Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोटाला हात लावून पाहा, तुमचे पोट कडक लागतेय की मऊ? पचन बिघडलं आहे सांगणारी ही घ्या टेस्ट..

पोटाला हात लावून पाहा, तुमचे पोट कडक लागतेय की मऊ? पचन बिघडलं आहे सांगणारी ही घ्या टेस्ट..

Touch your stomach and see if it feels hard or soft. Take this test to tell if you have indigestion : पोट फुगण्याचे कारणे आणि उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2026 17:21 IST2026-01-28T17:20:22+5:302026-01-28T17:21:22+5:30

Touch your stomach and see if it feels hard or soft. Take this test to tell if you have indigestion : पोट फुगण्याचे कारणे आणि उपाय.

Touch your stomach and see if it feels hard or soft. Take this test to tell if you have indigestion. | पोटाला हात लावून पाहा, तुमचे पोट कडक लागतेय की मऊ? पचन बिघडलं आहे सांगणारी ही घ्या टेस्ट..

पोटाला हात लावून पाहा, तुमचे पोट कडक लागतेय की मऊ? पचन बिघडलं आहे सांगणारी ही घ्या टेस्ट..

आजकाल अनेकांना पोट घट्ट होणे, डब्ब झाल्यासारखे वाटणे ही तक्रार जाणवते. पोट बाहेर फुगल्यासारखे दिसणे, जडपणा किंवा कपडे घट्ट व्हायला लागणे अशी लक्षणे दिसतात. ही अवस्था केवळ सौंदर्याशी संबंधित नसून पचनसंस्थेच्या आरोग्याशीही जोडलेली असते. गॅस-अपचन ही यामागची सामान्य कारणे असली तरी काही इतर कारणांकडे दुर्लक्ष करता कामा नये. वजन न वाढता फक्त पोट सारखे फुगत असेल तर ते चांगले नाही. 

पोट डब्ब होण्यामागे सर्वात सामान्य कारण म्हणजे गॅस आणि अपचन. घाईघाईने खाणे, नीट न चावता अन्न गिळणे, फार तिखट-तेलकट किंवा जड पदार्थ वारंवार खाल्ले तर पचन मंदावते. त्यामुळे पोटात वायू साठतो आणि पोट फुगल्यासारखे वाटू लागते. बद्धकोष्ठताही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. पोट नीट साफ न झाल्यास आत अन्न साचून राहते आणि पोट फुगीर दिसायला लागते. 

याशिवाय काही इतर कारणेही पोट घट्ट होण्यास कारणीभूत ठरु शकतात. दिवसभर खूप वेळ बसून राहणे आणि शारीरिक हालचाल कमी असणे यामुळे पचनसंस्था मंदावते. पाणी कमी पिण्याची सवय असल्यासही पोट साफ होत नाही. महिलांमध्ये मासिक पाळीपूर्वी होणारे हार्मोनल बदल पोट फुगणे आणि घट्ट वाटणे वाढवू शकतात. सततचा ताण-तणाव, चिंता किंवा झोपेचा अभाव याचा थेट परिणाम पचनावर होतो. काही वेळा जास्त मीठ असलेले पदार्थ, पॅकेज्ड फूड किंवा गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यानेही पोट फुगते.

पोटाचा हा डब्बपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय उपयुक्त ठरु शकतात. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायल्याने आतड्यांची हालचाल सुरळीत होते. जेवणानंतर थोडे चालणे पचन सुधारण्यास मदत करते. आहारात फायबरयुक्त पदार्थ जसे की भाज्या, फळे, भाजीपाला, कडधान्ये यांचा समावेश केल्यास पोट साफ राहते. जेवताना शांतपणे आणि नीट चावून खाणे ही सवय फार महत्त्वाची आहे.

घरच्या घरी जिरे, ओवा, बडीशेप यांसारखे पाचक पदार्थ उपयोगी पडतात. कोमट पाण्यात जिरे उकळून घेतलेले पाणी प्यायल्यास गॅस कमी होतो. ताक किंवा दही योग्य प्रमाणात घेतल्यास आतड्यांतील चांगले जिवाणू वाढतात आणि पचन सुधारते. रात्री खूप उशिरा जेवणे टाळा आणि झोपण्याआधी थोडा वेळ पोट हलके राहील याची काळजी घेणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, चालणे, हलकी योगासने किंवा श्वसनाचे व्यायाम पोट फुगण्याची तक्रार कमी करतात. ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान, पुरेशी झोप आवश्यक आहे. 

Web Title : पेट कड़ा है या नरम? पाचन बताएगा सेहत का राज़

Web Summary : पेट फूलना, गैस, अपच या कब्ज पाचन समस्याओं का संकेत हो सकता है। खराब आहार, गतिहीन आदतें और तनाव इसे बढ़ाते हैं। गर्म पानी, फाइबर युक्त खाद्य पदार्थ और हल्का व्यायाम असुविधा को कम कर पाचन में सुधार कर सकते हैं।

Web Title : Is Your Stomach Hard or Soft? A Digestion Test

Web Summary : Bloating, often due to gas, indigestion, or constipation, can signal digestive issues. Poor diet, sedentary habits, and stress worsen it. Simple remedies like warm water, fiber-rich foods, and light exercise can ease discomfort and improve digestion.