दिवसभर उभं राहणं, घरकाम, ऑफीसची धावपळ किंवा सतत चालणं यामुळे अनेकांना पाय दुखण्याचा त्रास जाणवतो. विशेषतः महिलांना हा त्रास अधिक जाणवतो, कारण घरातील कामं, बाहेरची जबाबदारी आणि सतत उभं राहण्याची सवय यामुळे पायांवर जास्त ताण येतो. (Tired, Aching Feet and Heel Pain? Try This Simple Night Routine for Relief )अशावेळी महागडे उपचार किंवा औषधांची गरज नसते. एक अतिशय सोपा आणि घरच्या घरी करता येणारा उपाय म्हणजे पाय भिंतीला सरळ लावून थोडावेळ झोपणे.
हा उपाय करण्यासाठी जमिनीवर किंवा बेडवर पाठीवर झोपायचं आणि दोन्ही पाय सरळ वर करून भिंतीला टेकवायचे. शरीराचा खालचा भाग भिंतीजवळ ठेवून पाय पूर्णपणे सरळ भिंतीवर ठेवले की आराम मिळतो. या स्थितीत साधारण १० ते १५ मिनिटं शांतपणे झोपून राहिलं तरी पायांवरील ताण कमी होतो.
दिवसभर उभं राहिल्यामुळे किंवा चालल्यामुळे पायांमध्ये रक्त साचल्यासारखं वाटू शकतं. पाय वरती केल्यामुळे रक्तप्रवाह पुन्हा व्यवस्थित होण्यास मदत होते. त्यामुळे पायांमध्ये येणारा जडपणा, सूज किंवा थकवा कमी होतो. अनेकांना संध्याकाळी पाय जड झाल्यासारखे वाटतात, अशावेळी हा उपाय खूप उपयोगी ठरतो.
पाय भिंतीला लावून झोपल्याने पायांच्या स्नायूंना आराम मिळतो. सतत चालण्यामुळे किंवा उभं राहिल्यामुळे स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो. या स्थितीत थोडावेळ राहिल्यामुळे स्नायू सैल होतात आणि वेदना कमी जाणवतात.
हा उपाय विशेषतः महिलांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. घरातील कामं, स्वयंपाक, मुलांची काळजी आणि बाहेरची धावपळ यामुळे दिवसभर पायांवर खूप ताण येतो. अशावेळी रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटं पाय भिंतीला लावून शांतपणे झोपलं तर दिवसभराचा थकवा कमी होतो आणि शरीराला हलकं वाटतं.
याशिवाय या पद्धतीने झोपल्यामुळे मनही शांत होतं आणि शरीराला आराम मिळतो. दिवसभराचा ताण कमी होऊन झोपही चांगली लागण्यास मदत होते. त्यामुळे पाय दुखत असतील, जड वाटत असतील किंवा खूप थकवा जाणवत असेल तर हा अगदी सोपा उपाय करून पाहायला हरकत नाही. नियमितपणे काही मिनिटं पाय भिंतीला लावून झोपल्यास पायांना आराम मिळतो आणि शरीरही अधिक रिलॅक्स वाटू शकतं.
Web Summary : Relieve tired, aching feet and heel pain with a simple nightly routine: lie on your back and rest your legs straight up against a wall for 10-15 minutes. This improves blood flow, relaxes muscles, and reduces fatigue, especially beneficial for women.
Web Summary : थके हुए, दुखते पैरों और एड़ी के दर्द से राहत पाने के लिए एक सरल उपाय: अपनी पीठ के बल लेटें और अपने पैरों को 10-15 मिनट के लिए दीवार पर सीधा टिकाएं। यह रक्त प्रवाह को बेहतर बनाता है, मांसपेशियों को आराम देता है और थकान को कम करता है, खासकर महिलाओं के लिए फायदेमंद है।