वाताचा त्रास हा आपल्या दैनंदिन जीवनशैलीशी आणि आहार पद्धतीशी निगडित असतो. पचनक्रिया व्यवस्थित न झाल्यास, शरीरात वायू जास्त प्रमाणात तयार होतो आणि त्याचा साठा झाल्यामुळे पोट फुगणे, ढेकर येणे, कळ येणे आणि मुख्या म्हणजे अंगदुखी अशा विविध त्रासांतून रोज जावे लागते. (try 4 remedies, your stiff body will feel relaxed, vata imbalance, leg cramps- bloating remedies for all problems )थंड, कोरडी व जड अन्नपदार्थ खाल्ल्याने, वेळेवर जेवण न केल्याने, सतत उपाशी राहिल्याने किंवा जास्त प्रमाणात मसालेदार व तेलकट पदार्थ खाल्यानेही वात वाढतो. याशिवाय उशिरापर्यंत जागरण, तणाव आणि झोपेची कमतरता यांचाही परिणाम शरीरातील वातदोषावर होतो.
१. हा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय प्रभावी ठरतात. आल्याचा वापर विशेष लाभदायक मानला जातो. जेवणाआधी थोडेसे आले खायचे. आल्याला मीठ लावायचे आणि खायचे. म्हणजे पचन सुधारते आणि वाताचा त्रास कमी होतो.
२. हळदीचे दूध घेणेही वातशामक ठरते. हिंग हे नैसर्गिक वातनाशक आहे. कोमट पाण्यात थोडेसे हिंग टाकून प्यायल्यास पोटातील वायू कमी होतो. तसेच पोट साफ होते आणि शरीरही हलके होते. त्रिफळा रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यासोबत घेतल्यास पचनसंस्था स्वच्छ राहते.
३. ओवा आणि काळं मीठ पोटातील वायू कमी करून जडपणा दूर करतात. त्यामुळे ओवा आणि गरम पाणी दोन दिवसातून एकदा नक्की घ्या. लसूण वातावर फायद्याचा ठरतो. त्यामुळे लसूण आहारात असायला हवा. नुसता लसूण जरी थोडा खाल्ला तरी त्याचा फायदा होतो.
४. तसेच जिरे आणि दालचिनी वातनाशक आहेत. त्याचा आहारात समावेश असतोच मात्र काढा पिणे जास्त फायद्याचे ठरेल. घरी केलेले साजूक तूप खाणे आणि शरीराला लावणे म्हणजे अगदी उत्तम उपाय. शरीरातून वात खेचून घेते त्यामुळे आराम मिळतो.
याशिवाय हलका आणि सहज पचणारा आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, योगासने करणे जसे की पवनमुक्तासन, वज्रासन यासारखी आसने करणे उपयुक्त ठरते. पोटाला उब मिळणे गरजेचे आहे. पोट आतून गरम ठेवणे आणि थंड पदार्थ टाळणे देखील आवश्यक आहे. घरगुती उपायांचा नियमित वापर आणि संतुलित जीवनशैली यामुळे वाताचा त्रास कमी होऊन शरीर निरोगी राहते.