>आरोग्य > दुखणीखुपणी > टायफाॅईडची साथ वेगाने पसरतेय, त्यापासून स्वतः ला सुरक्षित ठेवण्यासाठी करा ४ गोष्टी

टायफाॅईडची साथ वेगाने पसरतेय, त्यापासून स्वतः ला सुरक्षित ठेवण्यासाठी करा ४ गोष्टी

टायफॉईड होऊन फणफण ताप येण्याची अनेक उदाहरणे आपण आजूबाजूला पाहत आहोत. आपल्याही घरात टायफॉईडचा शिरकाव होऊ नये, म्हणून नक्कीच या गोष्टींचे पालन करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 07:11 PM2021-09-23T19:11:43+5:302021-09-23T19:12:50+5:30

टायफॉईड होऊन फणफण ताप येण्याची अनेक उदाहरणे आपण आजूबाजूला पाहत आहोत. आपल्याही घरात टायफॉईडचा शिरकाव होऊ नये, म्हणून नक्कीच या गोष्टींचे पालन करा.

As typhoid fever spreads, do these things to stay yourself safe | टायफाॅईडची साथ वेगाने पसरतेय, त्यापासून स्वतः ला सुरक्षित ठेवण्यासाठी करा ४ गोष्टी

टायफाॅईडची साथ वेगाने पसरतेय, त्यापासून स्वतः ला सुरक्षित ठेवण्यासाठी करा ४ गोष्टी

Next
Highlightsया आजारापासून स्वत:ला आणि आपल्या कुटूंबाला सुरक्षित ठेवायचे असेल, तर काही गोष्टींची काळजी नक्कीच घेतली पाहिजे. 

मागच्यावर्षी या काळात कोरोनाचे थैमान सुरु होते. यंदा कोरोनाचे रुग्ण कमी आहेत, ही आपल्या सगळ्यांसाठी एक समाधानकारक गोष्ट असली तरी काही गोष्टींची चिंता मात्र वाढते आहे. डेंग्यू, चिकनगुनिया आणि त्यासोबतच टायफॉईड या आजारांनी सध्या डोके वर काढले आहे. यात विशेषत: टायफॉईडने चिंता वाढविली आहे. त्यामुळे या आजारापासून स्वत:ला आणि आपल्या कुटूंबाला सुरक्षित ठेवायचे असेल, तर काही गोष्टींची काळजी नक्कीच घेतली पाहिजे. 

 

कसा पसरतो टायफॉईड?
हा आजार कोणत्याही व्हायरसमुळे पसरत नाही. तसेच हा संसर्गजन्य आजारही नाही. दुषित पाणी आणि दुषित अन्न या गोष्टी प्रामुख्याने टायफॉईड होण्यासाठी जबाबदार आहेत. त्यामुळे बाहेरचे पदार्थ खाणे टाळले तर पाहिजेच, पण त्यासोबतच घरातही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कारण आपल्या घरातही अशा काही गोष्टी घडू शकतात, ज्यातून टायफॉईडचा धोका संभवू शकतो. त्यामुळे काही गोष्टींची काळजी नक्कीच घ्या. 

 

काय आहेत टायफॉईडची लक्षणे?
खूप ताप येणे हे टायफॉईडचं सगळ्यात मुख्य लक्षण आहे. त्यासोबतच या आजारात उलटी, मळमळ, पोट दुखणे, अंग दुखणे, खूप जास्त अशक्तपणा येणे, भूक न लागणे, जुलाब होणे, डोके दुखणे असा त्रासही जाणवतो. अशीच लक्षणे इतर व्हायरल संसर्गातही दिसून येतात. त्यामुळे ताप आला तर अजिबात अंगावर काढू नका. तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा आणि लवकरच विविध तपासण्या करून उपचार सुरु करा. 

 

टायफॉईड होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ?
१. घर स्वच्छ ठेवा
घर स्वच्छ ठेवणे, घरातले अन्नपदार्थ आणि पाणी झाकून ठेवणे खूप गरजेचे आहे. जर खाद्यपदार्थांवर झाकण ठेवले नसेल, तर त्यातूनही संसर्ग होऊ शकतो. या गोष्टीची काळजी घरातील प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि घर स्वच्छ ठेवण्यात योगदान दिले पाहिजे. 

 

२. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा
पावसाळ्याच्या दिवसात खूप जास्त चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. विशेषत: रस्त्यावर मिळणारे पदार्थ तर या दिवसात खूपच खावेसे वाटतात. पण सध्या तुमच्या या खवय्येगिरीवर नियंत्रण ठेवा आणि उघड्यावरचे, रस्त्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळा. एकूणच काय तर सध्या हॉटेलिंग एकदम कमी करून टाका. 

 

३. फ्रिज स्वच्छ करा 
फ्रिज म्हणजे घरातली अशी जागा त्यात सगळे खाद्य पदार्थ अगदी कोंबून कोंबून ठेवले जातात. अनेकदा जे पदार्थ मागच्या बाजूला जातात, ते तर कधी- कधी पंधरा दिवसांनी किंवा काही घरात तर महिना भराने बाहेर निघतात. त्यामुळे कोणत्याही अनावश्यक गोष्टी फ्रिजमध्ये ठेवू नका. आठवड्यातून एकदा फ्रिजची स्वच्छता जरूर करा. 

 

४. स्वच्छ पाणी प्या
आपण जाणतोच की दुषित पाण्यातून किंवा दुषत अन्नातून टायफॉईड पसरतो. त्यामुळे स्वच्छ पाणी आणि स्वच्छ अन्न खाण्याकडे आपला कल असला पाहिजे. अनेक जण कित्येक दिवस टाकीत साठवलेले पाणी पितात. हे पाणी खरोखरंच चांगले आहे का, टाकीत काही जीवजंतू तर नाहीत ना, याची एकदा तपासणी करा आणि मगच ते पाणी प्या. नाहीतर पाणी उकळून पिणे हा सर्वोत्तम उपाय करा.  
 

Web Title: As typhoid fever spreads, do these things to stay yourself safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

मैदा आणि तांदुळाच्या पिठातली भेसळ ओळखायची कशी? सावध व्हा, विकतच्या पिठातली भेसळ 'अशी' शोधा... - Marathi News | How to identify adulteration in flour and rice flour? Be careful, find the adulterated in the flour... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मैदा आणि तांदुळाच्या पिठातली भेसळ ओळखायची कशी? सावध व्हा, विकतच्या पिठातली भेसळ 'अशी' शोधा...

सणावाराच्या तोंडावर पैसे कमावण्यासाठी अनेक पदार्थांमध्ये भेसळ करण्यात येते. मैदा आणि तांदळाच्या पीठातील भेसळ ओळखण्याची सोपी चाचणी ...

डायबिटीस आहे, तो ही ऐन तारुण्यात? या 6 चुका टाळा, कारण.. - Marathi News | Is diabetes in young age? Avoid these 6 mistakes, because .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीस आहे, तो ही ऐन तारुण्यात? या 6 चुका टाळा, कारण..

डायबिटीस असला म्हणून खूप घाबरून जायचे कारण नाही. तसेच खूप आरामात राहणेही योग्य नाही. योग्य ती काळजी घेऊन या समस्येसोबत जगता येऊ शकते ...

Heart diseases : 'हा' ब्लड ग्रुप असलेल्यांना कमी वयातच उद्भवतात हृदयाचे जीवघेणे आजार; समोर आलं कारण - Marathi News | Heart diseases : People of this blood group at high risk of heart diseases | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'हा' ब्लड ग्रुप असलेल्यांना उद्भवतात हृदयाचे जीवघेणे आजार; समोर आलं कारण

Heart diseases : संशोधकांच्या म्हणण्यानुसार  एबी रक्तगट असलेल्यांमध्ये कार्डिओवॅस्क्यूलर डिसीज होण्याचा धोका जास्त असतो. त्यात ए आणि बी रक्तगटात तुलनेने कमी एंटीबॉडी असतात.  ...

ग्रीन टी रोज पिता? पण वेळा तर चुकत नाही? ग्रीन टी पिण्याची कोणती योग्य वेळ.. - Marathi News | Do you have Green Tea Daily? What is the right time to drink green tea? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ग्रीन टी रोज पिता? पण वेळा तर चुकत नाही? ग्रीन टी पिण्याची कोणती योग्य वेळ..

वजन कमी करताना ग्रीन टी घेणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय मानला जातो. असे असले तरीही तो कधी, केव्हा आणि कसा घ्यावा हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ...

How to hide bra straps : चारचौघात ब्रा स्ट्रिप्स दिसल्या तर अवघडल्यासारखं होतं? 'या' ४ स्मार्ट ट्रिक्स वापरून ब्रा स्ट्रिप्स लपवा - Marathi News | How to hide bra straps : Hide bra straps using these 4 smart tricks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चारचौघात ब्रा स्ट्रिप्स दिसल्या तर अवघडल्यासारखं होतं? 'या' ४ ट्रिक्स वापरून ब्रा स्ट्रिप्स लपवा

How to hide bra straps : आजकाल खूप मुलींना ब्रा च्या स्ट्रिप्स दिसल्या तरी काही हरकत नसते. पण काहीजणी अशा आहेत ज्यांना ब्रा चे पट्टे दिसल्यानंतर खूप अवघडल्यासारखं वाटतं. ...

डोळ्यांचा थकवा घालविणारी ३ योगासने! स्क्रिन बघून डोळ्यांवर येणारा ताण कमी करण्याचा सोपा उपाय - Marathi News | 3 yogas that relieve eye fatigue! An easy way to reduce eye strain by looking at the screen | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोळ्यांचा थकवा घालविणारी ३ योगासने! स्क्रिन बघून डोळ्यांवर येणारा ताण कमी करण्याचा सोपा उपाय

८- १० तास कंम्प्यूटर, लॅपटॉपसमोर सतत बसून असल्यामुळे डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत. शिवाय ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या डोळ्यांच्या समस्याही वाढल्या आहेत. म्हणूनच ही काही योगासने करा आणि डोळ्यांचा थकवा घालवा. ...