How To Reduce Cholesterol Without Medicine: कोलेस्टेरॉल वाढणं ही आजकाल एक गंभीर समस्या झाली आहे. कोलेस्टेरॉल हा मेणासारखा चिकट पदार्थ असतो, जो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो आणि त्यामुळे शरीरातील रक्त पुरवठा बाधित होतो. रक्तात बॅड कोलेस्टेरॉल वाढलं तर तुम्हाला हृदयरोग, हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोकसारख्या जीवघेण्या स्थितींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वेळीच उपाय करून बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यावर भर दिला पाहिजे.
भरपूर तेलकट, फॅट असलेले पदार्थ खाल्ल्यानं शरीरात कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. जेव्हा याचं प्रमाण वाढतं तेव्हा मेणासारखा हा चिकट पदार्थ नसांना ब्लॉक करतो. ज्यामुळे रक्तप्रवाह हळूवार होतो.
काय करावा उपाय?
न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशिअन शिखा अग्रवाल शर्मा यांच्यानुसार, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फॅट असलेले पदार्थ खाणं टाळले पाहिजे आणि नियमितपणे एक्सरसाईज केला पाहिजे. काही घरगुती उपायांनी सुद्धा याचं प्रमाण कमी केलं जाऊ शकतं. यातीलच एक उपाय म्हणजे हळद आणि काळी मिरी पूड....
हाय कोलेस्टेरॉल कमी करते हळद
हळदीकडे इम्यूनिटी बूस्टरच्या रूपात पाहिलं जातं. अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-इंफ्लेमेटरी गुण असल्यानं हा मसाला हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतो. यात करक्यूमिन नावाचं एक तत्व असतं, जे फार फायदेशीर असतं. करक्यूमिन फ्री रॅडिकल्स सेल्सना नष्ट करतं. तसेच हळदीनं ऑक्सीडेटिव स्ट्रेस कमी होतो, ज्याने जुन्या आजारांचा धोका वाढतो. करक्यूमिन तुमच्या ब्लड वेसेल्सच्या म्हणजेच रक्तवाहिन्यांच्या लायनिंगचं काम सुधारून हृदयरोगांचा धोका कमी करतं. तसेच याने ब्लड प्रेशरही कंट्रोल राहतं.
वैज्ञानिकांनाही मान्य आहे हळदीची ताकद
NCBI वर प्रकाशित एका रिसर्चमधून समोर आलं की, करक्यूमिन सुरक्षित आहे आणि कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयरोगांचा धोकाही याने कमी केला जाऊ शकतो. एका अभ्यासानुसार, हळदीचा अर्क कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करणे आणि बॅड कोलेस्ट्रॉल तयार होण्यापासून रोखतो.
हळदीची शक्ती वाढवण्याची पद्धत
हळदीची आणि यातील करक्यूमिनची पॉवर वाढवण्यासाठी हळदीसोबत काळी मिरीची पूड मिक्स केली पाहिजे. कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगांचा धोका कमी करण्यासाठी एक ग्लास पाण्यात हळद पावडर आणि काळी मिरीची पूड टाकून पाणी उकडून प्यावं. दुसरी पद्धत ही आहे की, कच्ची हळद काळी मिरी पूडसोबत पाण्यात उकडून हे पाणी पिऊ शकता.