Join us

लघवीला उग्र दुर्गंधी येते ? दुर्लक्ष करू नका, लघवीतील 'या' बदलांकडे दुर्लक्ष केल्यास पडू शकते महागात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2025 15:49 IST

Urine odor health warning signs : how to detect disease from urine smell : urine smell reasons & remedies : लघवीला तीव्र दुर्गंधी येत असेल तर त्याची नेमकी कारणं काय असू शकतात ते पाहूयात...

'लघवी' आपल्या शरीरातून बाहेर टाकले जाणारे टाकाऊ द्रव्य आहे. खरतर, लघवी ही आपल्या आरोग्याची सध्याची स्थितीत देखील सांगते. लघवीचा रंग, वास आपल्या शरीरातील आंतरिक बिघाड किंवा शरीराच्या आतील भागाची स्थिती नेमकी कशी असेल याचा अंदाज सांगण्यास मदत करते. थोडक्यात, लघवी आपल्या शरीराचा 'नैसर्गिक आरोग्य इंडिकेटर' आहे(Urine odor health warning signs).

लघवीला कधी कधी तीव्र किंवा विचित्र दुर्गंधी येते आणि आपण ते दुर्लक्षित करतो, पण हा शरीराकडून मिळणारा एक महत्त्वाचा संकेत असू शकतो. आपल्या आहार, पाण्याचे प्रमाण किंवा काही वेळा आरोग्याशी संबंधित समस्या यांमुळे लघवीच्या वासात बदल होतो. सामान्य परिस्थितीत लघवीला हलका वास येतो, परंतु जर दुर्गंधी सतत जाणवत असेल, तर ते शरीरातील संसर्ग, निर्जलीकरण किंवा इतर आरोग्य बिघडल्याचं लक्षण असू शकतं. त्यामुळे या बदलांकडे दुर्लक्ष न करता त्यामागचं कारण समजून घेणं आवश्यक आहे.

नुकतेच न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले आहे की, लघवीमध्ये होणारे छोटे-छोटे बदल देखील आपल्याला गंभीर आजारांपासून वाचवू शकतात. लीमा महाजन सांगतात, जर अचानक तुमच्या लघवीतून दुर्गंध येत असेल, तर त्याची अनेक कारणे असू शकतात. परंतु, जेव्हा ही दुर्गंधी नेहमीपेक्षा खूप वेगळी, तीव्र किंवा सातत्याने येत असेल, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. आपल्या लघवीला तीव्र गंध येत असेल तर त्याची नेमकी कारणं काय असू शकतात ते पाहूयात... 

लघवीला दुर्गंध येण्याची कारणं... 

लीमा महाजन सांगतात, जर अचानक तुमच्या लघवीतून तीव्र दुर्गंधी येत असेल, तर त्याची अनेक कारणे असू शकतात. कधीकधी अधिक प्रमाणात कांदा, लसूण, कोबी या क्रुसिफेरस भाज्या खाल्ल्याने असा वास येऊ लागतो. जर शरीरात पाण्याची कमतरता असेल, तर तो वास अधिक उग्र आणि दुर्गंधीयुक्त होतो. याशिवाय, हे काही गंभीर आजारांचे संकेत देखील असू शकते. खासकरून युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) ची समस्यां असेल तर लघवीचा गंध उग्र आणि अधिक दुर्गंधीयुक्त येऊ शकतो. जर लघवीला गोड किंवा मधासारखा वास येत असेल, तर तो अनकंट्रोल्ड डायबिटीसचा संकेत असू शकतो.  

चमचाभर खोबरेल तेल, २ मेणबत्त्या वापरुन करा पायांच्या भेगांवर असरदार उपाय - भेगाळलेल्या टाचाही होतील मऊमुलायम... 

दिवसभरातील ५ सवयी नकळत वाढवतात तुमचा स्ट्रेस! आरोग्याचं वाटोळं होण्यापूर्वी करा ‘एवढाच’ बदल...

वारंवार लघवी होण्याची कारणे... 

जर तुम्हाला अचानक खूप वारंवार लघवी होत असेल, तर हे डायबिटीस, यूटीआय (UTI) किंवा कॅफीन, दारू जास्त प्रमाणात पिण्याचा परिणाम असू शकतो.

लघवीच्या रंगावरून काय कळतं?

न्यूट्रिशनिस्ट लिमा महाजन सांगतात की, लघवीचा रंग आपल्या आरोग्याशी निगडित अनेक गोष्टी सांगू शकतो. 

१. गडद पिवळा रंग :- शरीरात पाण्याची कमतरता किंवा व्हिटॅमिन 'बी' जास्त प्रमाणात असल्याचा इशारा देतात. 

२. फार हलका किंवा पारदर्शक रंग :- लघवीचा रंग फार हलका किंवा पारदर्शक असेल तर शरीरात पाण्याचे प्रमाण अधिक असल्याचा हा इशारा आहे. तसेच डायबिटीज असणाऱ्यांमध्येही लघवीचा रंग हलका दिसतो.

३. फेस असलेली लघवी :- लघवीतून प्रोटीन गळती होण्याचे म्हणजेच किडनीशी संबंधित समस्येचे संकेत असू शकतात.

४. लालसर लघवी :- यात रक्त मिसळलेले असल्यास हे किडनी स्टोन , संक्रमण किंवा किडनीशी संबंधित आजाराचे लक्षण असू शकते.

५. फिक्या रंगाची लघवी होणे :- जर लघवी धूसर दिसत असेल तर हे प्रामुख्याने संसर्ग किंवा डिहायड्रेशनमुळे होऊ शकते.

रात्री मुलं सतत लघवीसाठी उठतात-गादी ओली करतात? असू शकतात ५ गंभीर समस्या, पाहा काय करायचं...

काय लक्षात ठेवावे :- 

तज्ज्ञ लीमा महाजन सांगतात की, काहीवेळा लघवीचा रंग किंवा वास खाल्लेल्या अन्नामुळे, प्यायलेल्या पेयामुळे किंवा औषधांमुळे बदलतो, आणि हे सामान्य असते. मात्र जर हा बदल काही दिवस सतत दिसत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दररोज पुरेसे पाणी पिणे, स्वच्छतेकडे लक्ष देणे आणि प्रायव्हेट हायजीन राखणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच लघवी खूप वेळ रोखून ठेवणे टाळावे. लघवीतील छोटे बदलही आपल्या आरोग्यासंबंधित काही इशारे देऊ शकतात.  त्यामुळे लघवीचा रंग किंवा वास बदललेला जाणवला, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

English
हिंदी सारांश
Web Title : Strong urine odor? Don't ignore these changes, it could be serious!

Web Summary : Urine's color and smell act as health indicators. Strong odor can signal dehydration, infection, or diabetes. Nutritionist Leema Mahajan advises paying attention to changes, as they may indicate underlying health issues. Changes in color, like dark yellow or red, can point to dehydration, vitamin excess, or kidney problems. Consult a doctor if changes persist.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल