Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > फक्त कोलेस्टेरॉलच नाही तर ट्राइग्लिसराइडही ठरतो जीवघेणा, पाहा काय आहे हे नेमकं आणि याची कारणं

फक्त कोलेस्टेरॉलच नाही तर ट्राइग्लिसराइडही ठरतो जीवघेणा, पाहा काय आहे हे नेमकं आणि याची कारणं

What is Triglycerides : कोलेस्टेरॉल रिपोर्टमध्ये ट्रायग्लिसराइड्स लेव्हल समजून घेणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 10:43 IST2025-10-24T10:43:02+5:302025-10-24T10:43:40+5:30

What is Triglycerides : कोलेस्टेरॉल रिपोर्टमध्ये ट्रायग्लिसराइड्स लेव्हल समजून घेणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.

Triglycerides high levels increase heart risks know its hidden causes | फक्त कोलेस्टेरॉलच नाही तर ट्राइग्लिसराइडही ठरतो जीवघेणा, पाहा काय आहे हे नेमकं आणि याची कारणं

फक्त कोलेस्टेरॉलच नाही तर ट्राइग्लिसराइडही ठरतो जीवघेणा, पाहा काय आहे हे नेमकं आणि याची कारणं

Triglycerides Levels: रक्तात जर बॅड कोलेस्टेरॉल वाढलं तर वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका होतो हे तर आपण ऐकलं असेलच. कोलेस्टेरॉल हा शब्द तसा आता सगळ्यांच्याच परिचयाचा झाला आहे. पण अनेकांना हे माहीत नाही की, कोलेस्टेरॉल प्रमाणेच आणखी एक बाब आहे ज्यामुळे हृदयरोगांचा धोका अलिकडे वाढत आहे. कोलेस्टेरॉल कमी करण्यासोबतच आणखी एका गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे ती म्हणजे ट्रायग्लिसराइड्स.

कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर इतकंच ट्रायग्लिसराइड्सवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण वाढल्यास हृदयाच्या आजारांचा धोका दुप्पट होतो. त्यामुळे कोलेस्टेरॉल रिपोर्टमध्ये ट्रायग्लिसराइड्स लेव्हल समजून घेणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.

ट्रायग्लिसराइड म्हणजे नेमकं काय?

कोलेस्टेरॉल प्रमाणेच ट्रायग्लिसराइड्स हे सुद्धा द्रव स्वरूपातलं फॅट आहे जे आपल्या रक्तात आढळतं. याची लेव्हल वाढल्यास अ‍ॅथेरोस्क्लेरोसिसचा धोका वाढतो, ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजीच्या मते, ट्रायग्लिसराइड्सची लेव्हल वाढल्यास पॅन्क्रियाटायटिस आणि स्वादुपिंडातही सूज निर्माण करू शकते.

जेव्हा आपण अन्न खातो, तेव्हा शरीर लगेच गरजेपेक्षा जास्त कॅलरीज ट्रायग्लिसराइड्समध्ये रूपांतरित करतं. हे फॅट आपल्या फॅट सेल्समध्ये साठवलं जातं आणि गरज पडल्यास ऊर्जा मिळवण्यासाठी शरीर त्याचा वापर करतं. जर आपण बर्न केलेल्या कॅलरीपेक्षा जास्त खात असाल आणि जास्त कार्बोहायड्रेट घेत असाल, तर ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढते.

ट्रायग्लिसराइड्स वाढण्याची कारणं

जेनेटिक्स

काही लोकांमध्ये फॅमिली हायपरट्रायग्लिसरिडेमिया ही अवस्था आढळते ज्यात ट्रायग्लिसराइड्सची लेव्हल नॅचरली जास्त असते. काही वेळा फॅमिली हिस्ट्री नसतानाही ही समस्या होते. जर आपली लेव्हल 200–500 mg/dL दरम्यान असेल, तर ती अनुवांशिक असू शकते. गंभीर प्रकरणांमध्ये ती 4000 mg/dL पर्यंत जाऊ शकते, ज्यामुळे पॅन्क्रियाटायटिसचा धोका वाढतो.

औषधांचे दुष्परिणाम

काही औषधांमुळे ट्रायग्लिसराइड्सची लेव्हल 5% ते 200% पर्यंत वाढू शकते.

अनहेल्दी फूड्स

रिफाइंड धान्य, साखर आणि प्रोसेस्ड स्नॅक्स नेहमीच खाल्ल्याने ट्रायग्लिसराइड्स वाढतात. संशोधनानुसार, अशा पदार्थांचं दिवसातून 4 वेळा सेवन केल्याने मृत्यूचा धोका 62% पर्यंत वाढतो.

अल्कोहोल

दारूत असलेल्या जास्त कॅलरी, साखर आणि कार्बोहायड्रेटमुळे ट्रायग्लिसराइड्स झपाट्याने वाढतात.

कमी झोप

झोपेची कमतरता ब्लड प्रेशर, लठ्ठपणा आणि टाइप 2 डायबिटीजचा धोका वाढवते, ज्याचा परिणाम ट्रायग्लिसराइड्सवरही होतो.

ताण-तणाव

ताणामुळे शरीरात सूज वाढते आणि लिव्हरमध्ये  VLDL लिपोप्रोटीन वाढतो, जो वाईट कोलेस्टेरॉल मानला जातो. त्यामुळे हार्ट डिसीजचा धोका वाढतो.

ट्रायग्लिसराइड्स कसे कमी करावेत?

रोज किमान 30 मिनिटं व्यायाम करा.

साखर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स टाळा.

वजन कमी करा आणि आरोग्यदायी वजन राखा.

हेल्दी फॅट्स (जसे की ऑलिव्ह ऑईल, नट्स, अवाकाडो) आहारात समावेश करा.
दारूचं सेवन कमी करा.

जर जीवनशैलीत बदल करूनही पातळी कमी होत नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधोपचार घ्यावेत.

Web Title : ट्राइग्लिसराइड्स: कोलेस्ट्रॉल के साथ एक साइलेंट किलर; इसके कारण, प्रबंधन को समझें।

Web Summary : उच्च ट्राइग्लिसराइड्स, कोलेस्ट्रॉल की तरह, हृदय रोग का खतरा बढ़ाते हैं। कारणों में आनुवंशिकी, अस्वास्थ्यकर भोजन, शराब, तनाव और नींद की कमी शामिल हैं। व्यायाम, आहार परिवर्तन और यदि आवश्यक हो तो दवा के साथ इसका प्रबंधन करें।

Web Title : Triglycerides: A silent killer alongside cholesterol; understand its causes, management.

Web Summary : High triglycerides, like cholesterol, increase heart disease risk. Causes include genetics, unhealthy foods, alcohol, stress, and lack of sleep. Manage it with exercise, diet changes, and, if needed, medication.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.