लागणार आहेत.

सध्या जबरदस्त ट्रेण्डिंग असणारा ३×३ फिटनेस फंडा- वजन कमी होईल झरझर, करून पाहा

त्यासाठी एका मोठ्या भांड्यात तिळाचं तेल घ्या. त्यामध्ये कापुराच्या वड्यांची थोडी पावडर करून घाला. हे तेल ३ ते ४ दिवस उन्हामध्ये ठेवा. तेलामध्ये कापूर पुर्णपणे विरघळला की मग ते तेल सांध्यांवर, दुखणाऱ्या गुडघ्यांवर हलक्या हाताचे चोळून मालिश करा. दिवसातून एकदा हा उपाय केल्यास लवकर आराम मिळेल असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

 

हा उपायही करून पाहा.. 

मातीच्या पणत्या किंवा मातीची वाटी तुमच्याकडे असेल तर त्याचा वापर करूनही गुडघेदुखी कमी करण्यासाठी तेल तयार करता येतं. हा उपाय करण्यासाठी मातीच्या वाटीमध्ये ४ ते ५ चमचे तिळाचं तेल घ्या.

दिवाळीत 'या' पदार्थांमध्ये होते सर्वाधिक भेसळ, गोडधोडाच्या नावाखाली शरीरात जातात विषारी पदार्थ..

त्या तेलामध्ये लसूणाच्या ३ ते ४ पाकळ्या, ४ ते ५ लवंग घाला आणि हे तेल गरम करा. तेल तापल्यानंतर गॅस बंद करा. हे तेल गरम असतानाच ते दुखणाऱ्या अवयवांवर चोळून मालिश करा. माती, तिळाचं तेल आणि इतर घटकांमधले गुणधर्म यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होईल. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Relieve knee and heel pain with sesame oil: Effective methods.

Web Summary : Sesame oil can alleviate knee and heel pain. One method involves infusing sesame oil with camphor by sun-drying it for days and massaging it onto the affected joints. Another involves heating sesame oil with garlic and cloves, then massaging the warm oil for relief.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सपाठीचे दुखणे उपाय